MLA Sunil Tingre | रस्त्यांची दूरावस्था दूर करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा : सुनील टिंगरे

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

रस्त्यांची दूरावस्था दूर करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा : सुनील टिंगरे

अपूर्ण कामे व खड्डे लवकरात लवकर बुजविण्याच्या आमदारांच्या महापालिका प्रशासनास सूचना
नवीन पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासोबतच रस्त्यांवर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत. रस्त्यांची दूरावस्था दूर करून
नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या तात्काळ सोडविण्याचा सूचना वडगावशेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनास केल्या.
लोहगाव परिसरातील विविध रस्त्यांच्या कामांची पाहणी, रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच पोरवाल रोड येथील रस्त्याच्या भूसंपादनाच्या कामाची पाहणी आमदार सुनील टिंगरे यांनी शुक्रवारी सकाळी केली. यावेळी महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर व इतर अधिकारी उपस्थित होते. या बाबत अधिक माहिती देताना सुनील टिंगरे यांनी सांगितले कि लोहगाव परिसरातील खंडोबा माळ, पठारे वस्ती व इतर अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे पडलेले आहेत. अशा रस्त्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेल्या अधिकार्‍यांसोबत या परिसरातील कामांचे निरीक्षण करण्यात आले. अनेक नागरिकांनी त्यांच्या समस्या अधिकार्‍यांच्या पुढे मांडल्या.
पोरवाल परिसरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पर्यायी रस्ता नियम २०५ च्या अंतर्गत करण्यात येत आहे. या रस्त्यांसाठी २०० मीटरचे भूसंपादन बाकी आहे. ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सुनील टिंगरे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. ऑर्चिड हॉस्पिटल शेजारील आर.पी. रोड शुरू करणे आवश्यक आहे, या रस्त्यामुळे पोरवाल रोडवरील ताण कमी होणार आहे. या आर.पी. रोडचे कार्य लवकर करण्यात यावे. पोरवाल रोड परिसरातील सर्व पर्यायी मार्ग वाहतूकीसाठी खुले करण्याचे निर्देश प्रशासनास यावेळी देण्यात आले.

लोहगाव परिसरात पाणी वितरणचे जाळे तयार करा

सुनील टिंगरे यांनी सांगितले कि महापालिकेत समाविष्ठ झाल्यानंतरही लोहगावातील पाणी समस्या दूर झालेली नाही. गावातील जुन्या पाइपलाइन काढून त्याजागी नवीन पाणी वितरणाचे जाळे पसरविणे आवश्यक आहे. या कामाकरिता ६० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. हे काम लवकर सुरू करण्याची सूचना प्रशासनास करण्यात आली. साठे वस्ती तसेच पोरवाल रोड परिसरातील नागरिकांना देखील पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. याकरिता ८ इंचाची नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ग्रॅविटीने पाइपलाइन मधून पाणी घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरासाठी पाइपलाइनला बूस्टर लावण्याचे काम १५ दिवसात केले जाणार आहे. पाणी पुरवठ्याची सर्व कामे लवकर पूर्ण करण्याचा निर्देश सुनील टिंगरे यांनी प्रशासनास दिला.
 या वेळी पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे मुख्य अभियंता वी.जी. कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, शाखा अभियंता अलुरकर, उप अभियंता अनवर मुल्ला, उप अभियंता मतीकूंड, कनिष्ठ अभियंता बुध्दप्रकाश वाघमारे, कनिष्ठ अभियंता कोतवाल, एल.आर.डब्ल्यू.ए (लोहगाव रेसीडंट वेलफेर असोसिएशन) चे अध्यक्ष संदिप लोखंडे, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.