Art Of Living | आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे | जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हींगने (Art of living) अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवले. शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून देण्याचे हे अतुलनीय कार्य आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी काढले.

कोथरूड येथे आयोजित भक्ती उत्सव-महासत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, गुरूदेव श्री श्री रविशंकर, आमदार भीमराव तापकीर, शहाजी बापू पाटील, उद्योजक अनिरुद्ध देशपांडे, सूर्यकांत काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विशाल गोखले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून अनेक लोकांचे जीवन सुधारत असताना सामाजिक दायित्वही गुरूदेवांनी आपल्याला शिकवले. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि महाराष्ट्रातील १७ नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य आर्ट ऑफ लिव्हींगच्या स्वयंसेवकांनी केले. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये आर्ट ऑफ लिव्हींग अग्रेसर होती.

गुरूदेव भारतीय संस्कृतीचे संदेशवाहक

गुरूदेव श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi shankar) यांनी संपूर्ण भारतात आणि जगातील अनेक देशात भारतीय संस्कृती आणि भारतीय अध्यात्म लोकांमध्ये जागृत केले आणि त्यांच्या रुपाने भारतीय संस्कृतीचे संदेश वाहक पहायला मिळाले. जागतिक शांती परिषदेच्या माध्यमातून जगातल्या सर्व धर्मांना एकत्र करण्याचे कार्य गुरूदेवांनी केले. हे करत असताना भारतीय विचारांचे श्रेष्ठत्व स्वामी विवेकानंद यांच्यानंतर जगाला पटवून देण्याचे कार्य गुरूदेवांनी केले.

विज्ञानासह अध्यात्म हा श्री श्री रविशंकर यांच्या विचारांचा गाभा आहे. या विचारांमुळेच जगाच्या पाठीवर अस्तित्वात असलेली अत्यंत प्राचीन सभ्यता म्हणून भारताकडे पाहिले जाते, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

अथर्वशिर्ष पठणाचा विक्रम पुण्यात झाल्याचे नमूद करून पुणे हे बुद्धी अणि विद्येचे माहेरघर असल्याने इथेच अथर्वशिर्षाचे पठण होणे स्वाभाविक आहे आणि अथर्वशिर्ष पठणाचा विक्रम पुण्यातच होऊ शकतो, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

यावेळी श्री श्री रविशंकर म्हणाले, पुणे शहरात आणि महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीचा सोहळा साजरा होतो. तीक्ष्ण बुद्धी आणि कोमल भाव ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. आयुर्वेद, योग, ध्यान, आध्यात्मिक ज्ञान ही भारताची श्रेष्ठ संपत्ती आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सामुहिक अथर्वशिर्ष पठणाचा जागतिक विक्रम करण्यात आला. या विक्रमाचे प्रमाणपत्र एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या डॉ.चित्रा आणि वर्ड बुक ऑफ लंडनचे डॉ.दीपक हरके यांच्या हस्ते गुरूदेव श्री श्री रविशंकर यांना प्रदान करण्यात आले.

Girish Gurnani | स्त्याच्या मध्ये आलेले बांधकाम हटवण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

स्त्याच्या मध्ये आलेले बांधकाम हटवण्याची मागणी

कोथरुड मधील किनारा चौकात असलेल्या भुयारी मार्गावरील उच्छवासाचे (व्हेंटीलेशन) बांधकाम रस्त्याच्या मध्ये आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. हे बांधकाम हटवावे अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. पौडरस्त्यावर एमआयटी व जयभवानीनगर येथे असलेल्या भुयारी मार्गाला मध्यभागी कोठेही व्हेंटीलेशनसाठी सोय केलेली नाही. मात्र किनारा चौकात मध्यभागी व्हेंटीलेशनसाठी काही जागा सोडली आहे. या जागेला बंदिस्त केले असल्याने तेथून व्हँटीलेशन होत नाही. तसेच मेट्रोच्या कामानंतर हे बांधकाम नेमके रस्त्याच्या मध्ये येत असल्याने छोटेमोठे अपघात होतात. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच हे बांधकाम हटवावे व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी केली असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरुड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. अपघाताला कारण असलेले हे बांधकाम हटवावे. या बांधकामाचा आडोसा घेवून येथे काही मालवाहू ट्रक लावले जातात. त्यामुळे आधीच अरुंद बनलेला रस्ता आणखी अरुंद बनून वाहतुक कोंडी होते. हे बांधकाम न पाडल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. खाजगी अभियंता कैलाश मारुती पारगे म्हणाले की, किनारा चौकात भुयारी मार्गावरील मधोमध असलेलं बांधकाम भुयारी मार्गातील हवा खेळती राहण्याच्या उद्देशाने केले असावे. परंतु या बांधकामाची व भुयारी मार्गाची पाहणी केली असता त्याचा तसा कोणताही उपयोग होत नसल्याचे दिसते. वातानुकूलन करण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध असल्याने हे बांधकाम हटवण्यास तांत्रिक दृष्ट्या काही अडचण आहे असे वाटत नाही. कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे म्हणाले की, हे बांधकाम हटवण्यासंदर्भात मागणी आली आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा यासांठी प्रकल्प विभागाकडे सल्ला मागवला आहे. हवा खेळती राहण्यासाठी केलेले हे बांधकाम आहे. ते हटवल्यास त्याचा भुयारी मार्गावर काय परिणाम होईल, काय पर्याय असू शकतात हे पाहून प्रकल्प विभागाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल.

NCP Youth | कोथरूड राष्ट्रवादी युवक तर्फे युवशक्तीचा सन्मान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कोथरूड राष्ट्रवादी युवक तर्फे युवशक्तीचा सन्मान

स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजेच १२ जानेवारी ही दरवर्षी युवा दिन म्हणून साजरी करण्यात येते. याला अनुसरूनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दरवर्षी युवांचा सन्मान करण्यात येतो. हीच प्रथा पुढे घेऊन जात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष श्री गिरीश गुरूनानी यांनी कोथरूड मधील विविध क्षेत्रात नाव उंचावणाऱ्या व विशिष्ट कर्तबकारी बजावणाऱ्या युवांचा सन्मान केला.

या प्रसंगी युवांचा मनोबल उंचावण्यासाठी व त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यासाठी राष्ट्रवादी कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन दादा मानकर, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रभारी सनी भाऊ मानकर ,राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष किशोरजी कांबळे, व विद्यार्थी अध्यक्ष विक्रम जाधव,शुभम माताळे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.

इनेबलर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष अमोल शिनगारे व उपाध्यक्ष अभिजीत शेडगे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. शिनगारे व शेडगे हे स्वतः दिव्यांग असून दिव्यांगांसाठी बरेच कार्य करत असतात. दिव्यांगांसाठी व्यवसाय सुरू करणे असो किंवा स्पर्धा भरवणे असो, दिव्यांगांना स्वतंत्र व समर्थ बनवण्याचे कार्य ही मंडळी अतिशय प्रबळतेने करत असते.

दिव्यांग खेळाडू रेखा सचिन पडवळ व सुचित्रा खरवंडीकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांगत्वावर मात करत या दोन्ही युवतीने कोथरूडचे व पुणे शहराचे नाव देशात उंचावण्याचे काम केलेले आहे. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची धमक या युवतीने दाखवली आहे असे गुरनानी म्हणाले…

थ्रो बॉल राष्ट्रीय खेळाडू रिया पासलकर, रोल बॉल महाराष्ट्र राज्याची कॅप्टन अंजली कपूर, परिचारिका प्रीती भास्कर (लोढा हॉस्पिटल) व निर्भीड पत्रकार सागर येवले यांचा ही या वेळी सन्मान करण्यात आला. या सर्व व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात कर्तुत्व बजावले आहे तसेच ही मंडळी येत्या काळात देशाचे नाव उंचविण्याचे काम करेल यात तिळमात्र शंका नाही असे गुरनानी म्हणाले..

याबरोबरच पोलीस दलात कार्यरत असलेल्या युवाशक्तीचा ही सन्मान करण्यात आला.पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या उपस्थित पोलीस कॉन्स्टेबल विनायक पाडळे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल बारट, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत जमदाडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत साखरे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ आटोळे, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू राठोड, पोलीस कॉन्स्टेबल संजय दहिभाते, पोलीस वैशाली परदेशी, पोलीस नाईक ललिता ओतारी, पोलीस कॉन्स्टेबल साधना समिंदर यांचा सन्मान राष्ट्रवादी युवक कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांच्या मार्फत करण्यात आला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनाथ खिलारे,धनंजय पायगुडे, अमोल गायकवाड,ऋषिकेश कडू,श्रीकांत भालगरे,रवी गाडे,शशांक काळभोर,आशिष शिंदे,रोहिदास जोरी आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते…

Water closure | शिवाजीनगर, कोथरूड परिसराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

शिवाजीनगर, कोथरूड परिसराचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

गुरुवार  रोजी कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील पुणे मेट्रोचे कामांतर्गत पाण्याची मुख्य वितरण नलिका शिफ्ट करावी लागणार आहे. तसेच चांदणी चौक येथे प्रथमेश सोसायटी लगत कोथरूड भागाला पाणी पुरवठा करणारी १६” इंची एम. एस. जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी या  भागातील पाणी पुरवठा बंद ठेवावा
लागणार आहे. असे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

पाणीपुरवठा न होणारा भाग पुढीलप्रमाणे :
शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसर, सिव्हीलकोर्ट, कपोते गल्ली, सिमला ऑफिस परिसर, मोदीबाग परिसर नरवीर तानाजी वाडी, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, पाटील इस्टेट इ. कोथरूड भागातील शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, उजवी, डावीभुसारी कॉलनी, वेद भवन रोड
वरील भाग, डुक्करखिंड हिलव्हिव सोसायटी वूड्स रॉयल सोसायटी, परमहंसनगर, चढावरचा भाग, लक्ष्मीनगर, राहुल टॉवर, मुठेश्वर कॉलनी, गुरुजन सोसायटी इ.

तसेच वरील भागाचा पाणी पुरवठा दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. ०६/१/२०२३ रोजी उशिरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

MP Supriya Sule | NCP Youth | सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल माजी नगरसेविके विरोधात पोलिसात तक्रार | कोथरूड युवक राष्ट्रवादी आक्रमक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल माजी नगरसेविके विरोधात पोलिसात तक्रार

| कोथरूड युवक राष्ट्रवादी आक्रमक

पुणे येथील कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये आज कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांनी शिंदे गटातील माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला खोटा फोटो प्रसिद्ध केल्याचे या वेळी गुरूनानी यांनी सांगितले. त्यांनी पुरावा म्हणून फोटो ची मूळ प्रत तसेच म्हात्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या खोट्या फोटो ची प्रत पोलिसांकडे सुपूर्द केली. तसेच म्हात्रे यांच्या वर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप  यांच्या कडे दिले.

 

NCP Youth | Girish Gurnani | राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गुजरात कॉलनी,वनाज कॉर्नर परिसरामध्ये  शाखा उद्घाटन

Categories
Breaking News Political पुणे

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गुजरात कॉलनी,वनाज कॉर्नर परिसरामध्ये  शाखा उद्घाटन

कोथरूड येथील प्रभाग क्रमांक 31 मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची भव्य शाखा उद्घाटन आज पार पडली. या शाखेचे उद्घाटन हर्षवर्धन मानकर,अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड व किशोर कांबळे,अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला हजेरी लावून युवांनी व इतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे,गुजरात कॉलनी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे काम या शाखेचे माध्यमातून होणार असल्याची खात्री असल्याचे कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणले.

कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष  गिरीश गुरुनानी आणि विधानसभा उपाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा सांभाळली होती.

शाखेच्या अध्यक्ष पदी पृथ्वी दहीवाळ आणि उपाध्यक्ष पदी दत्ता दिघे यांची नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रभागचे अध्यक्ष तेजस बनकर आणि संघटक मंगेश भोंडवे यांनी केले

याप्रसंगी युवक कार्याध्यक्ष मोहित बराटे ,नवनाथ खिलारे,धनंजय पायगुडे, शशांक काळभोर,विजय बाबर, आशिष शिंदे, लखन सौदागर, रवी गाडे,ऋषिकेश शिंदे,मिलिंद शिंदे,आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Kothrud : Girish Gurnani : पावसाळ्यापूर्वी कोथरूडमधील सर्व कामे पूर्ण करावीत : गिरीश गुरनानी यांची मागणी

Categories
PMC पुणे

पावसाळ्यापूर्वी कोथरूडमधील सर्व कामे पूर्ण करावीत

: कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांची मागणी

पुणे : पावसाळा सुरू होण्यास काही महिनेच उरले आहेत. प्रत्येक वर्षी पावसामुळे कोठे ना कोठे मोठे नुकसान होत असते. याचीच दक्षता म्हणून कोथरूडमध्ये पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत. मागच्याचवर्षी काही झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरले, काही भागात झाडे पडली, फलक उन्मळून पडली, उघड्या डींपीमध्ये पाणी शिरले, अशा भरपूर गोष्टींमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, असे निवेदन कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड क्षेत्रिय अधिकारी केदार वझे यांना यावेळी दिले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्यावर्षीप्रमाणे यावषी ही परिस्थिती येऊ नये यासाठी आपण पावसात पाणी तुंबणाऱ्या भागांची पाहणी करावी, चेंबर साफ करावी, पूरनियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा. पावसाळ्यात गटारे तुबुंन घाणीचे साम्राज्य पसरले जाते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो त्याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच मान्सून पूर्व नियंत्रण उपाययोजनांशी स॔ब॔धित कामे प्राधान्याने पार पाडावीत, इ. सर्व कामे जर पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्यास नागरिकांना होणाऱ्या मोठ्या त्रासातून मुक्तता होईल.

यावेळी राष्ट्रवादी युवक चे शशांक काळभोर, सौरभ ससाणे,संकेत शिंदे आदि उपस्थित होते.

NCP Youth Kothrud : अंध विद्यार्थिनींना उपयोगी साहित्याचे वाटप करत प्रशांत जगताप यांचा वाढदिवस साजरा : राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदार संघाचा उपक्रम 

Categories
cultural Political पुणे

अंध विद्यार्थिनींना उपयोगी साहित्याचे वाटप करत प्रशांत जगताप यांचा वाढदिवस साजरा

: राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदार संघाचा उपक्रम

राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने ‘द पूना स्कुल ऑफ ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) च्या 95 अंध विद्यार्थिनींना उपयोगी साहित्याचे वाटप ,भोजन कार्यक्रम आणि फळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष मा प्रशांत दादा जगताप यांनी शाळेतील अंध विध्यार्थींसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला.

प्रशांत दादा जगताप यावेळी बोलताना म्हणाले, ‘या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले. जेवणाचा आनंद घेताना अंध विद्यर्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता’.तसेच माझ्या वाढदिवसाचा हा अतिशय अविस्मरणीय क्षण म्हणून माझ्या नेहमी स्मरणात राहील

‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’ असे ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरुनानी म्हणाले.

या वेळी शहर युवक अध्यक्ष मा.किशोर कांबळे, मिलिंद वालवडकर,केदार कुलकर्णी,शेखर तांबे,सौरभ ससाणे,ओंकार शिंदे,सुनील हरळे,किशोर भगत,मधुकर भगत, ऋषिकेश शिंदे,श्रीकांत भालगरे,ऋषिकेश कडू,अजु शेख,आदी सहकारी उपस्थित होते.

NCP Yuvak : Karvenagar : कर्वेनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करणार : गिरीश गुरनानी

Categories
Political पुणे

कर्वेनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करणार : गिरीश गुरनानी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कर्वेनगर परिसरामध्ये २ शाखांचे  उद्घाटन

पुणे : कर्वे नगर येथील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या २ शाखांचे भव्य उद्घाटन आज पार पडले. कॅनल रोड चौक कमिन्स कॉलेज जवळ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दोन ठिकाणी स्थित असलेल्या या शाखांचे उद्घाटन  हर्षवर्धन मानकर,अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड व किशोर कांबळे,अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला हजेरी लावून युवांनी व इतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कर्वेनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे काम या शाखांच्या माध्यमातून होणार असल्याची खात्री असल्याचे कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणले.

यावेळी स्थानिक युवा नेते स्वप्निल दुधाने म्हणाले की येत्या १५ दिवसात कर्वेनगर परिसरामध्ये आणखीन १५ नवीन शाखांचे भव्य उद्घाटन करणार असल्याचे शब्द त्यांनी कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांना दिले

कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष  गिरीश गुरनानी आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपाध्यक्ष श्री. स्वप्नील दुधाने यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा सांभाळली होती.


याप्रसंगी शहर युवक कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, बंडु शेठ तांबे, संतोष बराटे, रेश्माताई बराटे, पल्लवीताई शेडगे, निलेश शिंदे, धनंजय पायगुडे, समीर बराटे, मोहित बराटे, किशोर शेडगे, मधुकर भगत, वैभव कोठुळे, पुष्कर भिलारे, तेजस भागवत, श्रीकांत बालघरे, ऋषिकेश कडू, विजय बाबर, आशिष शिंदे, लखन सौदागर, शशांक काळभोर,अमोल गायकवाड,मंगेश भोंडवे,प्रीतम पायगुडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Traffic problem in Kothrud : Youth NCP : कोथरूड मधील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादी चे पोलिसांना साकडे

Categories
Breaking News Political social पुणे

कोथरूड मधील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादी चे पोलिसांना साकडे

पुणे : कोथरूड मधील गुजरात कॉलोनी व आझाद नगर परिसरातील रहिवासी व व्यापारी यांच्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने पुढाकार घेतला. वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादीने  पोलिसांना साकडे घातले असून समस्या सोडवण्याची मागणी करण्यात  आली आहे.

अनियंत्रित आणि अनियमित वाहतुकी बद्दलच्या तक्रारी येथील रहिवासी यांनी कोथरूड युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांच्या कडे मांडल्या होत्या. नो पार्किंग मध्ये गाड्या लावणे, पी १, पी २ चे आखलेल्या धोरणानुसार पालन न करणे, रस्त्याच्या कडेलाच चार चाकी गाड्या लावून खरेदी साठी दुकान मध्ये जाणे अश्या अनेक चिंता व त्या मुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील लोकांनी शेवटी युवक राष्ट्रवादी कडे धाव घेतली. या बाबींमुळे पादचाऱ्यांना अतोनात त्रास तर सहन करावाच लागतो पण त्याचसोबत त्यांच्या असुरक्षिततेची टांगती तलवार ही असते. असे या लोकांनी आज गुरूनानी यांना सांगितले. या समस्यांवर त्वरित उपाय म्हणून आज कोथरूड वाहतूक पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांची भेट घेऊन गुरूनानी यांनी निवेदन दिले.

पायगुडे यांनी तत्काळ कारवाई करण्याची हमी यावेळी युवक राष्ट्रवादी व कोथरूड वासियांना दिलेली आहे. या वेळी माध्यमांशी बोलत असताना गुरूनानी म्हणाले “पोलिसांनी आम्हाला ही समस्या त्वरित सोडवण्याची हमी दिलेली आहे आणि मी आशा करतो की तसेच होईल व या परिसरातील अनियंत्रित वाहतुकीची कोंडी सुटून येथील रस्ता व पादचाऱ्यांबरोबरच येथील रहिवासी व व्यापारी देखील मोकळा श्वास घेऊन येथे वावरू शकतील.”