Lonavala Sky Walk Project | PMRDA | लोणावळ्या जवळ होणार स्काय वॉक प्रकल्प विकसित

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Lonavala Sky Walk Project | PMRDA | लोणावळ्या जवळ होणार स्काय वॉक प्रकल्प विकसित

 

Lonavala Sky Walk Project | PMRDA |मावळ विधानसभा मतदारसंघाचे (Maval Constituency) आमदार  सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांचे संकल्पनेतून लोणावळा परिसर पर्यटन क्षेत्र विकासासाठी लोणावळ्यापासून १५ किमी अंतरावरील प्रसिद्ध लायन्स व टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार आहे. अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाच्या (PMRDA Administration) वतीने देण्यात आली. (Lonavala Sky Walk Project | PMRDA)

मावळ तालुक्यातील वन विभागाच्या मौजे आतवन येथील राखीव वन गट नं. १६६ मधील ८ हेक्टर क्षेत्रात हा स्काय वॉक पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विकसित केला जाणार असून त्यास्तही पर्यटन विकास विभागाकडून वित्त पुरवठा केला जाणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वित्त मात्री आदरणीय अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पीएमआरडीए ने हाती घेतले आहे.

Devendra Fadnavis in Pune | वेताळ टेकडी, नदी सुधार बाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका : काय म्हणाले? वाचा सविस्तर

Categories
Breaking News PMC social पुणे

Devendra Fadnavis in Pune | वेताळ टेकडी, नदी सुधार बाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका : काय म्हणाले? वाचा सविस्तर

Devendra Fadnavis in Pune | शहरातील प्रकल्पांबाबत पर्यावरणप्रेमींची काही मत आहेत त्याचा मी आदर करतो. त्यांच म्हणणं आम्ही निश्चित ऐकून घेणार आहोत. पण हे करत असताना काही लोकं हे केवळ विकास थांबला पाहिजे या मताचे जे असतात ज्यांच्याकडे कुठलंही लॉजिक नसत, तज्ज्ञ नसतात पण आमचच म्हणणं खरं आहे असा विचार करणार्यांचे आपल्याला ऐकता येणार नाही. अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या लाखो पुणेकरांचं जीवनमान जर आपल्याला सुधरवायचं असेल तर महत्त्वाचे निर्णय घ्यावेच लागतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. (Devendra Fadnavis in Pune)
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झालेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पौड फाटा बालभारती रस्ता (Pauda fata to Balbharti road) आणि नदी काठ सुधार प्रकल्प (River front Devlopment project) बाबत पर्यावरणवादी (Environmentalist) नागरिकांची बैठक घ्यावी अशी मागणी या कार्यक्रमात केली त्यावर फडणवीस यांनी भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, जगामध्ये शाश्वत विकासासाठी ज्या उत्तम कार्यपद्धती आहेत ते आपण स्वीकारल्या पाहिजेत त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही विकासामध्ये विनाश होऊ नये हे खरे असले तरी काहीजण कमी माहितीच्या आधारावर अर्धवट माहितीवर प्रकल्पाला विरोध करतात त्यामुळे प्रकल्प थांबतो जगाच्या पाठीवर जे प्रकल्प शाश्वत ठरलेले आहेत मग ते आपल्याकडे का होऊ नयेत असा प्रश्न देखील फडणवीस यांनी केला. पुण्यातील प्रकल्प करताना सर्वांच्या बाजू ऐकल्या जातील पण प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात एक तुमची बाजू एक आमची बाजू पण खरी बाजू समजून घ्यायचे असेल तर तज्ञांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेतले पाहिजे. म्हणून जे पर्यावरणवादी असतील किंवा ज्या लोकांना पुण्याच्या संदर्भात अतिशय आत्मियता आहे त्यांचे म्हणणं निश्चित ऐकून घेऊ. पुणे हे केवळ ऐतिहासिक शहर नाही तर हे भविष्यातला शहर देखील आहे. जगाच्या पाठीवर या २१व्या शतकांमध्ये नॉलेज सिटी म्हणून पुणे शहर आहे. महाराष्ट्र देशाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये 20 टक्क्यांचा वाटेकरी आहे. या मध्ये सिंहाचा वाटा पुण्याचा आहे. त्यामुळे इथली वाढती लोकसंख्या ही विचारात घेता हे शहर राहण्यासाठी योग्य बनले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या सगळ्या गोष्टींचे मुबलक प्रमाणात उपलब्धता असली पाहिजे. या दृष्टीने पुण्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न आहे . पुण्यामध्ये 27 हजार कोटी रुपये खर्च करून रिंग रोड निर्माण केला जाणार आहे पण या रिंग रोडच्या भोवती तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हा रिंग रोड पुण्याचे ग्रोथ इंजिन असेल असेही फडणवीस म्हणाले. पुण्याला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध असला तरी वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे पुणे तहानलेले आहे त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्याच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन झालेले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
——
News Title | Devendra Fadnavis in Pune | Devendra Fadnavis clarified his position regarding Vetal hill, river improvement: What did he say? Read in detail

Vaikunth Crematorium | वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा |  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे |  वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथील वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, विकास ढाकणे, पुणे महानगर पालिकेचे विद्युत विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदुल आदी उपस्थित होते.

वैकुंठ स्मशानभूमीच्या धुरामुळे स्मशानभूमीच्या बाजूच्या सोसायट्यांना धुराचा त्रास होत असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. पाटील यांनी सूचना दिल्या, वैकुंठ स्मशानभूमीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे वापर होत असलेले लाकडावरील शवदहन कमी करावे आणि लाकडावरील दहन ऐवजी विद्युत व गॅस दहिनीची उभारणी करावी.

वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील लोकांची समस्या दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांबरोबर एक समिती गठीत करून तेथील व्यवस्थापनाबाबत अहवाल तयार करण्याबाबत सूचना श्री. पाटील यांनी दिल्या. चिमणीची उंची वाढवणे, हवेत जाणाऱ्या धुराचे प्रमाण कमी करण्यासाठी एक ड्राय स्क्रबरची उभारणी करणे आदी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ. खेमणार यांनी माहिती दिली, पुणे महानगरपालिका क्षेत्रात १० विद्युत दाहिन्या, १३ गॅस दाहिन्या, १ हायब्रीड दाहिनी तसेच २३ ए.पी.सी. यंत्रणा असे एकूण ४७ यंत्रणा शवदहनासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी विकेंद्रित स्वरुपात या सुविधांचा वापर केल्यास वैकुंठ प्रमाणे एकाच ठिकाणी जास्त ताण येणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. त्यदृष्टीने पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

नीरी आणि महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
0000