MLA Sunil Kamble | पोलिसांच्या अर्जित रजा | आमदार सुनील कांबळे यांच्याकडून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत 

Categories
Uncategorized

MLA Sunil Kamble | पोलिसांच्या अर्जित रजा | आमदार सुनील कांबळे यांच्याकडून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

 

MLA Sunil Kamble | राज्यातील पोलीस दलांतर्गत असलेल्या कामाचा व्याप, जबाबदारी इत्यादी बाबी विचारत घेऊन पोलीस शिवाई ते पोलीस निरीक्षक या पदांकरता त्यांना 20 दिवसांच्या नैमित्तिक रजा आणि 15 दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतींसह मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र, आता राज्य सरकारने पोलिसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्यचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे पुणे कॅन्टोन्मेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे यांनी स्वागत केले आहे.(MLA Sunil Kamble)

दि. 21 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदांकरिता 15 दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला. परंतू, आपल्या पोलीस बांधवांसाठी हे सोयिस्कर नाही, कारण पोलीस बांधवांना दर आठवड्याला एक साप्ताहिक ती पण मिळतेचं असं नाही, आपले पोलीस बांधव ड्युटीसाठी 24 तास बांधिल असतात. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा असे पत्र आमदार सुनील कांबळे यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.

 

आमदार सुनील कांबळे यांच्या पत्राची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दखल घेऊन हा शासन निर्णय तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले आहे. राज्याच्या गृहविभाने शुक्रवारी (दि.23) नवीन शासन निर्णय जारी करुन 21 फेब्रुवारीचा शासन निर्णय रद्द केला आहे. गृहविभागाने  काढलेल्या नव्या शासन निर्णयाचे आमदार सुनील कांबळे यांनी स्वागत करुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Sports Complex for Police Force | पोलीस दलासाठी पुणे येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

पोलीस दलासाठी पुणे येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल

| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

२०१९ मध्ये पुण्यात पोलीस दलातील खेळाडूंसाठी चांगले क्रीडा संकुल तयार करण्याचा मनोदय पोलीस महासंचालकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलीस विभागाकडून अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल. बालेवाडी येथे खेळासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. पण पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यादृष्टीने पायाभूत सुविधांची याठिकाणी व्यवस्था करण्यात येईल. महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून उत्तमप्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य राखीव पोलीस बल क्र.२ मैदान वानवडी येथे आयोजित ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, मेघना बोर्डीकर साकोरे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस महासंचालक तथा गृह रक्षक दलाचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार, अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंग, पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद आदी उपस्थित होते.

अनेक चांगल्या परंपरा महाराष्ट्राच्या पोलीस दलाने कायम केल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासह लोकशाहीची मुल्ये जपण्याकरिता पोलीस दल कार्यरत आहे. विपरीत परिस्थितीत पोलीस कर्मचारी काम करतात. पोलिसांनी कोरोना काळात जीवनाची जोखीम पत्करून प्रचंड काम केले. त्यादरम्यान काही पोलिसांना शहीद व्हावे लागले. अशाही परिस्थितीत सामान्य माणसाचे जीवन सुकर व्हावे यासाठी पोलीस दलाने काम केले, असेही ते म्हणाले.

पोलीस दलातील खेळाडू देशाचे नाव मोठे करतात
उपमुख्यमंत्री म्हणाले, पोलीस दलातील क्रीडापटूंसाठी या स्पर्धा महत्वाच्या असून त्यातून क्रीडा गुणांना वाव मिळतो आणि राष्ट्रीय स्पर्धेतही आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याची संधी मिळते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी पदके मिळवतात, देशाचे नाव मोठे करण्याचे काम करतात. अशा खेळाडूंना वाव देण्यासाठी या स्पर्धांना महत्व आहे.

खेळात जय-पराजय होत असतो शेवटी खिलाडूवृत्ती महत्वाची असते. खिलाडूवृत्ती आत्मसात केल्यास विजय डोक्यात जात नाही आणि पराभवाने निराशा येत नाही. माणूस हरल्यानंतरही जिद्दीने कामाला लागतो. पोलिसांना तणावाचा सामना करावा लागत असल्याने त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी खेळ महत्वाचे आहेत. खेळामुळे शिस्त आणि जिद्द निर्माण हेाते, असे श्री.फडणवीस म्हणाले.

प्रशिक्षण संचालनालयाने क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून यातून पोलीस दलाला सन्मान मिळवून देणारे चांगले खेळाडू मिळतील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दलही कौतुगोद्गार काढले.

पोलीस महासंचालक श्री.सेठ म्हणाले, या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या उत्साहात पार पडल्या. पोलीस खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, संघभावना वाढावी, आरोग्य राहावे मनोबल वाढावे यासाठी या स्पर्धा उपयुक्त आहेत. या स्पर्धेत ६ नवीन विक्रम नोंदले गेले. पुणे येथे २८ एकर जागेत पोलीस क्रीडा संकुल आणि होस्टेल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री. फडणवीस यांचा हस्ते विजयी खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. महिला गटात मंजिरी रेवाळे यांनी सुवर्णपदक, प्रियंका फाळके रौप्यपदक आणि नाजुका भोर यांनी कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात पप्पू तोडकर यांनी सुवर्णपदक, बाबासाहेब मंडलिक रौप्यपदक आणि मल्लिकार्जुन बिराजदार यांनी कांस्यपदक पटकावले.

स्पर्धेमध्ये पुरुष गटात सर्वाधिक पदके मिळवत राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वाधिक क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

प्रास्ताविक अनुप कुमार सिंग यांनी केले. आभार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मानले.

यावेळी राज्य राखीव पोलीस बल, प्रशिक्षण केंद्र नानविज येथील प्रशिक्षणार्थीनी नाईट सायलंट आर्म ड्रील या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

Police | Bonus | महाराष्ट्रातील पोलिस बांधवांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा |  भारतीय मराठा महासंघ

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्रातील पोलिस बांधवांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा |  भारतीय मराठा महासंघ

महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ दिवाळी बोनस देण्यात यावा. पोलीस बांधवांची व कुटुंबाची दिवाळी गोड करावी. पोलीस बांधव जिवाचे रान करून आमची सुरक्षा करतात अशा पोलिस बांधवांना त्वरित बोनस जाहीर करावा. अशी मागणी भारतीय मराठा महासंघाने केली आहे.

महासंघाचे उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश कानवटे म्हणाले,  पोलीस कर्मचाऱ्यांची आपल्या राज्यात दयनीय अवस्था आहे. इतर राज्यातील पोलिसांना जास्त पगार मिळतो. त्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळतो. अधिकच्या कामाच्या ताणामुळे पोलीस बांधवांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे त्यांना आरोग्याच्या सुविधा उत्तम दर्जेदार उपलब्ध करून देण्यात याव्यात. ग्रामीण भागातील पोलीस कॉटर्सची दयनीय अवस्था आहे. महिला पोलिसांना त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या सुद्धा लक्षात घेऊन ड्युटीचे स्वरूप व पोस्टिंग देण्यात यावे, अशी आमची भारतीय मराठा महासंघाची मागणी आहे. कोरोना काळात पोलिसांनी सर्वात पुढे राहून काम केले त्यासाठी त्यांना विशेष मानधन,सर्वसाधारण बदल्या तात्काळ करावे. तसेच प्रमोशन वेळोवेळी करावे. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप थांबवावा. पोलिसांना अल्प दरात घर उपलब्ध करून देणे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तयार करणे आणि पोलिसांना दिवाळी सणानिमित्त बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देणे.पोलीस पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना अमलात आणणे, अशा मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीत, तर येत्या 20 तारखेला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाईल. असा इशारा भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश कानवटे यांनी दिला. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष रविराज काळे, प्रमुख संघटक निरज सुतार ,मावळ तालुकाध्यक्ष रवि जगताप,मुळशी तालुकाध्यक्ष अजय चव्हाण उपस्थित होते.

CM Eknath Shinde | राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यता आहे.

आरे येथेच मेट्रो कारशेड होणार

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कारशेड आरे येथेच उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, आरे येथे वनजमिनींची एकूण १२८५ हेक्टर जमीन आहे. त्यामध्ये आणखी ३२६ हेक्टर जमीन वन क्षेत्रात समावेश केला आहे. कारशेडसाठी केवळ २५ हेक्टर जमीन लागणार आहे. या जागेच्या तीनही बाजूंनी रहदारीचे रस्ते आहेत. त्यामुळे आरेमधील जागा कारशेडसाठी योग्य आहे. याबाबत मदान समिती आणि सौनिक समितीनेही आरे येथील जागाच कारशेडसाठी उपयुक्त असल्याची शिफारस केली आहे.

राज्यातील गुन्हेगारीत घट

राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर गुन्हे प्रकटीकरणात वाढ होत आहे. पोलीसांनी मुस्कान अभियानामधून राज्यातील सुमारे ३७ हजार ५११ मुले आणि मुलींचा शोध घेऊन पालकांकडे सुपूर्द केली आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीसांनी कठोर कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीसांना पंधरा लाखांत घर

बीडीडी चाळीचा पुनर्विकास गतीने पूर्ण केला जाईल. या पुनर्विकास इमारतींमध्ये पोलीसांना केवळ पंधरा लाख रुपयांत घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पोलीसांना अधिक घरे उपलब्ध व्हावीत यासाठी गृहनिर्माण धोरणात विशेष तरतूद केली जाईल. पोलीसांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. न्यायालयीन विकासासाठी दरवर्षी भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील मालमत्ता करात वाढ नाही

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती. आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उल्हासनगर मधील एक जानेवारी २००५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी विशेष कार्यप्रणाली राबविण्यात येईल. त्यासाठी प्रशमन शुल्कातही मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. हे शुल्क प्रति चौरस मीटरास २२०० रुपये आकारले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना भरीव मदत

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत तत्काळ दिली आहे. पूर्वी ही मदत केवळ पाच हजार रुपये होती. ती मदत आता पंधरा हजार रुपये दिली जात आहे. गावांचे शहराशी दळणवळण वाढायला मदत व्हावी यासाठी रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

*पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली

*चौदा लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत

*उपसा जलसिंचन योजनेच्या वीजदरात एक रुपयांने कपात

*राज्यातील गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक प्रयत्न

*हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गचे लवकरच लोकार्पण

*सत्तावीस हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हाती

*एमएमआरडीएच्या साठ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना शासन हमी

*मुंबई-गोवा महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात

*प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार

वसई विरार मल्टीमोडल हबचा सविस्तर प्रकल्प अहवाल

पुणे रिंग रोड आणि रेवस-रेड्डी रस्त्यास निधी उपलब्ध करणार

*पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सर्वंकष विकास आराखडा

*मंदिरे आणि गड किल्ले यांचे जतन-संवर्धन करणार

*कोल्हापूर सांगली शहरातील पुराबाबत सल्ला घेऊन उपाययोजना करणार..

Traffic Congestion in Vadgaonsheri | वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी |आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी |आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी

 

    वडगावशेरी मतदारसंघातील विमाननगर, कल्याणीनगर व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळच्या जवळ असणाऱ्या रस्त्यांची पाहणी आमदार सुनिल टिंगरे यांनी पुणे वाहतूक पोलीस व पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांसोबत पाहणी केली.
या पाहणी दौर्‍या दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळकडे जाणारी व विमानतळवरुन येणारी वाहतूक ही प्रामुख्याने 509 चौका मधून होत असते. यामुळे 509 चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांचा पुष्कळ वेळ वाहतूक कोंडी मध्ये जातो. याचा दैनंदिन नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आमदार सुनिल टिंगरे यांनी 509 चौकाची पाहणी करुन वाहतूक पोलीस व पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे अधिकार्‍यांना 509 चौकात अनेक ठिकाणी रुंदीकरण करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
तसेच 509 चौक ते स्काय बेलवेडेरे सोसायटी, विमाननगर कडे जाणार्‍या रस्त्याच्या ठिकाणी रुंदीकरण करणे व तात्पुरते दुभाजक बसविणे आवश्यक असल्याचे आमदार सुनिल टिंगरे यांनी संबंधित पोलिस व पुणे मनपा अधिकार्‍यांना सांगितले. तसेच 509 चौकाचे सर्व बाजूंनी रुंदीकरण करण्याचे निर्देश संबंधित पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना आमदार सुनिल टिंगरे यांनी दिले. 509 चौकाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर नक्कीच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास आमदार टिंगरे यांनी व्यक्त केला.
 आमदार सुनिल टिंगरे यांनी बोलविलेल्या संयुक्त बैठकी मध्ये विमाननगर व कल्याणीनगर मधील नागरिकांनी वाहतूक पोलीस उपायुक्त समोर थेट आपल्या समस्या मांडल्या.
            मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी कल्याणीनगर आणि विमाननगर येथे आमदार सुनिल टिंगरे, वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, वाहतूक पोलिस निरीक्षक जय राम पायगुडे,  KNRA (कल्याणीनगर रेसीडंट असोसिएशन)चे सभासद, विमाननगर व कल्याणीनगर मधील नागरिकांच्या संयुक्त बैठका पार पडल्या.
      या बैठकी मध्ये कल्याणीनगर येथील सेंट्रल एव्हेन्यू रोड ते डी’मार्ट रोडवर पार्किंगची उपलब्धता करने, वाहतूक पोलिसांकडून आकारण्यात येणारे भरमसाट टोईंग शुल्क बंद करावे, बेकायदेशीर बॅरीकेट्स लाऊ नये तसेच यासारख्या भेडसावणाऱ्या विविध समस्या नागरिकांनी मांडल्या. तसेच विमाननगर येथे घेण्यात आलेल्या बैठकी मध्ये विमाननगर मधील अनेक चौकांमधील होणारी दैनंदिन वाहतूक कोंडीमूळे येथील नागरिकांना खूप गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. वाहतूक कोंडी होत असलेल्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस उपलब्ध करून देणे व नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश आमदार सुनिल टिंगरे यांनी पोलिस प्रशासनाला दिले.
         बैठकी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यावर निशचितपणे वाहतूक कोंडीचे कमी होईल व नागरिक होणारा त्रास हा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असे आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितले.
         या वेळी आमदार सुनिल टिंगरे, वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, वाहतूक पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, वाहतूक पोलिस निरीक्षक जय राम पायगुडे, पुणे मनपा पथ विभागाचे उपअभियंता अमर मतीकूंड, कनिष्ठ अभियंता तांबारे, KNRA (कल्याणीनगर रेसीडंट असोसिएशन)चे सभासद, विमाननगर व कल्याणीनगर मधील नागरिक, नानासाहेब नलवडे, माजी नगरसेविका मीनल सरवदे, सुहास टिंगरे, सोनसिंग सोना, आनंद सरवदे, अजय बल्लाल, राकेश म्हस्के व मनोज पाचपुते उपस्थित होते.

Cyber Crime | सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार होणार  | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार होणार

| गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

 

मुंबई  : सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले.

राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा आढावा गृहमंत्री पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, प्रधान सचिव सुरक्षा संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक सायबर व आर्थिक गुन्हे मधुकर पांडे, अपर पोलीस महासंचालक नियोजन व समन्वय संजय वर्मा,विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांसह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सायबर गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी राज्यात सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रभावीपणे सायबर कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागाच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात यावा. सायबर गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर करता यावी, आरोपीविरोधातील भक्कम पुरावे गोळा करता यावेत तसेच भविष्यात या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजता यावेत यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याच्या सूचनाही गृहमंत्री  वळसे-पाटील यांनी यावेळी दिल्या.सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्यातील पोलिस दलाला व्यापक यंत्र सामग्री देण्यात आलेली आहे. या उपलब्ध साधनसामुग्रीचा परिपूर्ण वापर करावा. तसेच या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

धार्मिक भावना भडकावणारे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे प्रकार घडल्यास त्यांना तत्काळ अटकाव करावा लागतो यासाठी सायबर स्पेसवरुन संबंधित मजकूर हटविणे आवश्यक असते. त्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगाराला कठोर शासन करण्यासाठी विद्यमान कायद्यातील ज्या कलमांमध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यांचा परिपूर्ण अभ्यास करून त्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही गृहमंत्री यांनी यावेळी दिले. सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांकाची प्रभावी प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच या आव्हानाला तोंड देण्यासाठी शासनामार्फत सुरु असलेल्या उपाययोजना, अत्याधुनिक तंत्रप्रणाली आणि व्यवस्थेसंदर्भात जनतेमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.या बैठकीत सायबर विभाग सक्षमीकरण, सद्यस्थितीत सुरु असलेलं प्रकल्प आणि अन्य अनुषंगिक बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

Karnataka: Transgender: कर्नाटक सरकार तृतीयपंथीयांना देणार पोलिसांची नोकरी

Categories
Breaking News social देश/विदेश

कर्नाटक सरकार तृतीयपंथीयांना देणार पोलिसांची नोकरी 

विविध पदांसाठी अर्ज मागविले

बंगळूर : कर्नाटक सरकारने प्रथमच राज्य पोलिस खात्यातील भरतीसाठी तृतीयपंथी (transgenders) उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. ‘कर्नाटक नागरी सेवा (सामान्य भरती) नियम- १९७७’ च्या दुरुस्तीनुसार तृतीयपंथीयांना एक टक्का नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक पोलिस विभागाने (Karnataka Police) विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

अलीकडेच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, कर्नाटक राज्य राखीव पोलिस (Karnataka State Reserve Police -KSRP)) दलात विशेष राखीव उपनिरीक्षकाची चार पदे आणि भारतीय राखीव बटालियनमध्ये एक पद राखीव असेल. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तयार केलेल्या ‘तृतीयपंथी (हक्कांचे संरक्षण) नियम- २०२०’ नुसार, ट्रान्सजेंडर उमेदवारांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक (भरती) यांनी सदर अधिसूचना प्रकाशित केली आहे. आता ७० पैकी पाच पदे तृतीयपंथीयांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पात्र उमेदवार १८ जानेवारीपर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये (एफएसएल) तृतीयपंथी उमेदवारांसाठी ‘सीन ऑफ क्राईम’ ऑफिसरसाठी तीन पदे राखीव ठेवण्यात आली आहेत त्यासाठी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील.

तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आम्ही कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यंदा आमच्या बाजूने निकाल आला. कर्नाटक पोलिस आम्हाला कामावर घेणार आहेत, हा एक स्वागतार्ह निर्णय आहे, असं मत सामाजिक कार्यकर्त्या निशा गुल्लूर यांनी मांडलंय.