Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक

Warje DP Road | PMC Pune |  पुणे : महामार्गावरून (Highway) वारजे कर्वेनगर कोथरूड (Warje, Karvenagar, Kothrud) परिसरात येण्यासाठी पर्यायी मार्ग ठरू शकणाऱ्या वारजे डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर या चोवीस मीटर रुंद  डीपी रस्त्याचे (DP Road) काम त्वरित व्हावे यासाठी आज महापालिकेत (Pune Municipal Corporation) महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या रस्त्यात काही घरमालक व जागा मालकांच्या जागा बाधित होत आहेत. या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या रस्त्याच्या कामाला वेग येणार त्यामुळे या संदर्भात माजी नगरसेवक बाबा धुमाळ (Pradeep Baba Dhumal) यांनी पुढाकार घेत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्या समवेत बांधकाम विभाग, पथ विभाग, भूमी जिंदगी व भूसंपादन विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर सदर बाधित जागा मालकांना घेवून बैठक घेतली. पाच ते सहा बाधित जागा मालक यावेळी उपस्थित होते. यामध्ये काहींची घरे जात आहेत तर काहींच्या जागा बाधित होत आहेत. (PMC Pune News)
जागा मालकांना योग्य तो मोबदला देऊन जागा ताब्यात घेऊन रस्ता पूर्ण करावा यावर अधिकारी, जागा मालक व बाबा धुमाळ यांच्यात चर्चा झाली. या जागा मालकांना योग्य तो मोबदला लवकर दिला जाईल अशी सकारात्मक चर्चा यावेळी झाली.
या डीपी रस्त्यासाठी प्रशासनाने निधी उपालब्ध करून नव्याने टेंडर काढले आहे. जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात घतल्यास लवकरच हा रस्ता पूर्णत्वास येऊन नागरिकांसाठी वापरास खुला होऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला वेग मिळावा यासाठी बाबा धुमाळ यांनी या बैठकीचे नियोजन केले होते.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता व्हावा यासाठी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर दरम्यान काही टप्प्यातील काम ही झाले आहे. ज्या बाधित जागा येत आहेत त्या जागा मालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात आल्यास या रस्त्याच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा होणार आहे.
महामार्गावरील डुक्कर खिंड ते वारजे तिरुपतीनगर रस्ता हा वारजे, कर्वेनगर, कोथरूड वासियांसाठी महत्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे. महामर्गवरून डुक्कर खिंडीतून सरळ तिरुपतीनगर पुढे वारजे आंबेडकर चौक, कर्वेनगर व पुढे कोथरूडकडे जाता येणार आहे. यासाठी वारजे हायवे चौकात किंवा चर्च पासून कॅनॉल रस्त्याने येण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी हा रस्ता तातडीने पूर्ण व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.
—-
News Title | Warje DP Road | PMC Pune | Important meeting in Pune Municipal Corporation regarding alternative road to come to Warje, Karvenagar, Kothrud area