PMC Pune Transgender Employees |  Pune Municipal Corporation will hire 25 Transgender

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Transgender Employees |  Pune Municipal Corporation will hire 25 Transgender

 |  pune Municipal Commissioner’s approval of Security Department’s proposal

 PMC Pune Transgender Employees |  Transgender persons are going to join the service of Pune Municipal Corporation (PMC) as contract employees.  Pune Municipal Corporation (PMC Pune) intends to take a progressive step and bring transgenders into the mainstream with the aim of ensuring that all sections of the society get equal treatment under the Civil Rights Act.  On the proposal of the Security Department, Administrator and PMC Commissioner Vikram Kumar and Additional Municipal Commissioner (Estate) Kunal Khemnar approved the immediate hiring of 25 transgender persons through contractors and the rest on a phased basis.  is  This information was given by Deputy Commissioner Madhav Jagtap.  (PMC Pune Transgender Employees)
 Kamla Nehru Hospital of Pune Municipal Corporation, Rajiv Gandhi Zoo, Manpa Bhawan Also the said transgender for the action of the Unauthorized Construction Removal and Encroachment Department
 Individuals will be appointed.  Currently working Sainik Security Pvt. Ltd.  And Eagle  Security Pvt. Ltd.  Salaries and government payments will be paid by this private company.
 The proposal for the said work was prepared and submitted by Madhav Jagtap (Deputy Commissioner Security Department).  Also, by creating a committee of charitable organizations working for the third-class in city, an awareness campaign will be implemented to maintain harmony and social affection between municipal staff officers and transgender workers.  In the future, it is resolved to bring people from the third class into the mainstream of the society and implement people-oriented activities for them and accordingly the action has been started.  The initiative of Pune Municipal Corporation is important in terms of providing justice to every section of the society.  Madhav Jagtap said on this occasion.  (PMC Pune news)

PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिका 25 तृतीयपंथीयांना घेणार कामावर! 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Transgender Employees | पुणे महापालिका 25 तृतीयपंथीयांना घेणार कामावर!

| सुरक्षा विभागाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मान्यता

PMC Pune Transgender Employees | पुणे महानगरपालिकेच्या (Pune municipal corporation) सेवेत तृतीयपंथी व्यक्तींना (Transgender) कंत्राटी सेवक (Contract employee) म्हणून रुजू होणार आहेत.  पुणे महानगरपालिकेने (PMC Pune) एक पुरोगामी पाउल उचलण्याचा मानस असून समाजातील सर्वच वर्गाना नागरिक हक्क कायद्यानुसार समानतेची वागणूक मिळावी या उद्देशाने तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे कामी मनपाच्या मिळकतीचे संरक्षणार्थ प्रायोगिक तत्वावर २५ तृतीयपंथी व्यक्तींना कामावर घेतले जाणार आहे. या बाबतच्या सुरक्षा विभागाच्या प्रस्तावावर  प्रशासक तथा आयुक्त  विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) व  अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट)  कुणाल खेमनार (PMC Additional commissioner Dr Kunal Khemnar) यांनी २५ तृतीयपंथी व्यक्तींना तातडीने ठेकेदारामार्फत कामावर रुजू करून घेण्यास व उर्वरितांना टप्याटप्याने कामावर घेण्यास मान्यता दिली आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिली. (PMC Pune Transgender Employees)

पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, मनपा भवन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मुलन व अतिक्रमण विभागाच्या कारवाई करिता सदरच्या तृतीयपंथी
व्यक्तींना नेमणूक दिली जाणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या सैनिक सेक्युरिटी प्रा.लि. व इगल सेक्युरिटी प्रा.लि. या खाजगी कंपनी कडून वेतन तसेच सरकारी देय देणे दिली जाणार आहेत.
सदर कामाचा प्रस्ताव  माधव जगताप ( उप आयुक्त सुरक्षा विभाग) यांनी तयार करून सादर केला होता. तसेच याकामी शहरातील तृतीयपंथीय वर्गासाठी काम करण्याऱ्या सेवाभावी संस्थांचे कमिटी तयार करून मनपा कर्मचारी अधिकारी व तृतीयपंथी कामगार याच्यात सलोख्याचे व सामाजिक स्नेह राहावं यासाठी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. भविष्यात तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याकरिता लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प असून त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेचा उपक्रम समाजातील प्रत्येक घटकास न्याय देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. असे माधव जगताप यावेळी म्हणाले. (PMC Pune news)
News Title | PMC Pune Transgender Employees | Pune Municipal Corporation will hire 25 transgender

PMC Pune | पुणे महापालिका वर्धापनदिन विशेष | पुणे महापालिका तृतीय पंथीयांना देणार नोकरी!

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिका वर्धापन दिन विशेष

पुणे महापालिका तृतीय पंथीयांना देणार नोकरी!

| पहिल्या टप्प्यात 28 जणांना घेतले जाणार कामावर

पुणे | पुणे महापालिका शहरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून महापालिका तृतीय पंथीयांना महापालिकेत नोकरी देणार आहे. तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापालिका 50 तृतीय पंथीयांना नोकरी देणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात लवकरच 28 जणांना कामावर घेतले जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सुरक्षा विभागाने तयार केला असून तो अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांसमोर ठेवला जाणार आहे. अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (Pmc Pune)
पुणे महापालिका आज आपला 73 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. महापालिका शहरात नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून आणि सामाजिक काम म्हणून महापालिका तृतीय पंथीयांना नोकरी देणार आहे. काही सामाजिक संघटनांनी याबाबत महापालिकेकडे मागणी केली होती. याबाबत प्रशासन आणि संघटनांच्या वारंवार बैठका देखील झाल्या होत्या. सामाजिक संघटनांचे म्हणणे होते कि तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका पुढाकार घेऊ शकते. त्यातून ही संकल्पना पुढे आली आहे. (Pmc Pune anniversary special)
सूत्रांच्या माहितीनुसार कंत्राटी पद्धतीने हे तृतीयपंथी कामावर घेतले जातील. एकूण 50 जणांना कामावर घेतले जाईल. त्यासाठी महापालिकेने त्यांच्यासाठी स्वतंत्र मूलभूत सुविधा देखील तयार केल्या आहेत. यामध्ये स्वतंत्र स्वछतागृह, आदींचा समावेश आहे. तसेच  महापालिका कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्यासोबत सौहार्दाने, सलोख्याने वागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 28 जणांना कामावर घेतले जाणार आहे. या लोकांना उद्यान विभाग, हॉस्पिटल आणि अतिक्रमण विभागात काम दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांच्या मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation)
दरम्यान महापालिकेला अतिक्रमण कारवाई करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण देखील होते. खास करून जेव्हा महिला नागरिक अंगावर येतात तेव्हा महापालिका कमर्चारी प्रतिकार करू शकत नाहीत. नुकतीच औंध परिसरात महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती. त्यामुळे अतिक्रमण कारवाईच्या पथकात एक तृतीयपंथी दिला तर कारवाई करणे सोपे जाईल. असे महापालिका प्रशासनाला वाटते. त्यामुळे 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकात तृतीयपंथी नेमण्यात येतील. याची तयारी महापालिका प्रशासनाने केली असून लवकरच त्यावर अंमल केला जाणार आहे. (Transgender recruiting)

Karnataka: Transgender: कर्नाटक सरकार तृतीयपंथीयांना देणार पोलिसांची नोकरी

Categories
Breaking News social देश/विदेश

कर्नाटक सरकार तृतीयपंथीयांना देणार पोलिसांची नोकरी 

विविध पदांसाठी अर्ज मागविले

बंगळूर : कर्नाटक सरकारने प्रथमच राज्य पोलिस खात्यातील भरतीसाठी तृतीयपंथी (transgenders) उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. ‘कर्नाटक नागरी सेवा (सामान्य भरती) नियम- १९७७’ च्या दुरुस्तीनुसार तृतीयपंथीयांना एक टक्का नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी कर्नाटक पोलिस विभागाने (Karnataka Police) विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

अलीकडेच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, कर्नाटक राज्य राखीव पोलिस (Karnataka State Reserve Police -KSRP)) दलात विशेष राखीव उपनिरीक्षकाची चार पदे आणि भारतीय राखीव बटालियनमध्ये एक पद राखीव असेल. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तयार केलेल्या ‘तृतीयपंथी (हक्कांचे संरक्षण) नियम- २०२०’ नुसार, ट्रान्सजेंडर उमेदवारांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक (भरती) यांनी सदर अधिसूचना प्रकाशित केली आहे. आता ७० पैकी पाच पदे तृतीयपंथीयांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पात्र उमेदवार १८ जानेवारीपर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये (एफएसएल) तृतीयपंथी उमेदवारांसाठी ‘सीन ऑफ क्राईम’ ऑफिसरसाठी तीन पदे राखीव ठेवण्यात आली आहेत त्यासाठी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील.

तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आम्ही कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यंदा आमच्या बाजूने निकाल आला. कर्नाटक पोलिस आम्हाला कामावर घेणार आहेत, हा एक स्वागतार्ह निर्णय आहे, असं मत सामाजिक कार्यकर्त्या निशा गुल्लूर यांनी मांडलंय.

Barshi : Transgender Meeting : वर्तन चांगले ठेवा; समाज नक्कीच डोक्यावर घेईल!  : लेखक सचिन वायकुळे

Categories
social महाराष्ट्र

वर्तन चांगले ठेवा; समाज नक्कीच डोक्यावर घेईल!

:लेखक सचिन वायकुळे यांनी तृतीयपंथीयांच्या बैठकीत व्यक्त केले विचार

बार्शी:- स्त्री अन पुरुष यांच्या मधले आयुष्य म्हणजेच तृतीयपंथी होणे हे नक्कीच भूषण नाही, याकडे समाज खूप सहानुभूतीपूर्वक पाहत आला आहे. मात्र काहींच्या चुकीच्या वर्तनामुळे सर्वच तृतीयपंथीबद्दल नकारात्मक वातावरण तयार होत आहे.  चांगल्या वर्तनाने हे बदलता येईल; शिवाय समाजही तुम्हाला नक्कीच डोक्यावर घेईल, असे मत लेखक सचिन वायकुळे यांनी व्यक्त  केले.
येथील स्मार्ट अकॅडमीमध्ये बार्शी शहर व तालुक्यातील तृतीयपंथींची बैठक घेण्यात आली.या बैठकीत सूचना व मार्गदर्शन करताना वायकुळे बोलत होते.

: बार्शी तालुक्यातील  तृतीयपंथींची बैठक

मागील काही दिवसांपासून व्यापारी व नागरिक यांना तृतीयपंथींचा त्रास होत असल्यासाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. अलीकडच्या काही दिवसांत तृतीयपंथींची संख्या वाढत असल्याने अंतर्गत स्पर्धाही निर्माण होऊ लागली आहे. याचा त्रास समाजातील विविध घटकांना होत आहे. तुम्ही याबाबत गंभीरपणे विचार करायला हवा आणि वर्तमानात, संभाषणात काही बदल करावेत, असे आवाहन वायकुळे यांनी केले. खरे तर कोणत्याही तृतीयपंथीचे आयुष्य  वेदनेने भरलेले असते. तृतीयपंथींना मदत करण्याची भावना समाजातील प्रत्येकाची असते.  फक्त ही मदत सन्मानाने घ्यावी. पैसे दिले नाहीत म्हणून  कोणतेही अपशब्द  वापरू नये, भविष्याचा विचार करून बचत खाते उघडून पैशांची बचत करावी, इतर अनाथांनाही मदत करण्यास तृतीयपंथींनी पुढे यावे. अशी काही पथ्ये पाळल्यास, वर्तनात बदल केल्यास नक्कीच आणखी सहानुभूतीचे वातावरण तयार होईल, असे वायकुळे म्हणाले.
शहर व तालुक्यतील बहुतांश तृतीयपंथी यावेळी उपस्थित होते.