Ganesh Idol Immersion | गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन वाघोली येथील खाणीमध्ये | महापालिकेचे नियोजन तयार! 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Ganesh Idol Immersion | गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन वाघोली येथील खाणीमध्ये | महापालिकेचे नियोजन तयार!

 

Ganesh Idol Immersion | पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या (Eco friendly Ganeshotsav) अनुषंगाने पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत (PMC Solid Waste Management Department) नियोजन करण्यात आले आहे. गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन सन्मानपूर्वकरित्या वाघोली येथील खाणीमध्ये (Wagholi Mine) करण्यात येणार असलेबाबत  जिल्हाधिकारी,  प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ (MPCB), पोलीस आयुक्त तसेच  पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच यांना कळविण्यात आले आहे. वाघोली येथे खाणीमध्ये गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन करणेबाबत परिमंडळ निहाय दिवस ठरवून देण्यात आलेले असून त्यानुसार गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन केले जाणार आहे.

.
• पुणे महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदाद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.
– १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ४२ बांधलेले हौद, एकूण २६५ ठिकाणी ५६८ लोखंडी टाक्या याठिकाणी मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.
• १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण २५२ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे / मूर्ती दान केंद्रे उभारण्यात आली असून नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावे याबाबत क्षेत्रिय कार्यालयांमार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
• क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी २५६ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था करण्यात येणार आहे.
-पुणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सर्व यंत्रणाची सविस्तर माहिती www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
• कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये असे आवाहन मा. महापालिका आयुक्त यांनी सर्व पुणेकर नागरिकांना केले आहे.
• गणेशोत्सव २०२३ मध्ये पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ECOEXIST संस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व इतर विविध स्वयं सेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुर्नवापर केला जाणार आहे. शाडू माती एक मर्यादित संसाधन
असून या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होऊन नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो. या शाडू मातीचा पुर्नवापर केल्यास मूर्तीकारांना मूर्ती/माती परत देऊन त्यांना मदत करता येऊ शकते. पुनरावर्तन उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती व शाडू माती संकलनाच्या
केंद्राविषयीची सविस्तर माहिती www.punaravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून
देण्यात आली आहे.

निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी मुर्त्या किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे प्रासादिक निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतक-यांना देण्यात येते.
-कुठल्याही वस्तू किंवा इतर कचरा निर्माल्यात टाकू नये असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे
– कमिन्स इंडिया कंपनीच्या CSR च्या माध्यमातून निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे.
– क्षेत्रिय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेश मूर्तीचे पुर्नविसर्जन करणेची व्यवस्था वाघोली येथील खाणीमध्ये तीन पाळ्यांमध्ये आवश्यक सेवक व पर्यवेक्षकीय अधिकारी नेमून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आली आहे.
• सर्व क्षेत्रिय कार्यालयांना गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात सर्वत्र सार्वजनिक स्वच्छता राखली जाण्याच्या अनुषंगाने सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, ओपन प्लॉट, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छता राखणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
•वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक करण्याबाबत नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयास कळविण्यात आले आहे.

• वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी रखवालदार नियुक्त करण्याबाबत सुरक्षा विभागास कळविण्यात आले आहे.
• क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक गाड्यांची उपलब्धता करणेबाबत मोटार वाहन विभाग कळविण्यात आले आहे.

• पर्यावरणपूरकरीत्या गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले असून पुणे महानगरपालिकेच्या सोशल मिडीया माध्यमाद्वारे VMDs, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स इ.द्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
• पुणे महानगरपालिकेमार्फत गणेशोत्सव कालावधीमध्ये एकूण ४०० मोबाईल टॉयलेट व १५० फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
• पुणे महापालिकेने पुणे शहरामधील ११८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (CT/PT) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून दिली आहे. टॉयलेटसेवा app मध्ये पुणे शहरामधील कुठलाही पता टाकून पुणे महापालिकेची सार्वजनिक स्वच्छतागृहे शोधता येतील.
– गणेशोत्सवाच्या आधी पुणे शहरामधील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये QR Code स्टिकर्स लावले जातील. टॉयलेटसेवा app चा वापर करून नागरिकांनी या माहितीचा फायदा घ्यावा, सार्वजनिक स्वच्छतागृहांविषयीचा आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत आणि issues रिपोर्ट करून कळवावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

Prithviraj Chavan | ‘फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती’ उपक्रमाचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले उद्घाटन

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Prithviraj Chavan | ‘फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती’ उपक्रमाचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले उद्घाटन

 

Prithviraj Chavan | पुणे शहर जिल्हा काँग्रेस पार्टी, व्यापारी सेलच्या (Pune Congress Vyapari cell) वतीने ” फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती ” चे वितरण सुमारे ५५५ स्थानिक नारिकांना देण्याचे उदघाटन  पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) ( माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात प्रभाग क्रमांक २८ मधील काही रहिवासीयांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते श्रीच्या मूर्तीचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी अरविंद शिंदे ( अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ), मोहन जोशी, अभय छाजेड, विजयकांत कोठारी, पन्नालालजी लुनावात, स्नेहल पाडाळे, नीता राजपूत,अरूण कटारीया, मनीषा फाटे, सोनकांबळे, सुरेश चौधरी, सुरेश चौधरी, उमेश मांडोत, मनीष जैन, सीमा महाडिक, अनुसया गायकवाड ,रझीया बल्लारी, व अनेक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. भरत सुराणा ( अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँगेस व्यापारी सेल ) व योगिता सुराणा यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार केला. (Pune Congress)

या प्रसंगी पृथ्वीराज चव्हाण आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सध्या महागाई प्रचंड वाढलेली आहे, आणि जवळजवळ मोफत दरामध्ये म्हणजे ५ रुपयात भरत सुराणा व योगिता सुराणा गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. गणेश मूर्ती गोळा करतात व अतिशय मोफत दरानी म्हणजे ५ रुपयात गोरगरिब समाजा मध्ये भरत सुराणा व त्यांच्या पत्नी योगिता सुराणा वितरण करण्याचे सुंदर उपक्रम राबवतात, लॉटरी द्वारे नागरिकांना बापाचे वितरण केले जाते, त्यामुळे गणपती बाप्पाच ठरवतो कोणाच्या घरी जायचे, घरगुती आनंदामध्ये हा सण साजरा करता यावा या मागचा उद्धेश चांगला आहे. या ठिकाणी आपल्याला खूप धन्यवाद देतो, आणि अभिनंदन करतो तुम्ही पुणे शहरात एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल पाडाळे यांनी केले तर योगिता सुराणा यांनी सर्वांचे आभार मानले.

Ganesh Utsav 2023 | पुणे महापालिकेकडून गणेश उत्सवाची तयारी सुरु | पर्यावरण गणेश उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Ganesh Utsav 2023 | पुणे महापालिकेकडून गणेश उत्सवाची तयारी सुरु | पर्यावरण गणेश उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे

Ganesh Utsav 2023 |पुणे  महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) गणेश उत्सव २०२३ (Ganesh Utsav 2023) ची तयारी सुरु करण्यात आली आहे.  प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) पासून बनविलेल्या गणेश मूर्तीवर बंदी असल्याने पीओपी (POP) गणेश मूर्ती (Ganesh Idol) खरेदी करू नये. तसेच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन (Environment Conservation) करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांनी १२ मे २०२० रोजी मूर्ती बनविणारे कारागीर आणि उत्पादक यांच्यासाठी  मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. महापालिका अतिररिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (PMC Additional Commissioner Dr Kumar Khemnar) यांच्याकडून सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव- २०२३ साजरा करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. (Ganesh Utsav 2023)

१) केवळ नैसर्गिक जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल जसे कि, पारंपारिक शाडू माती / चिकणमाती वापरून बनवलेल्या कच्चा मालापासून मूर्ती तयार करणे.  [ कोणताही विषारी अजैविक कच्चा माल तसेच प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी), प्लास्टिक आणि थरमाकोल (पॉलीस्टीरिन) यांचा वापर होणार नाही.]

२) मूर्तींचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर केला जाऊ शकतो.

३) मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल पाणी आधारित रंग, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा

[ विषारी आणि नॉन बायो डीग्रेडेबल (अविघटनशील) रासायनिक रंग / ऑईल पेंट्स, इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंटसच्या वापर करण्यास सक्त मनाई आहे.

४) नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावे. रंगविण्यासाठी फक्त नैसर्गिकरीत्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग (फुले, साल, पुंकेसर, पाने, मुळे, बिया, फळे) खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रंगाचा वापर करावा.

[ विषारी रसायने असलेली डिसपोजेबल साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.]

 

सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते कि, उपरोक्त मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांचेकडून मूर्ती खरेदी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

———-

News Title | Ganesh Utsav 2023 | Preparations for Ganesh Utsav have started from Pune Municipal Corporation Guidelines for Environmental Ganesh Utsav