Karve Road Parking Latest News | कर्वे रोडवरील वाहनाच्या पार्किंगबाबत वाहतूक पोलिसांकडून व्यवस्था 

Categories
Uncategorized

Karve Road Parking Latest News | कर्वे रोडवरील वाहनाच्या पार्किंगबाबत वाहतूक पोलिसांकडून व्यवस्था

Karve Road Parking Latest News | पुणे शहरातील कर्वे रोडवरील (Karve Road pune) मेट्रोचे काम पूर्ण झाले असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता ज्या ठिकाणी वाहनांकरीता जास्त कॅरेज-वे उपलब्ध होत आहे, अशा ठिकाणी नागरिकांच्या सोयीकरीता दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखा पोलीस उप-आयुक्त विजयकुमार मगर (Traffic Deputy commissioner Vijaykumar Magar)यांनी दिली आहे. (Karve Road Parking Latest News)

रसशाळा चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे जाताना:

बँक ऑफ महाराष्ट्र समोर १० मीटर चारचाकी पार्किंगची सोय करण्यात येत आहे. भाग्यश्री ज्वेलर्स ते चैतन्य नगरी सोसायटी येथे १५ मीटर चारचाकी पार्किंग आणि युनियन बँक ते स्वप्न नगरी सोसायटी येथे २० मीटर चारचाकी पार्किंगची सोय करण्यात येत आहे.

सिद्धेश्वर मेडीकल ते कोहीनूर वाईन्स पर्यंत सोसायटी गेट सोडून तसेच गणेश चेंबर, रेबन शोरुम ते अमर हार्ड वेअर पर्यंत १५ मीटर दुचाकी पार्कींग करण्यात येत आहे.

स्वातंत्र्य चौक ते रसशाळा चौकाकडे जाताना:

कल्याण ज्वेलर्स शेजारील धनश्री ग्लास दुकान ते गो-कलर्स दुकान पर्यंत ५ मीटर दुचाकी पार्किंग करण्यात येत आहे. जगन्नाथ तरटे मार्गाशेजारील ओपन हाऊस, सारथी हॉटेल ते प्राईम फर्निचर शोरुम पर्यंत ५० मीटर दुचाकी पार्किंग तर भोडे कॉलनी लेन ते कचरे पथ पर्यत २० मिटर दुचाकी पार्किंग करण्यात येत आहे.

वाहनचालकांनी पार्किंगच्या बदलाची नोंद घेवून आपली वाहने पार्किंग करावीत, असे आवाहनही वाहतुक शाखा, पुणे शहर यांच्या मार्फत केले आहे.


News Title |Karve Road Parking Latest News | Arrangements by traffic police regarding vehicle parking on Karve Road

Karve Road Pariking Update| कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कॅरेज वेमध्ये पार्किंगला परवानगी द्या!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Karve Road Pariking Update| कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कॅरेज वेमध्ये पार्किंगला परवानगी द्या!

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे वाहतूक पोलीस आणि महापालिकेला निर्देश

| गरवारे महाविद्यालयाजवळ पे ॲन्ड पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था

Karve Road Parking Update| कोथरुड (Kothrud) मधील कर्वे रस्त्यावरील (Karve Road) संभाव्य वाहतूककोंडी टाळून, कॅरेज वेमध्ये स्थानिक व्यवसायिकांना वाहने पार्किंगसाठी (Vehicle Parking) परवानगी द्या. तसेच, स्थानिक व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, तेथे वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड (No Parking Board) काढावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil)  यांनी आज दिले‌. तसेच, गरवारे महाविद्यालयाजवळ (Garware College) महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे ॲन्ड पार्किंगसाठी (Pay And Parking) स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. (Karve Road Parking Update)

वनाज ते गरवारे दरम्यान मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाची कामे संपल्यामुळे कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. (Karve Road Traffic)

या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (Additional Commissioner Dr Kunal Khemnar), रवींद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade), शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (Traffic police deputy commissioner Vijaykumar Magar), कोथरुड वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वास गोळे, फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका (Fattechand Ranka), ओमप्रकाश रांका, अजित धावडे, अजित सांगळे, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी, मनसेचे हेमंत संभूस, शिवसेना ठाकरे गटाचे गजानन थरकुडे उपस्थित होते.

कोथरुड मधील कर्वे रस्त्यावरील खंडुजीबाबा चौक ते करिष्मा सोसायटीदरम्यानचा रस्ता ६० फुटांचा असल्याने या पूर्वी दुतर्फा वाहने उभी करण्यास महापालिका आणि पोलिसांनी परवानगी होती. मात्र, २०१८ मध्ये या रस्त्यावर वनाज ते गरवारे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यापाठोपाठ नळस्टॉप चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपुलासाठीही काम सुरू झाले. सदर दोन्ही प्रकल्पांचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पार्किंग पूर्ववत करावे, अशी तेथील व्यावसायिकांची मागणी केली होती.  (Pune Traffic update)

त्याअनुषंगाने आज महापालिकेत बैठकीत होऊन सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार संभाव्य वाहतूककोंडी टाळून कॅरेज वे उपलब्ध आहे, अशा भागांमध्ये वाहने पार्किंगला परवानगी द्यावी. तसेच, व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढून, व्यवसायिक आणि स्थानिक नागरिकांची समस्या सोडवावी; असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले‌.

तसेच, भविष्यातील वाहने पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी गरवारे महाविद्यालयाच्या विरुद्ध बाजूस महापालिकेच्या जागेवर वाहने पार्किंगसाठी ‘पे ॲन्ड पार्क तत्वावर’ वाहनतळ सुरू करावे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने याची व्यवस्था उभी करावी, अशी सूचना ही नामदार पाटील यांनी आजच्या बैठकीत दिली. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या निर्णयावर सर्व व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


News Title | Karve Road Parking Update| Allow parking in Carriage Ways avoiding traffic jams on curved roads! | Guardian Minister Chandrakantada Patil’s instructions to traffic police and pune municipal corporation