Pune Traffic Police Parking Spaces | Pune Ganesh utsav 2023 | गणेश उत्सव काळात देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी शहरात 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था | जाणून घ्या ठिकाणे

Categories
Breaking News social पुणे

Pune Traffic Police Parking Spaces | Pune Ganesh utsav 2023 | गणेश उत्सव काळात देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी शहरात 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था | जाणून घ्या ठिकाणे

 

Pune Traffic Police Parking Spaces | Pune Ganesh utsav 2023 | दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. गणेश मंडळांनी उभारलेले देखावे, रोषणाई पाहण्यासाठी शहरातील तसेच शहराबाहेरील नागरीक मोठ्या प्रमाणात येत असतात. नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा तसेच नागरिकांना आपली वाहने सुरक्षीत पार्क करता यावी यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून शहरात 26 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच मध्यवस्तीतील रस्त्यांवर वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली असून रस्त्यांच्या आजूबाजूला वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. (Pune Traffic Police – Parking Spaces)

पार्किंग व्यवस्था 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर (गणेश विसर्जन) दरम्यान असणार आहे. गणेशोत्सव कालावधीत रोषणाई व देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी तसेच विसर्जनाच्या दिवशी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणी पार्क करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. (Pune Traffic Police – Parking Spaces)

वाहनांसाठी करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था कंसात वाहनाचा प्रकार

  1. न्यु इंग्लिश स्कुल, रमणबाग (दुचाकी)
  2. शिवाजी आखाडा वाहनतळ (दुचाकी/चारचाकी)
  3. देसाई कॉलेज (पोलीस पार्किंग)
  4. हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ (दुचाकी/चारचाकी)
  5. गोगटे प्रशाला (दुचाकी)
  6. एसपी कॉलेज (दुचाकी)
  7. नदीपात्रालगत (दुचाकी/चारचाकी)
  8. शिवाजी मराठा शाळा (दुचाकी)
  9. नातुबाग (दुचाकी)
  10. पीएमपीएमएल मैदान पुरम चौकाजवळ (चारचाकी)
  11. पेशवे पार्क सारसबाग (दुचाकी)
  12. हरजीवन हॉस्पिटल समोर सावरकर चौक (दुचाकी)
  13. पाटील प्लाझा पार्किंग (दुचाकी)
  14. मित्रमंडळ सभागृह (दुचाकी)
  15. पर्वती ते दांडेकर पुल (दुचाकी)
  16. दांडेकर पुल ते गणेश मळा (दुचाकी)
  17. गणेश मळा ते राजाराम पुल (दुचाकी)
  18. निलायम टॉकीज (दुचाकी/चारचाकी)
  19. विमलाबाई गरवारे हायस्कुल (दुचाकी)
  20. आबासाहेब गरवारे कॉलेज (दुचाकी/चारचाकी)
  21. संजीवनी मेडीकल कॉलेज मैदान (दुचाकी/चारचाकी)
  22. आपटे प्रशाला (दुचाकी)
  23. फर्ग्युसन कॉलेज (दुचाकी/चारचाकी)
  24. जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान (दुचाकी/चारचाकी)
  25. मराठवाडा कॉलेज (दुचाकी)
  26. एसएसपीएमएस कॉलेज (दुचाकी)

Pune Traffic Update | १ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Categories
Breaking News social पुणे

Pune Traffic Update | १ ऑगस्ट रोजी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Pune Traffic Update | पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी कळविले आहे. (Pune Traffic Update)
 १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा. ते दुपारी ३ वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील. (PM Modi tour pune)
 वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. (PM Modi Pune Daura)
0000
News Title | Pune Traffic Update | Change in traffic in Pune city on August 1

Karve Road Pariking Update| कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कॅरेज वेमध्ये पार्किंगला परवानगी द्या!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Karve Road Pariking Update| कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कॅरेज वेमध्ये पार्किंगला परवानगी द्या!

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे वाहतूक पोलीस आणि महापालिकेला निर्देश

| गरवारे महाविद्यालयाजवळ पे ॲन्ड पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था

Karve Road Parking Update| कोथरुड (Kothrud) मधील कर्वे रस्त्यावरील (Karve Road) संभाव्य वाहतूककोंडी टाळून, कॅरेज वेमध्ये स्थानिक व्यवसायिकांना वाहने पार्किंगसाठी (Vehicle Parking) परवानगी द्या. तसेच, स्थानिक व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, तेथे वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड (No Parking Board) काढावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil)  यांनी आज दिले‌. तसेच, गरवारे महाविद्यालयाजवळ (Garware College) महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे ॲन्ड पार्किंगसाठी (Pay And Parking) स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. (Karve Road Parking Update)

वनाज ते गरवारे दरम्यान मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाची कामे संपल्यामुळे कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. (Karve Road Traffic)

या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (Additional Commissioner Dr Kunal Khemnar), रवींद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade), शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (Traffic police deputy commissioner Vijaykumar Magar), कोथरुड वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वास गोळे, फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका (Fattechand Ranka), ओमप्रकाश रांका, अजित धावडे, अजित सांगळे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी, मनसेचे हेमंत संभूस, शिवसेना ठाकरे गटाचे गजानन थरकुडे उपस्थित होते.

कोथरुड मधील कर्वे रस्त्यावरील खंडुजीबाबा चौक ते करिष्मा सोसायटीदरम्यानचा रस्ता ६० फुटांचा असल्याने या पूर्वी दुतर्फा वाहने उभी करण्यास महापालिका आणि पोलिसांनी परवानगी होती. मात्र, २०१८ मध्ये या रस्त्यावर वनाज ते गरवारे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यापाठोपाठ नळस्टॉप चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपुलासाठीही काम सुरू झाले. सदर दोन्ही प्रकल्पांचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पार्किंग पूर्ववत करावे, अशी तेथील व्यावसायिकांची मागणी केली होती.  (Pune Traffic update)

त्याअनुषंगाने आज महापालिकेत बैठकीत होऊन सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार संभाव्य वाहतूककोंडी टाळून कॅरेज वे उपलब्ध आहे, अशा भागांमध्ये वाहने पार्किंगला परवानगी द्यावी. तसेच, व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढून, व्यवसायिक आणि स्थानिक नागरिकांची समस्या सोडवावी; असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले‌.

तसेच, भविष्यातील वाहने पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी गरवारे महाविद्यालयाच्या विरुद्ध बाजूस महापालिकेच्या जागेवर वाहने पार्किंगसाठी ‘पे ॲन्ड पार्क तत्वावर’ वाहनतळ सुरू करावे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने याची व्यवस्था उभी करावी, अशी सूचना ही नामदार पाटील यांनी आजच्या बैठकीत दिली. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या निर्णयावर सर्व व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


News Title | Karve Road Parking Update| Allow parking in Carriage Ways avoiding traffic jams on curved roads! | Guardian Minister Chandrakantada Patil’s instructions to traffic police and pune municipal corporation

Pune News | नागपूर चाळ रस्ता नो पार्किंग झोनच्या आदेशाला स्थगिती | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या मागणीला यश

Categories
Breaking News Political social पुणे

Pune News | नागपूर चाळ रस्ता नो पार्किंग झोनच्या आदेशाला स्थगिती

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या मागणीला यश ; पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली तत्वतः मान्यता

– माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे वाहतूक पोलिस उपायुक्तांना निवेदन

 

Pune News | नागपूर चाळ गल्ली क्रमांक 1 ते गल्ली क्रमांक 4 तसेच एअरपोर्ट रस्त्यावरील पोस्ट ऑफिस चौक ते जेल रोड पोलिस चौकीपर्यंत येरवडा कारागृहाच्या सीमाभिंतीलगत नो पार्किंग झोन (No Parking Zone) करण्याचा आदेश येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत घेण्यात आलेला होता. हा निर्णय सर्व नागपूर चाळ आणि महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड मधील रहिवासी यांच्यासाठी गैरसोयीचा आहे. सर्वसामान्य नागरिक, इथले व्यावसायिक यांचा जगण्याचा हक्क हिरावणारा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करा, अशी मागणी नागपूर चाळ रहिवासी संघाने केली होती. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (PMC former Deputy mayor Dr Siddharth Dhende) यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा केला. या वेळी हा निर्णय मागे घेण्याला तत्वतः मान्यता दिली असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. (Pune News)

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजकुमार मगर यांची भाजपा शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी हा निर्णय मागे घेत असल्याचे सांगण्यात आले.

या वेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक आयुब शेख, नागपुर चाळ व्यापारी अशोशियनचे अध्यक्ष किशोर चौरे, सरचिटणीस शाम गुप्ता, ताराचंद जैन, राजु बाफना, यशवंत शिर्के, पथारी संघटना अध्यक्ष विजय कांबळे, अण्णा मोहिते, चंद्रकांत जाधव, संजय वाईकर, डॉक्टर असोशियशनचे डाॅ साजिद शेख, डॉ. मेश्राम, पापाभाई , मुन्नाभाई, प्रशांत दिंडोरकर, सुरेश मोरे, विनोद मोरे, राजु हिरे, जेम्स शिंगार, मुनीर शेख, विनू महाडिक व नागरिक मोठ्या संख्येने होते.

या वेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, नागपूर चाळ रहिवाशांसाठी पार्किंगची कोणतीही सुविधा नाही. या ठिकाणी 3 हजार 200 कुटुंबे राहत आहेत. तर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मध्ये सुमारे चार हजार कुटुंबे राहत आहेत. नागपूर चाळ ही विघोषित झोपडपट्टी आहे. या ठिकाणी असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा 142 विविध प्रकारची दुकाने आहेत आहेत. तीन रुग्णालय, चार मेडिकल दुकाने तसेच दोन अधिकृत रिक्षा थांबा आहे. या सर्वांची पार्किंगची व्यवस्था ही सध्या तरी रस्त्यालगतच आहे. मात्र या ठिकाणी नो पार्किंग झोन झाल्यास जगण्याचा हक्कच हिरावून घेण्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

संबंधित हा रस्ता यापूर्वीच शंभर फुटी करण्यात आलेला आहे. रस्ता प्रशस्त असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न येत नाही. तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचा दौरा असल्यास या रस्त्यावरील वाहने नागरिकांकडून काढली जात आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात देखील कोणताही अडथळा येत नाही. याबरोबरच या रस्त्याला पर्यायी इतर अनेक रस्ते निर्माण झालेले आहेत. यामध्ये जुना एअरपोर्ट रस्ता, विमाननगर ते कल्याणी नगर कडे जाणारा रस्ता, तसेच एअरपोर्टवरून शाहू चौक, कॉमरझोन मार्गे पुणे शहरात जाणारा रस्ता आहे. त्यामुळे इतरही पर्याय सुविधामुळे नागरिकांना त्रास होत नाही.

या सर्वांचा विचार करता काही समाधानकारक तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांची आहे. यामध्ये जे नागपूर चाळ रहिवासी आहेत किंवा जे व्यवसाय करणारे आहेत, अशांच्या वाहनांना नागपूरचा रहिवासी संघाचा स्टिकर द्यावा. या लोकांनाच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. या व्यतिरिक्त वाहने लागल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. त्यासाठी पार्किंगचे पट्टे आखून द्यावेत. तसेच सुरक्षेचा प्रश्न असेल तर या परिसरात नागपूर चाळ रहिवासी संघाच्या वतीने सीसीटीव्ही देखील लावण्यासाठी नागरिक तयार आहेत.

या सर्व बाबींचा विचार करता नुकताच काढलेला नो पार्किंगचा आदेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.

या वेळी नागरिकांची होणारी गैरसोय व मागणी पाहता वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजकुमार मगर यांनी नो पार्किंच्या आदेशाला स्थगिती देत असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसेच जी 20 परिषद तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे असल्यास या वेळी वाहने काढण्याचे आवाहन केले. याला नागपुर चाळ येथील रहिवाशांनी सकारात्मकता दर्शवली.


News Title | Pune News | Suspension of Nagpur Chal road no parking zone order| Former Deputy Mayor Dr. Success to Siddharth Dhende’s demand

Pune City Traffic Police | दुसऱ्यांदा नो पार्किंग ला गाडी दिसल्यास बसणार जबरदस्त भुर्दंड

Categories
Breaking News social पुणे

Pune City Traffic Police | दुसऱ्यांदा नो पार्किंग ला गाडी दिसल्यास बसणार जबरदस्त भुर्दंड

| पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय

Pune City Traffic Police | पुणे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक समस्या आणि वाहतूक कोंडी हा प्रश्न खूप गंभीरपणे घेतला आहे.  नो पार्किंगमध्ये (No Parking) लावलेल्या गाड्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते. त्यामुळे पुणे वाहतूक पोलीसांनी नो पार्किंगला गाड्या लावणाऱ्या वाहनचालकांवरील दंड वाढवला आहे. दुसऱ्यांदा गाडी नो पार्किंगला दिसल्यास  वाहनचालकास चांगलाच भुर्दंड बसणार आहे. (Pune city traffic police)

पुणे शहर वाहतूक पोलीस विभागातर्फे (Pune City Traffic Police) दंडाच्या रकमेत वाढ केल्याचे सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. त्या पत्रानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून (Two Wheeler) पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आकारण्यात येतील. एकदा दंड भरल्यानंतर जर दुसऱ्यांदा वाहन नो पार्किंगमध्ये लावले तर दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मोटारचालकांनाही (Four Wheeler) हे नवीन नियम लागू केले आहे. त्यानुसार पहिल्यांदा नो पार्किंगमध्ये मोटारगाडी लावल्यास 1,071 रुपये दंड आकारण्यात येणार असून दुसऱ्यांदा लावल्यास 2,071 रुपये दंड भरावा लागणार आहे. (Pune Traffic police news)

शहरातील वाहन व मोटार चालक सर्रास नियम मोडताना दिसतात. सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न वापरणे, माल ओव्हरलोड करणे आणि मालवाहू वाहनांमध्ये प्रवाशांची ने-आण करणे यासारख्या प्रकारांवर बंदी असताना चालक नियमांना धाब्यावर बसवून प्रवास करत असतात. यापुढे मात्र अशा सर्व बेशिस्त चालकांचे लगाम पुणे शहर वाहतूक पोलीसांकडे असणार आहेत.
सध्या पुण्यात प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस उभे असतात. त्यात अनेक दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्राची विचारपूस करतात.
त्यानंतर हेल्मेट सक्ती असताना हेल्मेट (Helmet) न वापरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. आता नो पार्किंगला वाहन लावणाऱ्या चालकावर धडक कारवाई करण्यात येणार आहे. पार्किंग संदर्भात हे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आले आहे. (Pune Traffic police Marathi news)

——-

News Title | Pune City Traffic Police |  If you see a car or two wheeler at No Parking for the second time, you will be very upset |  Decision of Pune Traffic Police