Police | Bonus | महाराष्ट्रातील पोलिस बांधवांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा |  भारतीय मराठा महासंघ

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

महाराष्ट्रातील पोलिस बांधवांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा |  भारतीय मराठा महासंघ

महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ दिवाळी बोनस देण्यात यावा. पोलीस बांधवांची व कुटुंबाची दिवाळी गोड करावी. पोलीस बांधव जिवाचे रान करून आमची सुरक्षा करतात अशा पोलिस बांधवांना त्वरित बोनस जाहीर करावा. अशी मागणी भारतीय मराठा महासंघाने केली आहे.

महासंघाचे उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश कानवटे म्हणाले,  पोलीस कर्मचाऱ्यांची आपल्या राज्यात दयनीय अवस्था आहे. इतर राज्यातील पोलिसांना जास्त पगार मिळतो. त्या तुलनेत महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळतो. अधिकच्या कामाच्या ताणामुळे पोलीस बांधवांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे त्यांना आरोग्याच्या सुविधा उत्तम दर्जेदार उपलब्ध करून देण्यात याव्यात. ग्रामीण भागातील पोलीस कॉटर्सची दयनीय अवस्था आहे. महिला पोलिसांना त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या सुद्धा लक्षात घेऊन ड्युटीचे स्वरूप व पोस्टिंग देण्यात यावे, अशी आमची भारतीय मराठा महासंघाची मागणी आहे. कोरोना काळात पोलिसांनी सर्वात पुढे राहून काम केले त्यासाठी त्यांना विशेष मानधन,सर्वसाधारण बदल्या तात्काळ करावे. तसेच प्रमोशन वेळोवेळी करावे. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप थांबवावा. पोलिसांना अल्प दरात घर उपलब्ध करून देणे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तयार करणे आणि पोलिसांना दिवाळी सणानिमित्त बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देणे.पोलीस पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना अमलात आणणे, अशा मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीत, तर येत्या 20 तारखेला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाईल. असा इशारा भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश कानवटे यांनी दिला. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष रविराज काळे, प्रमुख संघटक निरज सुतार ,मावळ तालुकाध्यक्ष रवि जगताप,मुळशी तालुकाध्यक्ष अजय चव्हाण उपस्थित होते.