PMC Water Supply Scheme | लोहगांव आणि वाघोली गावाच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी 173 कोटींचा खर्च!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Supply Scheme | लोहगांव आणि वाघोली गावाच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी 173 कोटींचा खर्च!

PMC Water Supply Scheme | पुणे | महापालिका (PMC Pune) हद्दीत 2017 साली समाविष्ट झालेल्या लोहगांव (Lohgaon) आणि वाघोली (Wagholi) या गावांत समान पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी 173 कोटींचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)
राज्य सरकारच्या वतीने 2017 साली महापालिका हद्दीत 11 गावे समाविष्ट केली होती. यामध्ये लोहगाव आणि वाघोली या गावांचा समावेश होता. पुणे शहरा प्रमाणे या गावांत देखील समान पाणीपुरवठा योजना राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार या योजने अंतर्गत वाघोली आणि लोहगांव या गावांत पाण्याच्या लाईन विकसित करायच्या आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती. हे काम अरिहंत कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. त्यानुसार या कामासाठी 173 कोटी इतका खर्च येणार आहे. त्यानुसार मंजूरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

Pune Nagar Road Traffic  | एनएचआयचा दुमजली उड्डाणपूल थेट रामवाडीपर्यंत | नगर रस्त्यावर येरवडा ते वाघोली आता जा सुसाट

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Nagar Road Traffic  | एनएचआयचा दुमजली उड्डाणपूल थेट रामवाडीपर्यंत | नगर रस्त्यावर येरवडा ते वाघोली आता जा सुसाट

| शास्त्रीनगर चौकात उड्डाणपुल आणि ग्रेड सेपरेटर होणार

| पालकमंत्री अजित पवार अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

Pune Nagar Road Traffic | नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार सुनिल टिंगरे (MLA Suil Tingre ) यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नगर रस्त्यावर एनएचआयच्या (NHAI) माध्यमातून होणारा दुमजली उड्डाणपूल (Double Decker Flyover) आता वाघोलीऐवजी थेट रामवाडीपर्यंत करण्याचा आणि त्यापुढे शास्त्रीनगर चौकात महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) माध्यमातून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (Pune News)

नागपुर हिवाळी अधिवेशनात पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरील लक्षवेधीत वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात ही बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवार पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनिल टिंगरे, आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे, वाहतूक पोलिस सहआयुक्त श्री संखे उपस्थित होते. या बैठकीत नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी एनएच आयच्या माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत जो दुमजली उड्डाणपुल प्रस्तावित आहे. तो थेट विमाननगर- रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आलाय अशा सूचना एनएच आयला करण्यात आले. तसेच शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग ( ग्रेड सेपरेटर) उभारण्यात येणार असून त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी असे आदेश पालकमंत्री पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

यावेळी रखडलेल्या शिवणे- खराडी रस्ताबाबतही चर्चा झाली. हा रस्ता तातडीने मार्गी लावण्यासाठी तातडीने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी आणि या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी सुचना पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याना दिल्या. तसेच वडगाव शेरी विधान सभा मतदार संघातील धानोरी, संतनगर, फाईव्ह नाईन चौक ते धानोरी, विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करावी आणि त्यासंदर्भात कार्यवाही करावी अशा सूचनाही पवार यांनी बैठकीत केल्या.
————————————————
मेट्रो मार्गिका विमानतळापर्यंत करा – पवारांच्या सूचना

नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत असलेला मेट्रो मार्ग थेट पुणे विमानतळापर्यंत जोडा असे आदेश पालकमंत्री पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्याना दिले. याबाबत तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले.
————————————

Lohgaon Water Issue | लोहगाव – धानोरी – वाघोलीचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार | लोहगाव-धानोरीत 13 नवीन पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Lohgaon Water Issue | लोहगाव – धानोरी – वाघोलीचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार

| लोहगाव-धानोरीत 13 नवीन पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार

Lohgaon Water Issue | लोहगाव – धानोरी – वाघोलीचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार असण्याची शक्यता आहे. कारण लोहगाव-धानोरीत समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत 13 नवीन पाण्याच्या टाक्या बांधल्या जाणार आहेत. याबाबतच्या सुमारे 230 कोटीच्या निविदाच्या प्रस्तावाला मंगळवारच्या एस्टीमेट कमिटीत (PMC Estimate Committee) मंजूरी देण्यात आली आहे. (Lohgaon Water Issue)
महापालिकेत समाविष्ट होऊनही लोहगाव – वाघोली परिसराला पाणी टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत होते. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यामुळे प्रशासना देखील हा विषय गंभीरपणे घेतला होता. त्यानुसार प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी एस्टीमेट कमिटी समोर ठेवला होता. याला नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)
महापालिकेत समाविष्ट होऊनही लोहगाव – वाघोली परिसराला पाणी टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत होते. हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने दिलेल्या आश्वासानुसार या योजनेच्या २३० कोटी रुपयांच्या योजनेला आज पूर्वगणन समितीत मंजुरी दिली. त्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार. लवकरच या योजनेची निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू होईल आणि लोहगाव परिसराचा पाणी प्रश्न मार्गी लागेल अशी खात्री आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा कायम सुरू राहील.
   – सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.
—-
News Title | Lohgaon Water Issue | Lohgaon-Dhanori-Wagholi water problem will be solved forever 13 new water tanks will be constructed in Lohgaon-Dhanori

Wagholirescueupdate | वाघोलीत एसपी टॅंक मध्ये पडून 3 कामगारांचा मृत्यू

Categories
Breaking News पुणे

Wagholirescueupdate | एस.टी.पी टॅंक मध्ये पडुन 3 कामगारांचा मृत्यू

वाघोली ( पुणे)  | शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एस.टी.पी टॅंक चे काम चालू असतांना 3 कामगारांचा टॅंक मध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार सोलासिया सोसायटी फेज-२ वाघोली पुणे येथे नितीन प्रभाकर गोंड वय-४५ ( बुलढाणा) , सतिशकुमार चौधरी वय-३५ ( उत्तर प्रदेश)  तसेच गणेश पालेकराव वय-२८ ( नांदेड)या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

गजानन कुरमभट्टी हे ठेकेदार असून पहाटे ०६.०० च्या सुमारास टॅंक चे काम चालू असतांना टॅंक मध्ये पडल्याने स्थानिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( PMRDA) वाघोली अग्निशमन केंद्र येथे सकाळी ०७:०० वा कळवण्यात आले .
अग्निशमन दलाला माहिती मिळतात अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी श्री विजय महाजन. वाहन चालक – नितीन माने, संदीप शेळके फायरमन- चेतन खमसे , मयूर गोसावी , तेजस डांगरे , विकास पालवे, अभिजीत दराडे , अक्षय बागल हे तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन अथक प्रयत्नानंतर तीन मृत व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.