PMPML Pune | Pune Ganesh Utsav 2023 | गणेश उत्सव काळात पीएमपी कडून ज्यादा बसेसचे नियोजन | जाणून घ्या बसमार्ग

Categories
Breaking News cultural social पुणे

PMPML Pune | Pune Ganesh Utsav 2023 | गणेश उत्सव काळात पीएमपी कडून ज्यादा बसेसचे नियोजन | जाणून घ्या बसमार्ग

PMPML Pune | Pune Ganeshotsav 2023 | गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई,सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर प्रवासी नागरीकांचे सोयीकरिता दरवर्षी प्रमाणे यंदाही पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यामध्ये 20 व 21 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर रोजी 168 बसेस जादा म्हणुन व दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवाशी गरजेनुसार 22, 26 आणि 28 सप्टेंबर या कालावधीत 654 जादा बसेसचे गणेशोत्सवाकरीता नियोजन करण्यात आलेले आहे. (Extra Buses From PMPML For Pune Ganeshotsav 2023)

नागरिकांचे वाहतुकीचे सोयीसाठी खाली नमूद केलेल्या स्थानकावर प्रवासी गर्दीनुसार या कालावधीत खास बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीमध्ये रात्री 10.00 नंतर बंद राहणार असून रात्री 10.00 नंतर सर्व बसेस यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहणार आहेत.
  • रात्री 10.00 नंतर बससेवेसाठी प्रचलित दरामध्ये रूपये 5 रुपये जादा दर आकारणी करण्यात येईल.
  • गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्री बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांना रात्री 12.00 वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत. (Extra Buses From PMPML For Pune Ganeshotsav 2023)
  • गणेशोत्सव कालावधीत शहर विभागातील रस्ते सायंकाळी पोलीस खात्याकडून बंद ठेवले जातात. त्यामुळे शहराच्या आतील भागातील बससेवा पर्यायी मार्गाने चालू ठेवण्यात येईल.

गणेशोत्सव कालावधीत खालील बसस्थानकांवरून त्या समोर दर्शविलेल्या ठिकाणांपर्यंत रात्री गरजेनुसार बससेवा देण्यात येणार आहे.

  1. स्वारगेट बस स्थानक – कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, नऱ्हे, आंबेगाव, जांभुळवाडी, अप्पर इंदिरानगर, मार्केटयार्ड, सांगवी, आळंदी.
  2. नटराज हॉटेल / सिंहगड रोड – वडगांव, धायरी व गरजेनुसार सिंहगड, खानापूर.
  3. स्वारगेट डेपो बस स्थानक- हडपसर, कोंढवा हॉस्पीटल.
  4. महात्मा गांधी बस स्थानक – कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक , साळुंके विहार.
  5. हडपसर गाडीतळ बस स्थानक – स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, ऊरूळी कांचन, मांजरी, थेऊर, फुरसुंगी, देवाची उरुळी.
  6. मोलेदिना हॉल / ससून रोड बस स्थानक – विश्रांतवाडी, लोहगाव, वाघोली, विमाननगर, वडगाव शेरी, आळंदी.
  7. डेंगळेपुल बस स्थानक – लोहगांव, वडगांवशेरी, मुंढवागांव/केशवनगर, शुभम सोसायटी, आनंद पार्क, तळेगांव ढमढेरे, हडपसर.
  8. म.न.पा.भवन मुख्य बसस्थानक व पेट्रोल पंप – भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देवगाव, विश्रांतवाडी, पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे गाव, तळेगाव दाभाडे, सांगवी, पिंपळे गुरव, आकुर्डी रेल्वे स्टेशन.
  9. काँग्रेस भवन बस स्थानक -कर्वेनगर, माळवाडी, एनडीए 10 नं. गेट, कोथरूड डेपो.
  10. डेक्कन जिमखाना / संभाजी पूल कॉर्नर – कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, गोखले नगर, कोथरूड डेपो.
  11. कात्रज बस स्थानक – स्वारगेट करीता.
  12. म.न.पा. पंप बस स्थानक – बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुसगांव करीता.
  13. अप्पर डेपो बस स्थानक – स्वारगेट करीता.
  14. धनकवडी बस स्थानक – स्वारगेट करीता.
  15. निगडी बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
  16. भोसरी बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
  17. चिंचवडगांव बस स्थानक – म.न.पा. भवन करीता.
  18. पिंपरी मेट्रो स्टेशन – चिंचवड, डांगे चौक, निगडी, पिंपरी, काळेवाडी, चिखली.

दि. 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक हा बंद होत असल्याने स्वारगेट चौकातील बस थांबे खालील प्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आले आहेत.

मूळ बसस्थानाचे नाव – मार्ग – तात्पुरते बसेस सुटण्याचे ठिकाण

  1. शाहु महाराज स्थानक (स्वारगेट) – सातारा रोडने कात्रज , मार्केटयार्ड करीता लक्ष्मी नारायण चौक
  2. नटराज बस स्थानक – सिंहगड रोडकडे जाणे करिता – पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) बस थांबा
  3. स्वारगेट स्थानका बाहेर – सोलापूर रोडने पुलगेट, हडपसर करिता – वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ)
  4. स्वारगेट स्थानका बाहेर – भवानी पेठ, नानापेठ, रास्तापेठ करिता – वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ)

रात्री 2.00 वाजेपर्यंतच जादा बसेसचे संचलन सुरु राहील.

दि.22 ते 28 सप्टेंबर पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार स्वारगेट ते निगडी अशा रात्री (यात्रेकरिता) जादा बसेस सोडण्यात येतील.

गणेशोत्सव कालावधीत गणेश भक्तांच्या सोयीसाठी वरील प्रमाणे जादा बस संचलन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्ते बस वाहतुकीसाठी बंद राहणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवसभराच्या संचलनामध्ये नेहमीच्या शिवाजीरोड, बाजीरावरोड, लक्ष्मीरोड, टिळक रोड या रस्त्यांवरून संचलनात असलेल्या बसेसच्या मार्गामध्ये आवश्यकते नुसार बदल करण्यात येणार आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Pune Ganesh Utsav Meeting | गणेश उत्सव नियोजनाबाबत उद्या अजित पवार यांच्यासोबत बैठक

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Pune Ganesh Utsav Meeting | गणेश उत्सव नियोजनाबाबत उद्या अजित पवार यांच्यासोबत बैठक

 
Pune Ganesh Utsav Meeting | पुणे शहरात गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान पुणे गणेश उत्सव (Pune Ganesh Utsav)  नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) उद्या सकाळी 11:30 वाजता गणेश मंडळासोबत बैठक घेणार आहेत. पोलीस मुख्यालय, शिवाजी नगर येथे ही बैठक होणार आहे. (Pune Ganesh Utsav Meeting) 
 पुणे शहर आणि जिल्हयात गणेश उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. यावर्षीचा पुणे शहरातील गणेशोत्सव (Pune Ganesh Utsav) 19 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यानुषंगाने नियोजनाकरिता शहरातील गणेशोत्सव मंडळे (Ganesh Mandal), पोलीस विभाग (Pune Police) यांची संयुक्त बैठक 8 सप्टेंबर  रोजी पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) आयोजित केली आहे. नुकतीच नीलम गोर्हे यांनी गणेश मंडळासोबत बैठक घेतली होती. मात्र यावरून शहरात वाद सुरु झाला होता. त्यानुसार आता अजित पवार उद्या बैठक घेणार आहेत.  (Ganesh Utsav Meeting) 
——
News Title | Pune Ganesh Utsav Meeting | Meeting with Ajit Pawar tomorrow regarding Ganesh Utsav planning

Ganesh Utsav Meeting | PMC Pune | पुणे महापालिकेची गणेश मंडळासोबत संयुक्त बैठक 28 ऑगस्ट ऐवजी 8 सप्टेंबरला

Categories
Breaking News social पुणे

Ganesh Utsav Meeting | PMC Pune | पुणे महापालिकेची गणेश मंडळासोबत संयुक्त बैठक 28 ऑगस्ट ऐवजी 8 सप्टेंबरला

Ganesh Utsav Meeting | PMC Pune |  यावर्षीचा पुणे शहरातील गणेशोत्सव (Pune Ganesh Utsav) 19 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यानुषंगाने नियोजनाकरिता शहरातील गणेशोत्सव मंडळे (Ganesh Mandal), पोलीस विभाग (Pune Police) यांची संयुक्त बैठक 28 ऑगस्ट  रोजी पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) आयोजित केली होती. मात्र काही कारणाने ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून ही बैठक आता 8 सप्टेंबर ला होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Ganesh Utsav Meeting | PMC Pune)

पुणे शहरात मागील वर्षी अंदाजे २३०० गणेशोत्सव मंडळानी पुणे महानगरपालिकेकडून मंडप उभारणीकरिता परवानग्या घेतल्या होत्या. मागील वर्षापासून पुढील ५ वर्षाच्या कालावधीकरिता सन २०१९ चे सालामध्ये देण्यात आलेल्या उत्सव मंडप, स्वागत कमानी व रनिंग मंडप इत्यादी परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. शहरातील गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीच्या परवानग्या व उत्सव कमान व रनिंग मंडप (पोलीस विभागाचे परवानगीनुसार) या पुणे मनपाकडून मोफत दिल्याजात आहेत. असे महापालिकेकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
महापालिका प्रशासनानुसार शहरातील या पूर्वीच्या गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्या पुढील ५ वर्षाकरिता ग्राह्य धरण्यात येणार असल्याने परवानगी करिता एक खिडकी योजना राबविण्याची आवश्यकता नाही. परंतु त्याबाबत गणेशोत्सव मंडळांच्या संयुक्त बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. पुणे शहराच्या नवीन हद्दीत अथवा जुन्या शहरात नव्याने परवानगी घेणाऱ्या मंडळांना संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून आवश्यक परवानग्या दिल्या जातील. (Pune News)

शहरात गणेश मूर्ती विक्री करणेकरिता मनपा मोकळ्या जागा, तसेच वाहतुकीला अडथळा न ठरणाऱ्या रस्ते पदपथावरील काही जागा व्यावसायिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ध्वनी प्रदुषणाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या सूचना/बंधने यांचे पालन करणे सर्व गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक राहणार असून त्यावर पोलीस विभागाचे नियंत्रण राहील.  महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देणेची कार्यवाही शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार जिल्हाधिकारी यांचे
स्तरावर पुणे शहरात केली जाईल. (Ganesh Utsav Meeting) 
गणेशोत्सव कालावधीत शहरातील स्थानिक रहिवाशी/नागरिकांना विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे तक्रारी करणेकरिता सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून पुणे मनपातर्फे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अशा तक्रारींचे निवारण करणेची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. गणेशोत्सव कालावधीत ध्वनीप्रदूषण, पर्यावरण नियंत्रण तसेच इतर बाबींविषयी शासनाकडून यापूर्वी आलेले आदेश/सूचना व यानंतर वेळोवेळी येणाऱ्या आदेशांचे गणेश मंडळांना पालन करणेबाबत सूचना दिल्या जातील. असे ही महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News) 
——-
News Title | Ganesh Utsav Meeting | PMC Pune | Joint meeting of Pune Municipal Corporation with Ganesh Mandal on September 8 instead of August 28

MLA Ravindra Dhangekar | गणेशोत्सवासाठी टिळक पुतळा मेट्रोचे काम १ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा | आमदार रवींद्र धंगेकर

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

MLA Ravindra Dhangekar | गणेशोत्सवासाठी टिळक पुतळा मेट्रोचे काम १ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा | आमदार रवींद्र धंगेकर

MLA Ravindra Dhangekar | गणेशोत्सव, दहीहंडी, श्रावण महिना इ.  सणांचे (Festival) दिवस जवळ आले आहेत. यामुळे मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरातील मेट्रोचे (Pune Metro) काम येत्या १ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावे असे आवाहन आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) आणि प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे व अन्य अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केले. (MLA Ravindra Dhangekar)

पुणे शहरातील मानाचे गणपती यांचे प्रमुख, पुणे मेट्रोचे अधिकारी  यांच्या बरोबर टिळक पुतळा ते मंडई परिसरामध्ये पहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये गणेश मंडल, छोटे व्यापारी व घटकांच्या अडचणीवर सारविस्तार चर्चा झाली. त्यावर उपाय योजना काय असाव्यात, काय कराव्यात याबद्दल सुद्धा कालबद्ध वेळापत्रक निश्चित करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या अॅड. रुपाली ठोंबरे पाटील, बाळासाहेब मारणे, प्रवीण परदेशी, महेश सूर्यवंशी, भोळा वांजळे, विकास पवार, प्रसाद कुलकर्णी, सुरेश कांबळे आदि या भेटी प्रसंगी उपस्थित होते. (Pune Ganesh utsav)


News Title |MLA Ravindra Dhangekar | Complete the work of Tilak Putala Metro by 1st August for Ganeshotsav MLA Ravindra Dhangekar