Pune Rain | पुण्यात सिंहगड रोड, कोथरूड मध्ये पावसाने नागरिकांची तारांबळ | महापालिका आयुक्त जातीने उपस्थित

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Pune Rain | पुण्यात सिंहगड रोड, कोथरूड मध्ये पावसाने नागरिकांची तारांबळ | महापालिका आयुक्त जातीने उपस्थित

Pune Rain | पुणे – पुण्यात काल उत्साहामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Immersion Rally) सुरू असताना सायंकाळच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी, वारजे, माळवाडी, सूस, बावधन यासह इतर भागात दाणादाण उडाली. कोथरूड येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय या भागात अनेक सोसायट्या, बंगल्यांच्या आवारात पाणी घुसले. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने गोंधळ उडाला. दरम्यान यावर महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी (PMC Commissioner and Additional Commissioner) याचा आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

आयुक्त विक्रमकुमार हे टिळक चौकात मानाच्या गणपतीचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. मात्र, या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तेथून काढता पाय घेत थेट अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घ्यावी लागली.आज दुपारी चार नंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. कात्रज, आंबेगाव, धायरी, नर्हे, खडकवासला, वारजे, माळवाडी, कर्वेनगर, कोथरूड, सुस, बावधन या भागात प्रचंड मोठा पाऊस झाला. अवघ्या काही मिनिटातच रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौक, वडगाव पूल, पाटील हॉस्पिटल, इनामदार चौक येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली.अनेक नागरिकांच्या गाड्या बंद पडल्या. पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने सिंहगड रस्त्यावर धोकादायक स्थिती निर्माण झालेली होती. सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्याने आणि क्षेत्रीय कार्यालयामार्फत चेंबर मधील कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू केल्याने पाण्याचा निचरा झाला.अशी स्थिती सुस बावधन मध्ये देखील निर्माण झाली होती. (Pune Rain News)
——