Barshi : Transgender Meeting : वर्तन चांगले ठेवा; समाज नक्कीच डोक्यावर घेईल!  : लेखक सचिन वायकुळे

Categories
social महाराष्ट्र
Spread the love

वर्तन चांगले ठेवा; समाज नक्कीच डोक्यावर घेईल!

:लेखक सचिन वायकुळे यांनी तृतीयपंथीयांच्या बैठकीत व्यक्त केले विचार

बार्शी:- स्त्री अन पुरुष यांच्या मधले आयुष्य म्हणजेच तृतीयपंथी होणे हे नक्कीच भूषण नाही, याकडे समाज खूप सहानुभूतीपूर्वक पाहत आला आहे. मात्र काहींच्या चुकीच्या वर्तनामुळे सर्वच तृतीयपंथीबद्दल नकारात्मक वातावरण तयार होत आहे.  चांगल्या वर्तनाने हे बदलता येईल; शिवाय समाजही तुम्हाला नक्कीच डोक्यावर घेईल, असे मत लेखक सचिन वायकुळे यांनी व्यक्त  केले.
येथील स्मार्ट अकॅडमीमध्ये बार्शी शहर व तालुक्यातील तृतीयपंथींची बैठक घेण्यात आली.या बैठकीत सूचना व मार्गदर्शन करताना वायकुळे बोलत होते.

: बार्शी तालुक्यातील  तृतीयपंथींची बैठक

मागील काही दिवसांपासून व्यापारी व नागरिक यांना तृतीयपंथींचा त्रास होत असल्यासाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. अलीकडच्या काही दिवसांत तृतीयपंथींची संख्या वाढत असल्याने अंतर्गत स्पर्धाही निर्माण होऊ लागली आहे. याचा त्रास समाजातील विविध घटकांना होत आहे. तुम्ही याबाबत गंभीरपणे विचार करायला हवा आणि वर्तमानात, संभाषणात काही बदल करावेत, असे आवाहन वायकुळे यांनी केले. खरे तर कोणत्याही तृतीयपंथीचे आयुष्य  वेदनेने भरलेले असते. तृतीयपंथींना मदत करण्याची भावना समाजातील प्रत्येकाची असते.  फक्त ही मदत सन्मानाने घ्यावी. पैसे दिले नाहीत म्हणून  कोणतेही अपशब्द  वापरू नये, भविष्याचा विचार करून बचत खाते उघडून पैशांची बचत करावी, इतर अनाथांनाही मदत करण्यास तृतीयपंथींनी पुढे यावे. अशी काही पथ्ये पाळल्यास, वर्तनात बदल केल्यास नक्कीच आणखी सहानुभूतीचे वातावरण तयार होईल, असे वायकुळे म्हणाले.
शहर व तालुक्यतील बहुतांश तृतीयपंथी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply