PMRDA Pune | PMRDA च्या दोन शैक्षणिक सुविधा भूखंडांचे होणार ई लिलाव

Categories
Breaking News social पुणे
Spread the love

PMRDA Pune | PMRDA च्या दोन शैक्षणिक सुविधा भूखंडांचे होणार ई लिलाव

PMRDA Pune | माण-हिंजवडी परिसरात पायाभूत शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) मौजे माण ता मुळशी येथील दोन शैक्षणिक सुविधा भूखंड ८० वर्षाच्या दीर्घ मुदतीने भाडेपट्ट्याने ई लिलावा (E Auction) द्वारे देण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. अशी माहिती रामदास जगताप उप आयुक्त जमीन व मालमत्ता विभाग (Ramdas Jagtap PMRDA) यांनी दिली.

ई लिलाव होणारे माण तालुका मुळशी येथील सं. नं. ९८/९९/१०१ मधील १३५ आर आणि सं.नं. २८८ मधील ६२ आर क्षेत्र हे दोन्ही भूखंड शैक्षणिक प्रयोजनासाठी आरक्षित केलेले सुविधा भूखंड असून त्याचे ई लिलावासाठी इच्छुक असणाऱ्या शैक्षणिक संस्था अथवा धर्मादाय संस्थांना दि. २४ जानेवारी पर्यंत ई लिलाव पोर्टलवर (https://eauction.gov.in ) नोंदणी करता येईल व प्रत्यक्ष ई लिलाव  ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजले पासून सुरु होईल.

पुणे महानगर प्रदेशातील पायाभूत शैक्षणिक सुविधांच्या विकासाठी प्राधिकरणाच्या मालकीचे हे दोन्ही सुविधा भूखंड ८० वर्षाच्या दीर्घ मुदत भाडेपट्ट्याने वितरीत करण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ रोजी ई लिलाव केले जाणार आहेत त्यातून प्राधिकरणाला सुमारे २० ते २५ कोटीचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. या ठिकाणा वापर संबंधीत संस्थेला फक्त शैक्षणिक कारणासाठीच करता येईल प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे. क्षेत्राने मोठे सदरचे दोन्ही भूखंड मान हिंजवडी च्या विकसित क्षेत्रात असल्याने या ठिकाणी उच्च दर्जाचे शैक्षणिक संकुल विकसित होण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरेल.