Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक

Warje DP Road | PMC Pune |  पुणे : महामार्गावरून (Highway) वारजे कर्वेनगर कोथरूड (Warje, Karvenagar, Kothrud) परिसरात येण्यासाठी पर्यायी मार्ग ठरू शकणाऱ्या वारजे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर या चोवीस मीटर रुंद  डीपी रस्त्याचे (DP Road) काम त्वरित व्हावे यासाठी आज महापालिकेत (Pune Municipal Corporation) महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या रस्त्यात काही घरमालक व जागा मालकांच्या जागा बाधित होत आहेत. या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या रस्त्याच्या कामाला वेग येणार त्यामुळे या संदर्भात माजी नगरसेवक बाबा धुमाळ (Pradeep Baba Dhumal) यांनी पुढाकार घेत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्या समवेत बांधकाम विभाग, पथ विभाग, भूमी जिंदगी व भूसंपादन विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर सदर बाधित जागा मालकांना घेवून बैठक घेतली. पाच ते सहा बाधित जागा मालक यावेळी उपस्थित होते. यामध्ये काहींची घरे जात आहेत तर काहींच्या जागा बाधित होत आहेत. (PMC Pune News)
जागा मालकांना योग्य तो मोबदला देऊन जागा ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण करावा यावर अधिकारी, जागा मालक व बाबा धुमाळ यांच्यात चर्चा झाली. या जागा मालकांना योग्य तो मोबदला लवकर दिला जाईल अशी सकारात्मक चर्चा यावेळी झाली.
या डीपी रस्त्यासाठी प्रशासनाने निधी उपालब्ध करून नव्याने टेंडर काढले आहे. जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात घतल्यास लवकरच हा रस्ता पूर्णत्वास येऊन नागरिकांसाठी वापरास खुला होऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला वेग मिळावा यासाठी बाबा धुमाळ यांनी या बैठकीचे नियोजन केले होते.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता व्हावा यासाठी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर दरम्यान काही टप्प्यातील काम ही झाले आहे. ज्या बाधित जागा येत आहेत त्या जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात आल्यास या रस्त्याच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा होणार आहे.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता हा वारजे, कर्वेनगर, कोथरूड वासियांसाठी महत्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे. महामर्गवरून डुक्कर खिंडीतून सरळ तिरुपतीनगर पुढे वारजे आंबेडकर चौक, कर्वेनगर व पुढे कोथरूडकडे जाता येणार आहे. यासाठी वारजे हायवे चौकात किंवा चर्च पासून कॅनॉल रस्त्याने येण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी हा रस्ता तातडीने पूर्ण व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.
—-
News Title | Warje DP Road | PMC Pune | Important meeting in Pune Municipal Corporation regarding alternative road to come to Warje, Karvenagar, Kothrud area

Water Closure | pune | गुरुवारी ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

गुरुवारी ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे | गुरूवारी वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल. आर व एम.एल.आर टाकी परिसर, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग अखत्यारीतील पर्वती एच.एल. आर टाकी परिसर तसेच नैवीन व जुने होळकर जलकेंद्र, चतुश्रुंगी टाकी परिसर येथील विद्युत/ पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. वारजे जलकेंद्रासाठी म.रा.वि.वि.कं.ली कडून आलेल्या वीजपुरवठया संदर्भात ब्रेकरची कामे म.रा.वि.वि.कं.ली करावायाची असल्याने संपुर्ण जलकेंद्र बंद राहणार आहे. त्यासाठी क्लोजरची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने या कालावधीमध्ये  पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा सदर दिवशी बंद ठेवावा लागणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक ०७/१०/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :-
 पाषाण साठवण टाकी, भूगावरोडपरिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर :- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- 
बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरन गर, दत्त नगर, इ.

Manjusha Nagpure | सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम लवकर सुरु करा  | माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
PMC Political पुणे

सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम लवकर सुरु करा

| माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी मुठा नदीवर सनसिटी ते कर्वेनगर प्रस्तावित असलेल्या उड्डाणपूलाचे काम तातडीनं सुरू करण्यात यावे. तसेच माणिकबाग ते सनसिटी पर्यायी रस्त्याचे काम लवकर सुरु करावे. अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

सध्या राजाराम पुल आणि पुणे-मुंबई महामार्गावरील वीर बाजी पासलकर उड्डाणपूल या दोन्ही पुलांवर रहदारीचा भार मोठा आहे. सनसिटी ते कर्वेनगर दरम्यानचा प्रस्तावित पूल झाल्यास सिंहगड रस्त्यासह, कोथरूड, कर्वेनगर भागातील नागरिकांना दोन्ही बाजूला ये-जा करणे अत्यंत सोपे होणार आहे. या पर्यायी पुलामुळे सिंहगड रस्त्यावरील कोंडी फुटण्यास मदत होणार असल्याने नागपूरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

 

महापालिकेकडून या पूलासाठी आवश्‍यक असलेली भूसंपादनाची प्रक्रीया जवळपास पूर्ण केली असून पूलासाठी सल्लागार नेमण्याचे काम सुरू आहे. हे काम तातडीनं झाल्यास सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीतून दिलासा मिळणार आहे.

या शिवाय माणिकबाग येथील इंडियन ह्युम पाईप कंपनी ते सनसिटी पर्यंतही रस्ता प्रस्तावित असून या रस्त्याचे भूसंपादन वेळेत झाल्यास सिंहगड रस्त्यावरून माणिकबाग येथून थेट कर्वेनगरला जाणारा पर्यायी रस्ता उपलब्ध होईल. परिणामी वाहतूक कोंडी आणि इंधनबचत झाल्याने प्रदूषणाची समस्याही कमी होणार असल्याने ही दोन्ही कामे तातडीनं मार्गी लावावी अशी मागणी नागपूरे यांनी केली आहे.

Wrestling in Karvenagar : कर्वेनगरमध्ये रंगणार कुस्तीचा आखाडा! :  मातीवरील भव्य हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२

Categories
Breaking News Political Sport पुणे

कर्वेनगरमध्ये रंगणार कुस्तीचा आखाडा!

:  मातीवरील भव्य हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२

पुणे : यंदा कर्वेनगर मध्ये कुस्तीचा आखाडा रंगणार आहे. मातीवरील भव्य हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा २०२२ आयोजित करण्यात आली आहे. 14 आणि 15 एप्रिलला होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेचे आयोजन मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक आणि कोथरूड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजय खळदकर यांनी केले आहे.
पुणे महापालिकेच्या सम्राट अशोक शाळेच्या ज्या आखाड्यात या कुस्ती स्पर्धा होणार आहेत त्या स्व. पै. नानासाहेब बराटे क्रीडानगरी आखाड्याचे आणि मांडवाचे भूमिपूजन नुकतेच झाले. या कार्यक्रमास  हवेली अजिंक्य कुस्ती परिषदेचे सदस्य पै भारत चौधरी, पै भीमराव वांजळे, पै बाबुराव थोपटे पै संदीप वांजळे व कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे सर्व सदस्य तसेच कर्वेनगर हिंगणे बु.मधील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विजय खळदकर व  मित्र परिवार यांनी केले होते. कर्वेनगर मध्ये होणाऱ्या या स्पर्धेची कर्वेनगर वासियांसोबत आसपासच्या परिसरातील नागरिकांना देखील उत्सुकता लागून राहिली आहे.

Vijay khaladkar : कर्वे नगर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये विविध उपक्रमांचा नागरिकांना लाभ 

Categories
social पुणे

कर्वे नगर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये विविध उपक्रमांचा नागरिकांना लाभ

: विजय खळदकर यांची संकल्पना

पुणे : कर्वे नगर मध्ये विजय खळदकर यांच्यातर्फे दि. २० ऑक्टोबर ते दि. २३ ऑक्टोबर या ४ दिवसांच्या कालावधीत प्रभागातील नागरिकांसाठी ४ मोफत उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांमध्ये नागरिकांना मोफत आधार कार्ड काढून देणे तसेच आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे, नवीन पॅन कार्ड काढून देणे, सुकन्या योजनेचे खाते उघडून देणे आणि पोस्टाचे नवीन खाते उघडून देणे हे ४ उपक्रम राबवण्यात आले.

: विविध संस्थांचे सहकार्य

या परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रमाणात उपस्थित राहून लाभ घेतला. यावेळी स्वतः विजय खळदकर यांनी कार्यक्रमाची पाहणी केली. या उपक्रमामध्ये सुकन्या योजनेची २७९ खाती उघडून देण्यात आली, २४३ नागरिकांना नवीन आधार कार्ड काढून देण्यात आले. तसेच ४९८ नागरिकांना आधार कार्ड अपडेट करुन मोबाईल लिंक इन करून देण्यात आले. नवीन पॅनकार्ड नोंदणीचा ४४१ नागरिकांनी लाभ घेतला तसेच ९७ नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पोस्टाचे खाते उघडून देणे आले.  या कार्यक्रमाला पोस्ट ऑफिस चे कर्मचारी आणि  SAVE THE GIRL या संस्थेचे उत्तम सहकार्य लाभले. या कार्यक्रमात सहभागी होऊन हा कार्यक्रम सार्थकी लावल्याबद्दल उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार,असे खळदकर म्हणाले.

 

कार्यक्रमाला पोस्ट ऑफिस चे कर्मचारी आणि  SAVE THE GIRL या संस्थेचे उत्तम सहकार्य लाभले. या कार्यक्रमात सहभागी होऊन हा कार्यक्रम सार्थकी लावल्याबद्दल उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार.

विजय खळदकर, अध्यक्ष, कोथरूड ब्लॉक कॉंग्रेस कमिटी