Flyover : उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावरून श्रेयवादाची लढाई : विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी हा केला दावा

Categories
PMC पुणे
Spread the love

उड्डाणपुलाच्या कामासाठी सुप्रियाताई आणि अजित दादांचे महत्वाचे योगदान 

 

: महापालिका विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांचा दावा 

 
पुणे: सिंहगड रोड आणि कात्रज कोंढवा रोड या दोन्ही उड्डाणपुलाचे भूमिपूजन 24 सप्टेंबर ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. असे भाजपने जाहीर केले आहे. मात्र हे करताना या पुलाच्या कामासाठी सुप्रियाताई आणि अजित दादांचे महत्वाचे योगदान आहे. हे भाजप विसरली आहे, असा आरोप महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की आमचा प्रकल्पाना विरोध नाही मात्र भाजपच्या अशा वृत्तीचा आम्ही निषेध करतो.

: 24 ला भूमिपूजन

शहरात वाहतूक कोंडी हा नित्याचा विषय झाला आहे. त्यात सिंहगड रोड आणि कात्रज कोंढवा रोड तर नेहमीच रहदारीने गजबजलेले. त्यामुळे या दोन्ही रस्त्यावर उड्डाणपूल करणे प्रस्तावित आहे. सिंहगड रोडचा उड्डाणपूल महापालिका करणार आहे. तर कात्रज कोंढवा रोड चा NHAI करणार आहे.  या दोन्ही उड्डाणपुलाचे भूमिपूजन 24 सप्टेंबर ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार योगेश टिळेकर यांनी ही घोषणा केली. मात्र याबाबत दीपाली धुमाळ यांनी नाराजी दर्शवली आहे. धुमाळ म्हणाल्या या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्याकडे पाठपुरावा केला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार बैठका घेऊन प्रशासनाला निर्देश दिले. त्यामुळे हे काम होत आहे. मात्र हा उल्लेख भाजप टाळत आहे. असे धुमाळ म्हणाल्या.

या दोन्ही उड्डाणपुलाच्या कामासाठी आमच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेहमीच पाठपुरावा केला. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे देखील मागणी केली. त्यामुळे हे दोन्ही विषय पुढे जाऊ शकले. सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत वारंवार बैठका घेऊन प्रशासनाला निर्देश दिले होते. मात्र नेहमीच क्रेडिट घ्यायला पुढे असणाऱ्या भाजपाला मात्र याचे श्रेय या दोघांना द्यावेसे वाटले नाही. आमचा प्रकल्पाला विरोध नाही मात्र भाजपच्या अशा मानसिकतेचा आम्ही निषेध करतो.

    दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेता, महापालिका

Leave a Reply