PMRDA : PMC : गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी जागा कोण ताब्यात घेणार?  : PMRDA म्हणते महापालिका तर महापालिका म्हणते PMRDA ने ताबा घेऊन द्यावा! 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी जागा कोण ताब्यात घेणार?

: PMRDA म्हणते महापालिका तर महापालिका म्हणते PMRDA ने ताबा घेऊन द्यावा!

पुणे : विद्यापीठ चौकातील प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विकास आराखड्याप्रमाणे हे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यावरून मात्र संभ्रम  कायम आहे. कारण PMRDA हे काम महापालिकेवर सोपवत आहे. तर महापालिका म्हणते कि, ही सर्व जागा सरकारी आहे. त्यामुळे जागा ताब्यात घेणे हे PMRDA साठी सुलभ काम आहे. PMRDA ने जागा ताब्यात घेऊन आमच्याकडे सोपवली तर आम्ही रस्त्याचे काम करू.

: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रुंदीकरण आवश्यक

सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक येथे गणेशखिंड रस्त्याने होणारी वाहतूक कोंडी विचारात घेऊन व दीर्घकालीन नियोजन करणेसाठी अस्तित्वातील पूल पाडून त्याऐवजी एकाच खाबावर (Pier) दुमजली पूलाचे (वर मेट्रो व त्या खाली दुहेरी वाहतुकीचा उड्डाणपूल) बांधकाम करणेसाठी सवलतकारा सोबत करावयाच्या पूरक करारनामा मसुद्यास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचीव अस्तित्वातील पूल तोडणेस पुणे महानगरपालिकेची मान्यता घेवून सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील अस्तित्वातील दोन उड्डाणपुलाचे पाडकाम माहे जुलै-ऑगस्ट २०२० या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्राधिकरणामार्फत Traffic Diversion Plan तयार करण्यात आला असून सदर आराखड्यास  विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६/१०/२०२१ रोजी  झालोन्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

गणेश खिंड रस्त्याची विकास आराखड्यातील रस्ता रुंदी ४५ मी. असून सध्याचा अस्तित्वातील रस्ता ३६ मी. रुंदीचा आहे. विद्यापीठ चौकामध्ये प्रस्तावित असलेल्या मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी ११.०० मी रुंदीने बॅरीकेडस लावणे व सेनापती बापट चौक ते शिवाजीनगर पर्यंत ९.०० मी रुंदीने बॅरीकेडस लावणे आवश्यक असल्यामुळे अस्तित्वातील ३६.०० मी रुंद (पादचारी मार्गासह) रस्त्यावर वाहतुकीसाठी जास्तीत जास्त २ ते २.५ लेन उपलब्ध राहतील. गणेशखिंड रस्त्यावरील Peak Hour मधील वाहतूक वर्दळ पाहता उपलब्ध रस्ता रुंदी वाहतुकीसाठी पुरेशी होवू शकणार नाहीत व या भागात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यावर पर्याय म्हणून पुणे विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक (सौटी मॉल) या अंदाजे २५०मी. लांबीच्या भागात रस्ता रुंदीकरणकरूनच एकात्मिक दुमजली पुलाचे काम करणे शक्य होणार नाही असे सकृत दर्शनी दिसते.

PMRDA काय म्हणते?

पुणे महानगरपालिके मार्फत गणेशखिंड रस्त्याचे विकास आराखड्याप्रमाणे रुंदीकरण करणेसाठी प्रथम टण्यामध्ये विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चोक या सुमारे २५० मी लांबीमध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूच्या भागात केंद्र व राज्य शासकीय संस्था असल्याने प्राधान्याने आवश्यक जागेचे भूसंपादन करावे व सदर ठिकाणच्या सेवा वाहिन्या स्थलांतरीत कराव्यात व सदर कामे पूर्ण झालेनंतर प्राधिकरणामार्फत या रस्त्याचे रुंदीकरण करावे अशा सूचना विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी दि.२६/१०/२०२१ रोजीच्या बैठकीमध्ये दिल्या आहेत. या  भागात रस्त्याचे रुंदीकरण करूनच मेट्रो / पुलाचे काम करावे, अन्यथा वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होईल असे सर्वांचे मत झाले आहे. तरी, विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चोक या सुमारे २५० मी लांबीमधील रस्त्याचे  रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया पुणे महानगरपालिकेमार्फत पूर्ण करून या प्राधिकरणास जागा हस्तांतर करावी म्हणजे या भागात मेट्रो / पुलाचे काम सुरु करणेसाठी आवश्यकतेप्रमाणे रुंदीकरण काम पूर्ण करणे शक्य होईल.

महापालिका काय म्हणते?

यावर महापालिकेचे म्हणणे आहे कि, रुंदीकरणासाठी आवश्यक सर्व जागा ही सरकारी आहे. PMRDA ही आमच्यापेक्षा मोठी संस्था आहे. त्यामुळे जागा ताब्यात घेण्यास PMRDA ला काही अडचण येणार नाही. त्यामुळे आम्हाला जागा ताब्यात घेऊन दिली तर आम्ही रस्त्याचे काम करू.

Leave a Reply