Hospitals | PMC Pune | महापालिकेच्या दवाखान्यात अचानक भेटी दिल्या जाणार! | कार्यालयीन शिस्त नसल्यास कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे
Spread the love

महापालिकेच्या दवाखान्यात अचानक भेटी दिल्या जाणार!

| कार्यालयीन शिस्त नसल्यास कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

पुणे |  पुणे महानगरपालिका अधिनस्त रुग्णालये / दवाखाने व प्रसुतीगृहे येथील कामकाजाचे व्यवस्थापन बाबत आरोग्य विभागाकडून गंभीरपणे लक्ष दिले जात आहे. रुग्णालयांचे कामकाज योग्य पद्धतीने होते किंवा नाही यासाठी अचानकपणे रुग्णालये व दवाखाने येथे भेटी देऊन पडताळणी करावी व त्रुटी आढळल्यास संबंधित वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाचा प्रस्ताव मेडिकल युनिट विभागाकडे पाठविण्यात यावा. असे आदेश सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांनी दिले आहेत.

| असे आहेत आदेश

पुणे महापालिकेअंतर्गत कार्यरत असलेले रुग्णालये आणि दवाखान्यामधील सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व इतर मदतनीस कर्मचारीवृंद यांनी कार्यालयीन वेळेत न चुकता उपस्थित राहून त्यांना नेमून दिलेली सर्व कामे अत्यंत सचोटीने पार पाडण्याबाबत त्यांच्यावर जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव त्यांना नियमितपणे व वारंवार बैठकांमधुन करून देण्यात आलेली आहेच. त्याचे दृश्य परिणाम चांगले झाले असून भविष्यात देखील त्यांनी त्यांचे कामकाज कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहून पार पाडावे. यामध्ये कोणती ही त्रुटी निदर्शनास आली तर अत्यंत गंभीर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल याची त्यांना पुन्हा जाणीव करून देण्यात येत आहे.
सर्व क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या अंतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व इतर मदतनीस कर्मचारीवृंद पूर्ण कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून सचोटीने काम पार पाडतात किंवा नाही हे पहावयाचे आहे. सदर पर्यवेक्षकीय जबाबदारी त्यांची आहे. त्यांच्या अंतर्गत असलेल्या कर्मचा-यांकडून कोणत्याही प्रकारचे विपर्यस्त वर्तन झाले तर पर्यवेक्षणामध्ये हयगय म्हणून त्यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या क्षेत्रात याबाबत कामकाज योग्य पद्धतीने होते किंवा नाही यासाठी अचानकपणे रुग्णालये व दवाखाने येथे भेटी देऊन पडताळणी करावी व त्रुटी आढळल्यास संबंधित वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाचा प्रस्ताव मेडिकल युनिट विभागाकडे पाठविण्यात यावा. असे आदेशात म्हटले आहे.