PPP | DP Road | पीपीपी धर्तीवर महंमदवाडी मध्ये दोन डीपी रस्ते होणार  | 26 कोटींचा खर्च अपेक्षित 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

पीपीपी धर्तीवर महंमदवाडी मध्ये दोन डीपी रस्ते होणार

| 26 कोटींचा खर्च अपेक्षित

पुणे | पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोट या मोबदल्याच्या स्वरूपात शहरातील डी.पी. रस्ते व पुल खाजगी सहभागातुन विकसित करणे या अंतर्गत महंमदवाडी स.नं. 26,27,37 मधील 24 मी.डी.पी. रस्ता व कल्व्हर्ट बांधणे व महंमदवाडी स.नं. 38,40,41,55,56 मधील 30 मी.डी.पी. रस्ता विकसित केला जाणार आहे. यासाठी 26 कोटीचा खर्च  अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. 

स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार शहरातील वाढत्या वाहतुक कोंडीच्या अनुषंगाने विकास आराखड्यातील रस्ते प्राधान्य तत्वावर हाती घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोट या मोबदल्याच्या स्वरूपात शहरातील डी.पी. रस्ते व पुल खाजगी सहभागातुन विकसित करणेचा निर्णय यापुर्वी घेतलेला आहे. त्या अनुषंगाने शहरातील सात डी.पी. रस्ते व दोन उड्डाणपुलांची कामे पी.पी.पी. धर्तीवर हाती घेण्यात आलेली आहेत.
महंमदवाडी परिसरामध्ये मान्य विकास आराखड्यामध्ये महंमदवाडी स.नं. 26 ते स.नं. 37 दरम्यान 24 मी.डी.पी. रूंदीचा 650 मी. लांबीचा आणि तेथुन पुढेच स.नं. 37 ते स.नं. 40 दरम्यान 30 मी.डी.पी. रूंदीचा व
745 मी. लांबीचा डी.पी. रस्ता दर्शविण्यात आलेला आहे. सदर रस्त्यामुळे कोंढवा भागातुन महंमदवाडी व तेथुन पुढे हडपसरला जाण्यासाठी वाहतुकीची नवीन लिंक निर्माण होऊन परिसरातील वाहतुक सुरळित होण्यास मदत होणार आहे. त्याप्रमाणे या रस्त्यामुळे कोंढवा भागातुन उंड्री, वडाची वाडी येथे जाण्यासाठी रस्त्याची नवीन लिंक निर्माण होणार आहे. सदर कामाअंतर्गत 1395 मी. लांबीचे दोन डी.पी. रस्ते व नाल्यावरील कल्व्हर्ट विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. सदर कामाचा एकुण अंदाजित खर्च र.रू.26,30,90,094/- इतका आहे.
शहरातील वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी महत्वाच्या डी.पी. रस्त्यांना जोडणारी मिसिंग लिंक विकसित करण्यासाठी इंटरमिजीएट रिंगरोडचा आराखडा तयार करण्यात आलेला असुन, या कामाचा या मिसिंग लिंकमध्ये समावेश आहे व सदर काम हाती घेणे आवश्यक आहे. कामासाठी सन 2022-23 च्या मान्य अंदाजपत्रकामध्ये स्वतंत्र तरतुद नाही. यापुर्वी पी.पी.पी.
अंतर्गत रस्ते व पुलांची कामे हाती घेताना मा. स्थायी समिती ठ.क्र. 936 दि.05/01/2021 मधील अ.क्र. 6 नुसार पी.पी.पी. पॅकेजमधील रस्ते व पुलांची कामे व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार व जेथे पी.पी.पी. धर्तीवर कामाचा प्रतिसाद मिळू शकेल अशा रस्त्यांची व पुलांची कामे पी.पी.पी. मॉडेलनुसार क्रेडिट नोटच्या मोबदल्यात विकसित करण्यास मान्यता प्राप्त आहे. प्रस्तुत रस्त्याचे काम पी.पी.पी. धर्तीवर हाती घेतल्यास सदर घेताना, सदर क्रेडिट नोट समायोजित करण्याची मर्यादा एका आर्थिक वर्षात र.रू.200 कोटी इतकी आहे. पी.पी.पी. अंतर्गत रस्ते व पुलांची कामे डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यात मनपाच्या जमा रकमेमध्ये तफावत येणार नाही.