National Flag | राष्टध्वजाचा अपमान करणाऱ्या ठेकेदार यांच्यावर कारवाई करा | कॉंग्रेस ची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

राष्टध्वजाचा अपमान करणाऱ्या ठेकेदार यांच्यावर कारवाई करा | कॉंग्रेस ची मागणी

केंद्र शासनाच्या आदेशानुसार व राज्य शासनच्या आदेशाप्रमाणे १५ ऑगस्ट २०२२ अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पुणे महानगरपालिका भांडार विभाग अंतर्गत पुणे मनपा ने राष्टध्वज व इतर बाबींबाबत निविदा करण्यात आल्या. या निविदा मान्य केल्यानंतर संबधीत ठेकेदार यांनी महापालिका भांडार विभाग यांच्याकडे जमा केले, हा राष्टध्वज स्वीकारताना मनपा भांडार विभाग अधिकारी यांनी ते ध्वज तपासणे गरजेचे होते. हे ध्वज नागरिकांना देताना राष्टध्वज बाबत अनेक चुका समोर आल्या आहेत. याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे ऋषिकेश बालगुडे आणि विशाल गुंड यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

बालगुडे आणि गुंड यांच्या निवेदनानुसार ध्वजावरील अशोक चक्र वेगळ्या ठिकाणीछापणे , कापड चुकीचे वापरणे, व इतर गोष्टी … अतिशय खेदजनक आहे. या सर्व विषयी वर्तमान पत्र, इलेक्ट्रोनिक मिडिया ,सोशल मिडिया यावर प्रसिद्ध झाल्या आहेत.  या विषयाबाबत ध्वजसंहिता उल्लंघन झाले आहे. पुणे महानगरपालिका भांडार विभाग मार्फत कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु जाणूनबुजून संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालत आहे. राष्टीय ध्वजाचा अपमान करणाऱ्या ठेकेदारांवर ताबडतोब गुन्हा दाखल करावा आणि त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच भांडार विभाग अधिकारी यांच्यावर खात्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. या विषयी कारवाई बाबत मनपाने दुर्लक्ष केल्यास आम्ही आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जवाबदारी प्रशासन राहील. असा इशारा ही देण्यात आला आहे.