Manjusha Nagpure : Suncity Road : सनसिटी रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटणार : रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात

Categories
PMC Political पुणे

सनसिटी रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटणार

: रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात

पुणे : सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉल चौकातून सनसिटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामुळे शिवपुष्प पार्क ते क्राऊन बेकरी या भागात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

शिवपुष्प पार्क ते क्राऊन बेकरी रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली जागा महनगरपालिकेच्या ताब्यात आली असून त्याचे काम सुरू झाले आहे. या कामाची सुरुवात जागा मालक हर्षल चरवड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. या रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे आग्रही होत्या. यासाठी नागपुरे यांनी पालिका प्रशासनाचे अधिकारी तसेच स्थानिक जागा मालक यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य करण्याचे आश्वासन शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी देत संबधित अधिकाऱ्यांना त्यासाठीच्या सूचना देखील दिल्या होत्या.

या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शनिवारी सुरू झाले. हे काम सुरू झाल्याने आपल्या प्रयत्नांना यश आल्याची भावना नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केली. या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जागामालक शैलेश बाळासाहेब चरवड, हर्षल शिवाजी चरवड यांचे यांचे विशेष सहकार्य मिळाले. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २८ गुंठे जागा चरवड परिवाराने दिली आहे. या कामाची सुरुवात हर्षल चरवड यांनी नारळ फोडून केली. हे काम आता सुरू झाले असून लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविणे ही आमची जबाबदारी असून त्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. पर्यायी रस्त्यांची कामे देखील सुरू असून त्यासाठी आवश्यक तो निधी देखील उपलब्ध करून दिला जात असल्याचे नागपुरे यांनी सांगितले.

 

विकास आराखड्यामध्ये (डीपी) असलेले या परिसरातील सर्व रस्ते, पालिकेने लक्ष घालून सुधारले पाहिजेत. आवश्यक त्या जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करणे यासाठी पालिकेने युद्ध पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे.

         – मंजुषा नागपुरे, स्थानिक नगरसेविका