Pune Municipal Corporation | महाविकास आघाडी सरकारने दिलेली उद्दिष्ट्ये महापालिका पूर्ण करणार का?

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

महाविकास आघाडी सरकारने दिलेली उद्दिष्ट्ये महापालिका पूर्ण करणार का?

महाविकास आघाडी सरकारने महापालिका प्रशासनाला शाश्वत विकासाची उद्दिष्टे दिली आहेत. यामध्ये शहरी भागातील गरीब कुटुंबांना पाणीपट्टी माफ करणे, मालमत्ता कर सवलत / माफी देणे, अशा विविध योजनांचा समावेश आहे. महापालिका ही उद्दिष्टे पूर्ण करू शकणार का? दोन वर्षांपूर्वीच हे आदेश देण्यात आले आहेत.

ही आहेत उद्दिष्टे

अ) शहरी भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी महापालिका व नगरपालिका अंतर्गत कौशल्य विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण व अनुदानाचे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावे.
आ) गरीब महिलांना त्यांचे शहरी स्वयंसहाय्यता बचत गटामार्फत उत्पन्नाची साधने मिळण्यासाठी महापालिका व नगरपालिकांमधून देण्यात येणाऱ्या छोट्या कंत्राटांमध्ये आरक्षण देण्यात यावे.
) शहरी भागातील गरीब कुटुंबांना पाणीपट्टी माफ करणे, मालमत्ता कर सवलत / माफी देणे. (मुंबई महापालिकेने पाचशे चौ. फूट पर्यंत माफी दिली आहे.) महापालिका नगरपालिकांच्या शाळांमध्ये स्मार्ट कोर्सेस सुरु कोर्स उपलब्ध करून देणे, डिजिटल व टॅबदद्वारे शिक्षणावर भर देणे, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. महापालिका क्षेत्रात निवारा केंद्र चालवणे.

ऊ) महापालिका / नगरपालिकांचे दवाखाने अधिक बळकट करणे, तेथील डॉक्टर नर्सेसची रिक्त पदे भरणे, वैद्यकीय उपकरणे सेवा सुविधा पुरवणे, साथरोग प्रतिबंधाचे काम अधिक प्रभावी रीतीने करणे.
ए) नगरपालिका / महानगरपालिकांमधील सर्व समित्यांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवणे.
ऐ) नैसर्गिक आपत्ती पूर/आग याचे प्रतिबंधासाठी सार्वत्रिक प्रभावी उपाययोजना करणे.
ओ) हवेची शुद्धता, सार्वजनिक कचरा विलगीकरण, पुनर्वापर व व्यवस्थापन यानुसार नगरपालिका/महापालिका यांचेमध्ये स्पर्धा ठेवून मानांकन जाहीर करणे यात उत्कृष्ट ठरणाऱ्या संस्थाचा गौरव करणे.
औ) आर्थिक दुर्बल घटकांसाठी आवास योजना योजना चा कार्यक्रम राबवणे.