MLA Sunil Kamble | पोलिसांच्या अर्जित रजा | आमदार सुनील कांबळे यांच्याकडून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत 

Categories
Uncategorized
Spread the love

MLA Sunil Kamble | पोलिसांच्या अर्जित रजा | आमदार सुनील कांबळे यांच्याकडून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

 

MLA Sunil Kamble | राज्यातील पोलीस दलांतर्गत असलेल्या कामाचा व्याप, जबाबदारी इत्यादी बाबी विचारत घेऊन पोलीस शिवाई ते पोलीस निरीक्षक या पदांकरता त्यांना 20 दिवसांच्या नैमित्तिक रजा आणि 15 दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतींसह मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र, आता राज्य सरकारने पोलिसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्यचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे पुणे कॅन्टोन्मेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे यांनी स्वागत केले आहे.(MLA Sunil Kamble)

दि. 21 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदांकरिता 15 दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला. परंतू, आपल्या पोलीस बांधवांसाठी हे सोयिस्कर नाही, कारण पोलीस बांधवांना दर आठवड्याला एक साप्ताहिक ती पण मिळतेचं असं नाही, आपले पोलीस बांधव ड्युटीसाठी 24 तास बांधिल असतात. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा असे पत्र आमदार सुनील कांबळे यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.

 

आमदार सुनील कांबळे यांच्या पत्राची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दखल घेऊन हा शासन निर्णय तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले आहे. राज्याच्या गृहविभाने शुक्रवारी (दि.23) नवीन शासन निर्णय जारी करुन 21 फेब्रुवारीचा शासन निर्णय रद्द केला आहे. गृहविभागाने  काढलेल्या नव्या शासन निर्णयाचे आमदार सुनील कांबळे यांनी स्वागत करुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.