MLA Sunil Tingre | लोहगाव उपजिल्हा रुग्णालय लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार | आमदार सुनिल टिंगरे यांनी रूग्णालयाच्या कामाची केली पाहणी

Categories
Breaking News PMC Political आरोग्य पुणे

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार

| आमदार सुनिल टिंगरे यांनी रूग्णालयाच्या कामाची केली पाहणी

वडगाव शेरी मतदार संघातील लोहगाव येथे मंजूर असलेले उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगती पथावर आहे. गुरुवारी या रूग्णालयाच्या कामाची पाहणी आमदार सुनिल टिंगरे यांनी केली. अपूर्ण असलेली कामे लवकर पूर्ण करून रूग्णालय लवकरात लवकर नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची सूचना अधिकार्‍यांना आमदार टिंगरे यांनी केली.
मागील दोन वर्षांच्या काळात रूग्णालयाच्या कामामध्ये गती आली. आमदार सुनिल टिंगरे यांनी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्ती निधी मिळविला. डिसेंबर अखेर रूग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. नागरिकांच्या सेवेमध्ये मार्च २०२३ मध्ये रूग्णालय रूजू होगणार आहे. रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून, अंतर्गत सोयी सुविधा व उर्वरीत कामे गतीने पूर्ण केली जात आहेत. आमदार सुनिल टिंगरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रूग्णालयाच्या सुधारित कामांसाठी आणखी २४ कोटी रुपए निधी मंत्रालयातून मिळाला आहे. या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. रूग्णालयाच्या कामाची पाहणी करताना आमदार सुनिल टिंगरे यांच्या सोबत जिला शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, कार्यकारी अभियंता अजय भोसले, उप अभियंता जान्हवी रोडे, तसेच विद्युत विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सुसज्ज रूग्णालयाची गरज लवकरच पूर्ण
आमदार सुनिल टिंगरे यांनी सांगितले कि वडगावशेरी मतदार संघातील नागरिकांना उपचाराकरिता ससून हॉस्पिटल जावे लागत आहे. या परिसरात सरकारी व सर्व सोयींनी युक्त असे हॉस्पिटल उपलब्ध नाही. अनेकदा नागरिकांना खासगी हॉस्पिटलवर अवलंबून रहावे लागत आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन लोहगाव येथे सुसज्ज रूग्णालय बनविले जात आहे. रूग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत येणार आहे. या रूग्णालयामुळे गरीब व गरजवंतांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.