7th Pay Commission | PMC Pune Employees | सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चितीबाबत मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांचे महत्वाचे आदेश

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

7th Pay Commission | PMC Pune Employees | सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चितीबाबत मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांचे महत्वाचे आदेश

7th Pay Commission | (PMC Pune Employees | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकाऱ्यांच्या / कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील (7th Pay Commission) वेतन निश्चितीमध्ये व त्यानुसार निघणाऱ्या फरकाच्या (Difference) तक्त्यामध्ये दुरुस्ती असल्यास माहिती व तंत्रज्ञान विभागाने (PMC IT Department) व वेतन बिल लेखनिकांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांचे महत्वाचे आदेश जारी झाले आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी असे आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)

– असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिकेतील आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोग नोव्हेंबर २०२१ पासून प्रत्यक्ष लागू करण्यात आलेला असून, त्यानुसार वेतन आयोगाची वेतन निश्चिती करण्यात आलेली आहे. तथापि दि. ०१/०१/२०१६ नंतर सेवानिवृत्त, मयत झालेल्या सेवकांच्या पेन्शन प्रकरणांबाबत  मुख्य लेखापरीक्षक यांनी काढलेले आक्षेप दुरुस्त करताना सेवकाचे ७ व्या वेतन आयोगाचे निश्चितीकरण बदलते. वेतन निश्चितीकरण दुरुस्त केल्याने/ बदलल्याने वेतन आयोग फरकातील रक्कमा अदा करावयाच्या असल्यास किंवा वसुली करावयाच्या असल्यास वेतन वाढ तक्त्यांवर (हिरवा तक्ता) देणे/दिला वेतन निश्चित करून अंतर्गत अर्थान्वीक्षक कडून तपासणी करून घ्यावी व त्याप्रमाणे दुरुस्त ७ व्या वेतन आयोग फरकाचा तक्ता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून दुरुस्त करून घेऊन दुरुस्त केलेल्या फरकाचे तक्ते वेतन आयोग समितीकडून तपासून घ्यावेत. सदर कार्यवाही करताना विवरण पत्र बदलण्याची आवश्यकता नाही.

तसेच पुणे महानगरपालिकेतील आस्थापनेवरील कार्यरत सेवकांच्या बाबतीत ७ व्या वेतन आयोगाच्या फरकातील दुरुस्ती निदर्शनास आल्यास व त्यामुळे ५ हत्यांची रक्कम बदलल्यास वेतन आयोग फरकातील रक्कमा अदा करावयाच्या असल्यास किंवा वसुली करावयाच्या असल्यास वेतन वाढ तक्त्यांवर (हिरवा तक्ता) देणे/दिला वेतन निश्चित करून अंतर्गत अर्थान्वीक्षक कडून तपासणी करून घ्यावी व त्याप्रमाणे दुरुस्त फरकाचा तक्ता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून दुरुस्त करून घेऊन दुरुस्त केलेल्या फरकाचे तक्ते बेतन आयोग समितीकडून तपासून घ्यावेत. सदर कार्यवाही करताना विवरण पत्र बदलण्याची आवश्यकता नाही. (PMC Pune)
पेन्शन प्रकरणांच्या अंतिम टप्प्यात हक्काच्या रजेचे वेतन अदा केले जाते, कधी ज्यादा उपभोगलेल्या वैद्यकीय/हक्काच्या रजेची वसुली केली जाते ती जर ६ व्या वेतन आयोगाप्रमाणे असेल तर ती ७ व्या वेतन
आयोगाप्रमाणे आकारणी करून दोघांमधील फरकाच्या रक्कमेचे वसुली करून घेणे. तसेच सेवानिवृत्त, मयत झालेल्या सेवकांचे यापूर्वी ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे पहिला हप्ता अदा केला असल्यास व दुरुस्तीप्रमाणे उर्वरित हप्ते अदा करावयाचे असल्यास किंवा वसुली करायच्या असल्यास सदर अदा किंवा वसूल करावयाची रक्कम वेतन फरकाच्या तक्त्यांमध्ये अद्ययावत करून अदा किंवा वसूल करण्यात यावी व उर्वरित रक्कम समान हत्यात अदा करण्यात यावी. (Pune Municipal Corporation News)