PMC Pune | पुणे महापालिका वर्धापनदिन विशेष | पुणे महापालिका तृतीय पंथीयांना देणार नोकरी!

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

पुणे महापालिका वर्धापन दिन विशेष

पुणे महापालिका तृतीय पंथीयांना देणार नोकरी!

| पहिल्या टप्प्यात 28 जणांना घेतले जाणार कामावर

पुणे | पुणे महापालिका शहरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून महापालिका तृतीय पंथीयांना महापालिकेत नोकरी देणार आहे. तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी महापालिका 50 तृतीय पंथीयांना नोकरी देणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात लवकरच 28 जणांना कामावर घेतले जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सुरक्षा विभागाने तयार केला असून तो अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांसमोर ठेवला जाणार आहे. अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (Pmc Pune)
पुणे महापालिका आज आपला 73 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. महापालिका शहरात नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून आणि सामाजिक काम म्हणून महापालिका तृतीय पंथीयांना नोकरी देणार आहे. काही सामाजिक संघटनांनी याबाबत महापालिकेकडे मागणी केली होती. याबाबत प्रशासन आणि संघटनांच्या वारंवार बैठका देखील झाल्या होत्या. सामाजिक संघटनांचे म्हणणे होते कि तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका पुढाकार घेऊ शकते. त्यातून ही संकल्पना पुढे आली आहे. (Pmc Pune anniversary special)
सूत्रांच्या माहितीनुसार कंत्राटी पद्धतीने हे तृतीयपंथी कामावर घेतले जातील. एकूण 50 जणांना कामावर घेतले जाईल. त्यासाठी महापालिकेने त्यांच्यासाठी स्वतंत्र मूलभूत सुविधा देखील तयार केल्या आहेत. यामध्ये स्वतंत्र स्वछतागृह, आदींचा समावेश आहे. तसेच  महापालिका कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्यासोबत सौहार्दाने, सलोख्याने वागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 28 जणांना कामावर घेतले जाणार आहे. या लोकांना उद्यान विभाग, हॉस्पिटल आणि अतिक्रमण विभागात काम दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांच्या मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation)
दरम्यान महापालिकेला अतिक्रमण कारवाई करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण देखील होते. खास करून जेव्हा महिला नागरिक अंगावर येतात तेव्हा महापालिका कमर्चारी प्रतिकार करू शकत नाहीत. नुकतीच औंध परिसरात महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती. त्यामुळे अतिक्रमण कारवाईच्या पथकात एक तृतीयपंथी दिला तर कारवाई करणे सोपे जाईल. असे महापालिका प्रशासनाला वाटते. त्यामुळे 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकात तृतीयपंथी नेमण्यात येतील. याची तयारी महापालिका प्रशासनाने केली असून लवकरच त्यावर अंमल केला जाणार आहे. (Transgender recruiting)