Pune Municipal Corporation (PMC) | महापालिकेच्या नव्या व जुन्या इमारतीतील देखभालीची कामे काही केल्या संपेना | अजून अडीच कोटींचे वर्गीकरण

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Pune Municipal Corporation (PMC) | महापालिकेच्या नव्या व जुन्या इमारतीतील देखभालीची कामे काही केल्या संपेना

| अजून अडीच कोटींचे वर्गीकरण

(Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेचा (PMC Pune) कामाचा वाढता बोज पाहता नवीन इमारत बांधण्यात (PMC New Building) आली आहे. यावर करोडो रुपये खर्च केले आहेत. करोडो खर्चूनही या दोन्ही इमारतीतील देखभाल आणि दुरुस्तीची कामे काही केल्या संपताना दिसत नाहीत. देखभाल दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम कमी आहे म्हणून अजून अडीच कोटींचे वर्गीकरण या कामासाठी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune PMC News)

प्रशासनाच्या प्रस्तावानुसार पुणे मनपा मुख्य इमारत (जुनी व नवी ) तसेच मनपा इतर इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणत मनपा कर्मचारी, अधिकारी वर्ग कार्यरत असून या ठिकाणी शहरातील नागरिक गोठ्या संख्येने त्यांच्या कामासाठी येत असतात. त्यामुळे या इमारतींमध्ये या सर्वांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती, फर्निचर विषयक कामे या ठिकाणची शौचालय दुरुस्ती, नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक सूचना फलक इ.ची कामे भवन रचना कार्यालयास करावी लागतात. परंतु या कामासाठी दरवर्षी RE11J103 भवन दुरुस्ती (भवन) बजेटहेड वर उपलब्ध होणारी १ कोटी ही तरतूद अपुरी पडत आहे. ही कामे करण्यासाठी चालू वर्षीची अपुरी तरतूद लक्षात घेता वर्गीकरणाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेणे शक्य आहे. त्यासाठी वित्तीय समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार पुणे मनपा भवन येथे चौथ्या मजल्यावर विस्तारित कक्षाची उभारणी करणे यासाठी अडीच कोटीची असणारी तरतूद पुणे मनपाच्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार आहे. दरम्यान सर्व कामे एकाच निविदे मधून करण्यात येणार नसून कामाच्या स्वरूपानुसार या कामांसाठी स्वतंत्रपणे निविदा प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. असे प्रस्तावात म्हटले आहे.

—-