Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक

Warje DP Road | PMC Pune |  पुणे : महामार्गावरून (Highway) वारजे कर्वेनगर कोथरूड (Warje, Karvenagar, Kothrud) परिसरात येण्यासाठी पर्यायी मार्ग ठरू शकणाऱ्या वारजे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर या चोवीस मीटर रुंद  डीपी रस्त्याचे (DP Road) काम त्वरित व्हावे यासाठी आज महापालिकेत (Pune Municipal Corporation) महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या रस्त्यात काही घरमालक व जागा मालकांच्या जागा बाधित होत आहेत. या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या रस्त्याच्या कामाला वेग येणार त्यामुळे या संदर्भात माजी नगरसेवक बाबा धुमाळ (Pradeep Baba Dhumal) यांनी पुढाकार घेत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्या समवेत बांधकाम विभाग, पथ विभाग, भूमी जिंदगी व भूसंपादन विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर सदर बाधित जागा मालकांना घेवून बैठक घेतली. पाच ते सहा बाधित जागा मालक यावेळी उपस्थित होते. यामध्ये काहींची घरे जात आहेत तर काहींच्या जागा बाधित होत आहेत. (PMC Pune News)
जागा मालकांना योग्य तो मोबदला देऊन जागा ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण करावा यावर अधिकारी, जागा मालक व बाबा धुमाळ यांच्यात चर्चा झाली. या जागा मालकांना योग्य तो मोबदला लवकर दिला जाईल अशी सकारात्मक चर्चा यावेळी झाली.
या डीपी रस्त्यासाठी प्रशासनाने निधी उपालब्ध करून नव्याने टेंडर काढले आहे. जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात घतल्यास लवकरच हा रस्ता पूर्णत्वास येऊन नागरिकांसाठी वापरास खुला होऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला वेग मिळावा यासाठी बाबा धुमाळ यांनी या बैठकीचे नियोजन केले होते.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता व्हावा यासाठी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर दरम्यान काही टप्प्यातील काम ही झाले आहे. ज्या बाधित जागा येत आहेत त्या जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात आल्यास या रस्त्याच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा होणार आहे.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता हा वारजे, कर्वेनगर, कोथरूड वासियांसाठी महत्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे. महामर्गवरून डुक्कर खिंडीतून सरळ तिरुपतीनगर पुढे वारजे आंबेडकर चौक, कर्वेनगर व पुढे कोथरूडकडे जाता येणार आहे. यासाठी वारजे हायवे चौकात किंवा चर्च पासून कॅनॉल रस्त्याने येण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी हा रस्ता तातडीने पूर्ण व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.
—-
News Title | Warje DP Road | PMC Pune | Important meeting in Pune Municipal Corporation regarding alternative road to come to Warje, Karvenagar, Kothrud area

PPP | DP Road | पीपीपी धर्तीवर महंमदवाडी मध्ये दोन डीपी रस्ते होणार  | 26 कोटींचा खर्च अपेक्षित 

Categories
Breaking News PMC social पुणे

पीपीपी धर्तीवर महंमदवाडी मध्ये दोन डीपी रस्ते होणार

| 26 कोटींचा खर्च अपेक्षित

पुणे | पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोट या मोबदल्याच्या स्वरूपात शहरातील डी.पी. रस्ते व पुल खाजगी सहभागातुन विकसित करणे या अंतर्गत महंमदवाडी स.नं. 26,27,37 मधील 24 मी.डी.पी. रस्ता व कल्व्हर्ट बांधणे व महंमदवाडी स.नं. 38,40,41,55,56 मधील 30 मी.डी.पी. रस्ता विकसित केला जाणार आहे. यासाठी 26 कोटीचा खर्च  अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. 

स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार शहरातील वाढत्या वाहतुक कोंडीच्या अनुषंगाने विकास आराखड्यातील रस्ते प्राधान्य तत्वावर हाती घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोट या मोबदल्याच्या स्वरूपात शहरातील डी.पी. रस्ते व पुल खाजगी सहभागातुन विकसित करणेचा निर्णय यापुर्वी घेतलेला आहे. त्या अनुषंगाने शहरातील सात डी.पी. रस्ते व दोन उड्डाणपुलांची कामे पी.पी.पी. धर्तीवर हाती घेण्यात आलेली आहेत.
महंमदवाडी परिसरामध्ये मान्य विकास आराखड्यामध्ये महंमदवाडी स.नं. 26 ते स.नं. 37 दरम्यान 24 मी.डी.पी. रूंदीचा 650 मी. लांबीचा आणि तेथुन पुढेच स.नं. 37 ते स.नं. 40 दरम्यान 30 मी.डी.पी. रूंदीचा व
745 मी. लांबीचा डी.पी. रस्ता दर्शविण्यात आलेला आहे. सदर रस्त्यामुळे कोंढवा भागातुन महंमदवाडी व तेथुन पुढे हडपसरला जाण्यासाठी वाहतुकीची नवीन लिंक निर्माण होऊन परिसरातील वाहतुक सुरळित होण्यास मदत होणार आहे. त्याप्रमाणे या रस्त्यामुळे कोंढवा भागातुन उंड्री, वडाची वाडी येथे जाण्यासाठी रस्त्याची नवीन लिंक निर्माण होणार आहे. सदर कामाअंतर्गत 1395 मी. लांबीचे दोन डी.पी. रस्ते व नाल्यावरील कल्व्हर्ट विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. सदर कामाचा एकुण अंदाजित खर्च र.रू.26,30,90,094/- इतका आहे.
शहरातील वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी महत्वाच्या डी.पी. रस्त्यांना जोडणारी मिसिंग लिंक विकसित करण्यासाठी इंटरमिजीएट रिंगरोडचा आराखडा तयार करण्यात आलेला असुन, या कामाचा या मिसिंग लिंकमध्ये समावेश आहे व सदर काम हाती घेणे आवश्यक आहे. कामासाठी सन 2022-23 च्या मान्य अंदाजपत्रकामध्ये स्वतंत्र तरतुद नाही. यापुर्वी पी.पी.पी.
अंतर्गत रस्ते व पुलांची कामे हाती घेताना मा. स्थायी समिती ठ.क्र. 936 दि.05/01/2021 मधील अ.क्र. 6 नुसार पी.पी.पी. पॅकेजमधील रस्ते व पुलांची कामे व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार व जेथे पी.पी.पी. धर्तीवर कामाचा प्रतिसाद मिळू शकेल अशा रस्त्यांची व पुलांची कामे पी.पी.पी. मॉडेलनुसार क्रेडिट नोटच्या मोबदल्यात विकसित करण्यास मान्यता प्राप्त आहे. प्रस्तुत रस्त्याचे काम पी.पी.पी. धर्तीवर हाती घेतल्यास सदर घेताना, सदर क्रेडिट नोट समायोजित करण्याची मर्यादा एका आर्थिक वर्षात र.रू.200 कोटी इतकी आहे. पी.पी.पी. अंतर्गत रस्ते व पुलांची कामे डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात मनपाच्या जमा रकमेमध्ये तफावत येणार नाही.

Credit Note : PPP Model : पीपीपी धर्तीवर क्रेडिट नोटच्या मोबदल्यात मुंढवा येथील रस्ता होणार विकसित  : स्थायी समितीची मान्यता 

Categories
Breaking News PMC पुणे

पीपीपी धर्तीवर मुंढवा येथील रस्ता होणार विकसित

: स्थायी समितीची मान्यता

पुणे : पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात मुंढवा येथील २४ मीटर रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषरेत दिली.

रासने म्हणाले, रस्ते विकसनाचा खर्च, तुलनेने कमी उपलब्ध तरतूद आणि जागा ताब्यात घेताना जागा मालकांची रोख मोबदल्याची मागणी अशा कारणांमुळे डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यात मर्यादा येतात. अशा परिस्थितीत रस्ते विकसन खासगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाअंतर्गत रस्त्याच्या जागा एफएसआय आणि टीडीआर यांच्या मोबदल्यामध्ये ताब्यात घेता येतील. रस्ते विकसनाचा खर्च विकसकास किंवा ठेकेदारास क्रेडिट नोट स्वरूपात देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर क्रेडिट नोट पुणे महापालिकेकडे असलेल्या बांधकाम परवानगी शुल्काच्या अंतर्गत वापरता येईल. तसेच ती क्रेडिट नोट हस्तांतरणीय असेल.

Amol Balwadkar : Balewadi DP Road : बालेवाडी हाय स्ट्रीट ते वाकड-बालेवाडी पुलाच्या तीस मीटर रुंदीच्या डीपी रस्त्याचे काम चालू

Categories
Breaking News PMC पुणे

बालेवाडी हाय स्ट्रीट ते वाकड-बालेवाडी पुलाच्या तीस मीटर रुंदीच्या डीपी रस्त्याचे काम चालू

: नगरसेवक अमोल बालवडकर यांची माहिती

पुणे :  पुणे स्मार्ट सिटी च्या माध्यमातून वाकड आणि बालेवाडी जोडणाऱ्या पुलाच्या तीस मीटर डीपी रस्त्याच्या विकासकामांबद्दल साईट विजीट करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून मी या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करत होतो. त्यानुसार आता  बालेवाडी हाय स्ट्रीट ते वाकड-बालेवाडी पुलाच्या तीस मीटर रुंदीच्या डीपी रस्त्याचे काम चालू झाले आहे. या रस्त्यामुळे निश्चितपणे पिंपरी-चिंचवड आणि  पुणे शहराची वाहतुकीमध्ये बदल होऊन नागरिकांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे.  येत्या सहा  महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण होईल. अशी माहिती नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.

 

२०१५ साली केले होते आंदोलन 

याबाबत बालवडकर म्हणाले, पुणे स्मार्ट सिटी च्या माध्यमातून वाकड आणि बालेवाडीला जोडणाऱ्या पुलाच्या तीस मीटर डीपी रस्त्याच्या विकासकामांबद्दल विजिट करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून मी या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करत होतो. शहर सुधारणा समितीवर मला भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यानंतर लगेचच 205 या अंतर्गत हा रस्ता पूर्वीचा 24 मीटर चा रद्द करून 30 मीटर चा करण्यात आला. पूर्वीचे चुकीच्या पद्धतीचे आलायमेंट ही दुरुस्त करून नवीन पुलाजवळ नवीन आखणी करण्यात मुख्य सभेत मान्यता घेण्यात आली.  मागील महिन्यामध्ये मुख्य सभेमध्ये जुना रस्ता रद्द करण्यात आला. जेणेकरून आता तेथील रहिवासी शेतकरी यांच्यासोबत लवकरात लवकर पाठपुरावा करून शेतकऱ्याकडून जमीन मालकाकडून ताबा पावती घेण्यात आली.  पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटी चा पाठपुरावा करून स्मार्ट सिटी कडून निधीची तरतूद करण्यात आली.  यामध्ये पुणे महानगरपालिकेचे महापौर, स्थायी समितीचे चेअरमन हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. बालवडकर म्हणाले,  हा रस्ता आणि काम  येत्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण होईल. या रस्त्याच्या मध्ये स्मार्ट शिट म्हणजे दोन इतर सिमेंट काँक्रिटचे रस्ते, ड्रेनेज वॉटर, सायकल ट्रॅक, स्ट्रीट फर्निचर असा रस्ता असेल. यामुळे निश्चितपणे पिंपरी-चिंचवड आणि  पुणे शहराची वाहतुकीमध्ये बदल होऊन नागरिकांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे.  त्यांना ट्रॅफिकच्या मनस्ताप पासून निश्चितपणे सुटका मिळणार आहे. त्यामुळे हा खूप प्रलंबित रस्ता आणि त्याचं काम आणि काम प्रगतिपथावर आहे पाहून आनंद होत आहे.  पूर्वी  त्यासाठी 2015 मध्ये आंदोलन मी केलं होतं. त्यामुळे हे काम मी माझ्या कार्यकाळात मध्ये पूर्ण करू शकलो याचा निश्चितपणे मला एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नगरसेवक म्हणून अभिमान आहे.
 या रस्त्यामुळे निश्चितपणे पिंपरी-चिंचवड आणि  पुणे शहराची वाहतुकीमध्ये बदल होऊन नागरिकांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे.  त्यांना ट्रॅफिकच्या मनस्ताप पासून निश्चितपणे सुटका मिळणार आहे. त्यामुळे हा खूप प्रलंबित रस्ता आणि त्याचं काम आणि काम प्रगतिपथावर आहे पाहून आनंद होत आहे.  पूर्वी  त्यासाठी 2015 मध्ये आंदोलन मी केलं होतं. त्यामुळे हे काम मी माझ्या कार्यकाळात मध्ये पूर्ण करू शकलो याचा निश्चितपणे मला एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नगरसेवक म्हणून अभिमान आहे.
            अमोल बालवडकर, नगरसेवक.