Pune Water Cut Update | पालखी मुक्कामाच्या काळात पुणे शहरातील सोमवारची पाणीकपात रद्द करा 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut Update | पालखी मुक्कामाच्या काळात पुणे शहरातील सोमवारची पाणीकपात रद्द करा

| माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची मागणी

Pune Water Cut Update | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज  (Sant DnyaneshwarMaharaj Palkhi) व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या (Sant Tukaram Maharaj Palkhi) पुण्यात असताना सोमवारची पाणी कपात रद्द करावी. अशी माजी नगरसेविका मंजुषा नागपूरे (Manjusha Nagpure) यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाकडे (PMC Water Supply Department) आग्रही मागणी केली आहे. (Pune Water Cut Update)
याबाबत नागपुरे यांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुख मंजूषा नागपुरे यांची भेट घेत त्यांना पत्र दिले आहे. नागपुरे यांच्या पत्रानुसार  दरवर्षी लाखो वारकरी पुण्यामध्ये वारीला जात असताना मुक्कामी येतात. पुणेकर देखील त्यांची सेवा मनोभावे करतात. यथोचित आदरातिथ्य करतात. यंदा या पालख्या सोमवारी पुण्यात येत असून, सिंहगड रस्त्यासह पुण्यातील काही भागात पाणी पुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येतो. परंतु, पालख्यांचे आगमन पाहता, हा पाणीपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी मंजुषा नागपुरे यांनी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता पावसकर यांच्याकडे केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन अनिरुद्ध पावसकर यांनी दिले. असे नागपुरे यांनी सांगितले. (Pune water cut News)
—-
News Title | Pune Water Cut Update | Cancel Monday water cut in Pune city during Palkhi stay | Demand of former corporator Manjusha Nagpure

Manjusha Nagpure | सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम लवकर सुरु करा  | माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
PMC Political पुणे

सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम लवकर सुरु करा

| माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी मुठा नदीवर सनसिटी ते कर्वेनगर प्रस्तावित असलेल्या उड्डाणपूलाचे काम तातडीनं सुरू करण्यात यावे. तसेच माणिकबाग ते सनसिटी पर्यायी रस्त्याचे काम लवकर सुरु करावे. अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

सध्या राजाराम पुल आणि पुणे-मुंबई महामार्गावरील वीर बाजी पासलकर उड्डाणपूल या दोन्ही पुलांवर रहदारीचा भार मोठा आहे. सनसिटी ते कर्वेनगर दरम्यानचा प्रस्तावित पूल झाल्यास सिंहगड रस्त्यासह, कोथरूड, कर्वेनगर भागातील नागरिकांना दोन्ही बाजूला ये-जा करणे अत्यंत सोपे होणार आहे. या पर्यायी पुलामुळे सिंहगड रस्त्यावरील कोंडी फुटण्यास मदत होणार असल्याने नागपूरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

 

महापालिकेकडून या पूलासाठी आवश्‍यक असलेली भूसंपादनाची प्रक्रीया जवळपास पूर्ण केली असून पूलासाठी सल्लागार नेमण्याचे काम सुरू आहे. हे काम तातडीनं झाल्यास सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीतून दिलासा मिळणार आहे.

या शिवाय माणिकबाग येथील इंडियन ह्युम पाईप कंपनी ते सनसिटी पर्यंतही रस्ता प्रस्तावित असून या रस्त्याचे भूसंपादन वेळेत झाल्यास सिंहगड रस्त्यावरून माणिकबाग येथून थेट कर्वेनगरला जाणारा पर्यायी रस्ता उपलब्ध होईल. परिणामी वाहतूक कोंडी आणि इंधनबचत झाल्याने प्रदूषणाची समस्याही कमी होणार असल्याने ही दोन्ही कामे तातडीनं मार्गी लावावी अशी मागणी नागपूरे यांनी केली आहे.

Manjusha Nagpure : शाळांमध्ये लसीकरणास सुरवात – नगरसेविका नागपुरे यांच्या प्रयत्नांना यश

Categories
PMC Political आरोग्य पुणे

शाळांमध्ये लसीकरणास सुरवात

– नगरसेविका नागपुरे यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील स्व. तु. ग. गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. वडगाव बुद्रुक, हिंगणे खुर्द (प्रभाग क्रमांक ३४) च्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जात आहे.

संपूर्ण देशात १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींसाठी करोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहरातील ठराविक केंद्रांवर या वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. लस घेण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेत प्रभातील शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी शाळेतच ही लस उपलब्ध करून देण्याची मागणी महानगपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. याची दखल घेत पालोलिकेच्या आरोग्य खात्याने विठ्ठलवाडी येथील गोसावी माध्यमिक विद्यालयात लसीकरण मोहिम राबविण्यास सुरुवात केली, अशी माहिती नगरसेविका नागपुरे यांनी दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत जाऊन लसीकरण करण्याचा हा शहरातील पहिलाच उपक्रम असल्याचे नागपुरे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी शाळेत लसीकरण मोहीम आयोजित करण्याबाबत गोसावी शैक्षणिक संस्थेबरोबर चर्चा केल्यानंतर मुख्याध्यापक किरण सुर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालिकेकडे मागणी केली. विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी लस उपलब्ध करून देत उपस्थित राहून या मोहिमेची सुरुवात केली. निरामय संस्थेची टीम या लसीकरणासाठी उपस्थित असून डॉ. जयश्री शेटे, सिस्टर सुप्रिया मांडवकर आणि स्नेहल नायर हे यावेळी उपस्थित होते.

गोसावी विद्यालयातील लसीकरण मोहिमेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रभागातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने अशा पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्याचा प्रयत्न आहे.

– मंजुषा नागपुरे, स्थानिक नगरसेविका

Manjusha Nagpure : Suncity Road : सनसिटी रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटणार : रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात

Categories
PMC Political पुणे

सनसिटी रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटणार

: रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात

पुणे : सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल चौकातून सनसिटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामुळे शिवपुष्प पार्क ते क्राऊन बेकरी या भागात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

शिवपुष्प पार्क ते क्राऊन बेकरी रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली जागा महनगरपालिकेच्या ताब्यात आली असून त्याचे काम सुरू झाले आहे. या कामाची सुरुवात जागा मालक हर्षल चरवड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. या रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे आग्रही होत्या. यासाठी नागपुरे यांनी पालिका प्रशासनाचे अधिकारी तसेच स्थानिक जागा मालक यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य करण्याचे आश्वासन शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी देत संबधित अधिकाऱ्यांना त्यासाठीच्या सूचना देखील दिल्या होत्या.

या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शनिवारी सुरू झाले. हे काम सुरू झाल्याने आपल्या प्रयत्नांना यश आल्याची भावना नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली. या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जागामालक शैलेश बाळासाहेब चरवड, हर्षल शिवाजी चरवड यांचे यांचे विशेष सहकार्य मिळाले. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २८ गुंठे जागा चरवड परिवाराने दिली आहे. या कामाची सुरुवात हर्षल चरवड यांनी नारळ फोडून केली. हे काम आता सुरू झाले असून लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविणे ही आमची जबाबदारी असून त्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. पर्यायी रस्त्यांची कामे देखील सुरू असून त्यासाठी आवश्यक तो निधी देखील उपलब्ध करून दिला जात असल्याचे नागपुरे यांनी सांगितले.

 

विकास आराखड्यामध्ये (डीपी) असलेले या परिसरातील सर्व रस्ते, पालिकेने लक्ष घालून सुधारले पाहिजेत. आवश्यक त्या जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करणे यासाठी पालिकेने युद्ध पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे.

         – मंजुषा नागपुरे, स्थानिक नगरसेविका