34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठीच्या लोकप्रतिनिधी समितीत नवीन 9 सदस्यांच्या यादीत बाबुराव चांदेरे यांचा समावेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठीच्या लोकप्रतिनिधी समितीत नवीन 9 सदस्यांच्या यादीत बाबुराव चांदेरे यांचा समावेश

34 Villages Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. हा प्रश्न मागील काही दिवसांपासून गंभीर होत चालला आहे.  आता यावर तोडगा काढण्यात आला असून यासाठी विभागीय आयुक्तांच्या (Pune Divisional Commissioner) अध्यक्षतेखाली १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान याबाबत काही सदस्यांनी आम्हांला डावलले गेल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार या यादीत अजून 9 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचा समावेश आहे.

       बाणेर – बालेवाडी या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यामध्ये यशस्वी ठरलेले त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये एक वर्ष स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम पाहणारे सलग दोन अर्थसंकल्प सादर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांची नवीन समाविष्ट ३४ गावांच्या लोकप्रतिनिधी म्हणून सुस, महाळुंगे व बावधान या गावांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Amol Balwadkar Vs Baburao Chandere | बाबूराव चांदेरेंच्या भावनेचा विचार करून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी द्यावी  : अमोल बालवडकर यांची प्रतिक्रिया 

Categories
Breaking News Political पुणे

बाबूराव चांदेरेंच्या भावनेचा विचार करून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी द्यावी

: अमोल बालवडकर यांची प्रतिक्रिया

पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील कलगीतुरा नेहमीच पाहायला मिळतो. महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीला वेग आला आहे. त्यामुळे सगळे कंबर कसून कामाला लागले आहेत. अशातच औंध बालेवाडी प्रभागावर sc चे आरक्षण पडले आहे. राष्ट्रवादीकडून बाबूराव चांदेरे यांनी उमेदवारी मागितली आहे. यावर भाजपचे अमोल बालवडकर यांनी उपहासात्मक टीका केली आहे. बालवडकर यांनी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष्याना विनंती केली आहे कि, चांदेरे यांच्या भावनेचा आदर करून त्यांना प्रभागातून उमेदवारी द्यावी.
बालवडकर म्हणाले, आधी  बाणेर – बालेवाडी प्रभाग स्वतःच्या राजकिय सुरक्षिततेसाठी चुकिच्या पद्धतीने तोडायचा ! परत वर म्हणायचं ‘ मी बालेवाडी -औंध प्रभागातुन इच्छुक आहे. वाह !
एव्हढा कॅान्फिडन्स आणता तरी कुठुन? माझी शहर अध्यक्ष प्रशांतजी जगताप यांना विनंती आहे कि आपण माजी नगरसेवक चांदेरे यांच्या भावनेचा विचार करावा व त्यांना बालेवाडी – औंध मधुन उमेदवारीवर द्यावी.
यावर चांदेरे काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. याच अनुषंगाने  पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि बाबुराव चांदेरे साहेबांच्या उपस्थिती मध्ये प्रभाग क्रमांक १२ औंध-बाणेर-बालेवाडी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक पार पडली.  यावेळी प्रभाग क्रमांक १२ मधून माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी देखील आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे भावना शहराध्यक्ष  प्रशांतदादा जगताप यांना बोलून दाखवली.

Amol Balwadkar Vs Baburao Chandre : राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय  : अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप 

Categories
Breaking News Political social पुणे

राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी बाणेर बालेवाडीचा पाणी प्रश्न निर्माण केलाय

: अमोल बालवडकर यांचा गंभीर आरोप

पुणे : बाणेर बालेवाडी परिसरात गेली चार पाच वर्ष पाणीटंचाई नव्हती. मग आताच का? असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला आहे. शिवाय बालवडकर यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे कि हा प्रश्न राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे, परिसरातील व शहरातील त्यांचे पदाधिकारी पदाधिकारी आणि मनपा अधिकाऱ्यांनी मिळून केला आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता फोन करो आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारावा, असे आवाहन बालवडकर यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे.
बालवडकर म्हणाले महापालिकेत आता प्रशासक आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या प्रश्नांची जबाबदारी राज्य सरकारची आहे.  बाणेर बालवाडीत 2017 साली पाण्याची वितरण व्यवस्था नव्हती. प्रश्न गंभीर होता. मी नगरसेवक झाल्यानंतर नियोजन केले. समान पाणीपुरवठा योजने चे काम सुरु केले.  मात्र आता प्रशासनाने तोच पाणीपुरवठा विस्कळीत केला आहे. बालवडकर म्हणाले, पाणी प्रश्न मिटवणार भाजप कुठे आणि पाणी प्रश्न निर्माण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस कुठे? एवढा फरक आहे. पाण्यासाठी झगडणारा भाजप कुठे आणि नागरिकांची मजा पाहणारा राष्ट्रवादी कुठे?
बालवडकर पुढे म्हणाले, चांदणी चौक पाणी टाकी मधून 47mld बाणेर बालवाडीत पाषाण ला पाणीपुरवठा होत होता. गेल्या तीन महिन्यापासून या पाण्यात कपात करण्यात आली. 10 mld पेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे टँकर पाठवण्याची सोसायट्यांची मागणी आहे. असे नीच पातळीवरील राजकारण राष्ट्रवादी  करते.
बालवडकर म्हणाले पाणी प्रश्न निर्माण करण्यात  आला आहे. राजकीय सूडासाठी हा प्रश्न उभा केलाय. राष्ट्रवादीने हा प्रश्न निर्माण केलाय. बाबुराव चांदेरे, पदाधिकारी,मनपा अधिकारी असे सर्वानी मिळून हा प्रश्न निर्माण केलाय. महापालिका अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. याला सरकार जबाबदार आहे. बाबुराव चांदेरे यांनी याबाबत कधी निवेदन दिले नाही. चांदेरे चार वर्ष झोपले होते. आता निवडणुकीसाठी प्रयत्न करताहेत.

: फोन करो आंदोलन सुरु करा

बालवडकर पुढे म्हणाले, चांदेरे उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही जबाबदारी अजित दादांची देखील आहे. पवार देखील याचे समर्थन करताहेत का? चुकीच्या पद्धतीने काम सुरु आहे. राजकारण करणाऱ्या पक्षाला यश मिळणार नाही. तुम्ही कितीही काही जरा. पाणी हेच जीवन आहे. मात्र भाजपचे लोक नाराज होणार नाहीत. नागरिकांची तुम्ही मजा पाहत आहात. आम्ही तो प्रश्न सोडवू. अधिकाऱ्यावर कुणाचा दबाव आहे? पाणी कपात नसताना पाणी का कमी केले?
नागरिकांना आवाहन आता तुम्ही फोन करो आंदोलन सुरु करा. आयुक्त आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्याचे नंबर आम्ही देतोय. त्यावरून प्रशासनाला जाब विचारा. असे बालवडकर म्हणाले.

Sus Mahalunge : Ajit Pawar : सुस आणि म्हाळुंगे गावांच्या विकास कामांकरिता निधी कमी पडून देणार नाही 

Categories
PMC Political social पुणे

सुस आणि म्हाळुंगे गावांच्या विकास कामांकरिता निधी कमी पडून देणार नाही

:उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी दिले आश्वासन

पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस गावातील प्रलंबित असलेल्या स्मशानभुमी जवळील नाला चॅनेलींग व मुख्य रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आज सकाळी ७ वाजता सुस येथे भेट दिली. यावेळी अजित दादा पवार यांनी सदर कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर येथील विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून आणणारे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नांमुळे येथे विकास कामे करणे शक्य झाले, दिवसरात्र याठिकाणी उभे राहून स्वतः काम करून घेणे असा लोकप्रतिनिधी तुमच्या आमच्या सारख्याना मिळाला त्यामुळे चांदेरे यांचे कौतुक करू तेवढे कमीच आहे. त्याचबरोबर सुस आणि म्हाळुंगे या दोन्ही गावांच्या विकास कामांकरिता निधी कमी पडून देणार नाही, असे मत यावेळी पवार यांनी व्यक्त केले.

: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावू

सदर काम दर्जेदार व्हावे व पावसाळ्याच्या आधी काम पुर्ण करण्याची सुचना पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना यावेळी केली. या कामासाठी ज्यांनी सहकार्य केले व जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सुस येथील चांदेरे व ससार परिवाराचे अजित पवार यांनी आभार मानले.
पुणे महानगरपालिकेमध्ये सुस व म्हाळुंगे गावाचा समावेश झाल्यापासुन महानगरपालिके तर्फे गृहप्रकल्पांना टॅंकरने पाणी पुरवठा चालु करण्यात आला होता. परंतु प्रशासनाने काही कालावधी नंतर हा पाणी पुरवठा बंद केला. आज सर्व गृहप्रकल्पातील नागरिकांनी अजित दादा पवार यांना या संदर्भात निवेदन दिले की टॅंकरने पाणी पुरवठा पुन्हा चालु करावा त्यावर पवार यांनी सांगितले कि लवकरात लवकर टॅंकरने पाणी पुरवठा चालु होईल तसेच कायम स्वरुपात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावुन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात येईल.


याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे , ज्ञानेश्वर मोळक, पी. डब्लू. डी चे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे,नामदेव चांदेरे, राजाभाऊ हगवणे, महादेव कोंढरे ,मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे ,गोवर्धन बांदल ,चंद्रकांत काळभोर, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे ,सुषमा निम्हण ,डॉ. सागर बालवडकर , समीर चांदेरे , नितीन कळमकर ,संजय ताम्हाणे, मनोज बालवडकर , सौ पुनम विशाल विधाते , सौ. सुषमा ताम्हाणे , सौ. राखी श्रीराव तसेच सुस ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच ,उपसरपंच, सदस्य त्याचबरोबर सुस मधील ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनी,गृहप्रकल्पातील नागरिक व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुस गावामध्ये अजित दादा पवार यांनी भेट दिली त्याबद्दल संपुर्ण सुस ग्रामस्थांनी अजितदादा पवार यांचे मनःपुर्वक आभार मानले.

Sus Mahalunge : Baburao Chandere : सुस-म्हाळुंगे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ देणार नाही : नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दिला विश्वास 

Categories
PMC Political social पुणे

सुस-म्हाळुंगे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ देणार नाही

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दिला विश्वास

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी सुस आणि म्हाळुंगे या दोन्ही गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सतत पाठपुरावा केला, त्यामुळे महापालिका प्रशासनाने या दोन्ही गावांना समाविष्ट गावांच्या विकास निधीतून म्हाळुंगे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्यासाठी ४० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला . पुढील कार्यकाळात सुस आणि म्हाळुंगे या गावांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ देणार नाही असे मत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेच्या समाविष्ट गावांच्या विकास निधीतुन म्हाळुंगे गावामध्ये ४० लक्ष रुपये निधीच्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीचा भुमीपुजन सोहळा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी चांदेरे बोलत होते.

याप्रसंगी नामदेव गोलांडे, शांताराम पाडाळे, मदन पाडाळे, भगवान खैरे, हिरामण पाडाळे, निवृती गोलांडे, लक्ष्मन पाडाळे, युवराज कोळेकर, अजिंक्य निकाळजे, विवेक खैरे, रूपेश पाडाळे,समिर कोळेकर, वरणजित पाडाळे, सागर चिव्हे, सतिश पाडाळे, संजय ताम्हाणे, प्रणव कळमकर, धनराज निकाळजे , सुरज कोळेकर, स्वप्निल पाडाळे, आयुष काटकर, तुषार हगवणे, स्वराज पाडाळे, राहुल निकाळजे,सौ.बेबीताई खैरे,सौ.सुजाताताई कोळेकर,सौ. काशीबाई तरस,सौ. सुषमा ताम्हाणे ,सौ.पुनम विशाल विधाते डॉ. सागर बालवडकर इत्यादी मान्यवर तसेच महिला भगिनी व युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

BBSM Society Full Peach Day- Night Cricket Tournament 2022 : पुरुष गटात याश्विन आनंद तर महिला गटात सारथी सोसायटी विजयी संघ ठरले 

Categories
Political Sport पुणे

पुरुष गटात याश्विन आनंद तर महिला गटात सारथी सोसायटी विजयी संघ ठरले

: बी बी एस एम सोसायटी फुल्ल पीच डे- नाईट क्रिकेट स्पर्धा २०२२

पुणे : बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे भागातील सोसायट्यांमधील नागरिकांसाठी बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने बी बी एस एम सोसायटी फुल्ल पीच डे- नाईट क्रिकेट स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यामध्ये पुरुष गटात याश्विन आनंद सोसायटी,सुस व महिला गटात सारथी सोसायटी, म्हाळुंगे या संघानी विजेते पद पटकावले.

द्वितीय क्रमांकः-
सारथी सोसायटी, म्हाळुंगे (पुरुष विभाग)
पुराणिक अल्डिया सोसायटी,म्हाळुंगे (महिला विभाग)

तृतीय क्रमांकः-
युतिका सोसायटी,बाणेर (पुरुष विभाग)
बालाजी व्हाइटफ़ील्ड सोसायटी,सुस (महिला विभाग)

चतुर्थ क्रमांकः-
परफ़ेक्ट १० सोसायटी,बालेवाडी (पुरुष विभाग)
दिव्यशांति सोसायटी,सुस (महिला विभाग) ह्या संघांनी बाजी मारली

बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन , योगीराज नागरी पतसंस्था, अवधूत लोखंडे, एस. आर. कन्स्ट्रक्शन, सिद्धराम कलशेट्टी, विकास भळगट, रणजित मुरकुटे, गणेश मुरकुटे, हर्षल मुरकुटे, निखिल धनकुडे यांच्या वतीने विजयी संघाना ट्रॉफी व धनादेश विभागून देण्यात आला.

या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण , नगरसेवक व आयोजक बाबुराव चांदेरे , उद्योजक जीवन कळमकर , सुहास भोते ,डॉ. सागर बालवडकर ,निलेश पाडाळे, चेतन बालवडकर इतर मान्यवर उपस्थित होते . या क्रिकेट स्पर्धेचे नियोजन समीर बाबुराव चांदेरे, पुनम विशाल विधाते व नितीन कळमकर यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

Cricket Tournament : Baner : बाणेरच्या सोसायटीमध्ये रंगली क्रिकेट स्पर्धा 

Categories
Political Sport पुणे

बाणेरच्या सोसायटीमध्ये रंगली क्रिकेट स्पर्धा

पुणे : बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे भागातील सोसायट्यांमधील नागरिकांसाठी बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने बी बी एस एम सोसायटी फुल्ल पीच डे- नाईट क्रिकेट स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये ७० पुरुष व ५ महिला सोसयटी मधील संघांनी सहभाग घेतला. एकुण ७७० पुरुष व ५५ महिला खेळाडु सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते मा. महापौर अंकुश काकडे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या क्रिकेट स्पर्धेमुळे सोसायटी वर्गातील नागरिक व खेळाडू यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले; कारण अशी भव्य क्रिकेट स्पर्धा या पूर्वी कोणी भरवली नाही. त्यामुळे अश्या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दरवर्षी करावे. अशी मागणी सोसायटी मधील नागरिकांनी व खेळाडूंनी केली असता चांदेरे यांनी ही स्पर्धा तुमच्या साठी दरवर्षी भरवली जाईल. असे आश्वासन त्यांनी देताच खेळाडू आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

तसेच अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे बाणेर येथे नव्याने स्मारक उभारण्यात आले या स्मारकाचे अनावरण सोहळा संपन्न झाला , यावेळी स्वराज्य प्रतिष्ठान यांना बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनच्या वतीने ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

याप्रसंगी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा कविता आल्हाट, नगरसेवक प्रमोद निम्हण, नगरसेविका रोहिणी चिमटे, शिला भालेराव, डॉ. सागर बालवडकर , मनोज बालवडकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक वर्ग आणि क्रिकेट प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेचे आयोजन समीर बाबुराव चांदेरे, पुनम विशाल विधाते व कोथरूड विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर यांनी केले आहे .

Water tanker : Baburao Chandere: सुस व म्हाळुंगे गावांना टँकर द्वारे पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करा

Categories
Breaking News PMC Political पुणे

सुस व म्हाळुंगे गावांना टँकर द्वारे पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करा

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची आयुक्ताकडे मागणी

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी सुस व म्हाळुंगे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची खुप मोठी समस्या निर्माण झालेली होती. त्या अनुषंगाने या परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण दुर व्हावी या करिता पुणे महानगरपालिकेने तरतूद उपलब्ध करून सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यास सुरुवात केली. परंतु सध्या हे टँकर प्रशासनाने बंद केले आहेत .
     या संदर्भात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन सदर गावांतील पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

Baburao Chandere : बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे सुस-महाळुंगे चा  नियोजनबद्ध विकास करणार  : नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे आश्वासन 

Categories
PMC Political पुणे

बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे सुस-महाळुंगे चा  नियोजनबद्ध विकास करणार

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे आश्वासन

पुणे : पीएमआरडीए’वर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ रहिवाशी संघ आणि सूस ग्रामस्थ यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल बाबुराव चांदेरे यांनी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. या आपुलकीच्या सत्कारामुळे अधिकाधिक काम करण्यासाठी मला नेहमीच प्रेरणा मिळत राहील. अशी ग्वाही देखील माजी  स्थायी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दिली. यावेळी चांदेरे म्हणाले, सूस-म्हाळुंगे या गावांचा समावेश जरी महापालिकेत झाला असला तरी बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे या भागाचाही नियोजनबद्धपणे विकास करण्यात येईल.

चांदेरे पुढे  म्हणाले, वास्तविक गेल्या १५-२० वर्षांपासून या भागातील नागरिकांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याच जिव्हाळ्यातून आणि या मंडळींच्या विश्वासातून त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळतेय हे एक प्रकारे माझे भाग्यच आहे. आजवर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे. आपलं हक्काचं घर असावं म्हणून या भागात अनेकजणांनी आपापल्या कुवतीप्रमाणे थोड्या-थोड्या जागा घेऊन घर बांधले आहे. ते भलेही आज अनधिकृत असले तरी यामध्ये या नागरीकांची काहीही चूक नाही. त्यामुळे तुमच्या बांधकामाची एकही वीट हलनार नाही, यासाठी माझा सदैव प्रयत्न राहील. काही नागरिकांच्या राहत्या घरावर रस्त्याचे आरक्षण पडले आहे. घर जाऊन तेथील रहिवाशी रस्त्यावर येणार असतील तर मी तेही होऊ देणार नाही. या घरांवर पडलेले आरक्षण पर्यायी जागेवर हलविण्याचा माझा प्रयत्न आहे. सूस-म्हाळुंगे या गावांचा समावेश जरी महापालिकेत झाला असला तरी बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे या भागाचाही नियोजनबद्धपणे विकास करण्यात येईल. त्यासाठी या भागातील नागरिक हे माझ्यासोबत आहेत याचा मला नेहमीच अभिमान वाटतो असे मत चांदेरे यांनी व्यक्त केले.

चांदेरे  म्हणाले,  पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना महापालिकाने जो निधी मंजूर केला आहे त्या मधूनच सूस-म्हाळुंगे गावांना पिण्याच्या पाण्याच्या करिता निधी उपलब्ध करून या गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. या भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी सिंटेक्स टाक्या बांधण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर करुन आणले आणि या कामाचा शुभारंभ केला. तसेच टँकरने तातडीचा पाणीपुरवठा करण्यासाठीही ४० लाख रुपये निधी मंजूर करुन आणला असून हे काम सुरु झाले आहे. येथील नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे काम करता आले. भविष्यातही या भागात अधिकाधिक नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत राहण्याचा शब्द बाबुराव चांदेरे यांनी यावेळी दिला. यावेळी स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी सूस मधील ‘हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या विकास सोसायटी’मधील बिनविरोध निवडून आलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा तसेच बिनविरोध निवडीसाठी मदत करणाऱ्या सर्व सभासद बांधवांचा सत्कार बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आला.

Baburao Chandere : Pune : बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ यांनी मानले जाहीर आभार 

Categories
PMC Political पुणे

बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ यांनी मानले जाहीर आभार

: प्रलंबित रस्त्याच्या  कामामुळे  नागरिकांना दिलासा

पुणे : सुस येथील वाढती लोकसंख्या आणि जपाट्याने वाढत असलेली वस्ती , गृह प्रकल्प यामुळे सुस गावातील रस्ता नेहमीच वाहतूक कोंडीचा विषय ठरलेला असतो त्यात सुस गावातील स्मशानभूमी जवळील  अरुंद रस्त्यामुळे येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना रहदारीच्या त्रासाला मोठ्याप्रमाणात सामोरे जावे लागत आहे , याठिकाणी अनेक वेळा अपघात होतात तसेच नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. मात्र नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नाने रस्त्याची समस्या सोडवली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गावातील लोकांनी चांदेरे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

: उपमुख्यमंत्र्यांनी घातले होते लक्ष

सुस गावातील स्मशानभूमी जवळील अरुंद रस्त्याची समस्या ही खुप दिवसांपासून प्रलंबित होती. त्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुस गावचे माजी सरपंच नामदेवराव चांदेरे, पी.डब्लू.डी.चे अधिक्षक अभियंता- अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता – अजय भोसले, सहाय्यक अभियंता – नकुल नरसिंग, शाखा अभियंता – दीपक भोसले , पुणे महानगरपालिकेचे सुस गावच्या संपर्क अधिकारी श्रीमती अश्विनी लांडगे व इतर अधिकारी यांच्या समवेत सदर रस्त्यांची पाहणी केली. सदर ठिकाणचा कलवर्त  व नाल्याकडील रिटनिंग वॉल बांधून देण्याचे पी.डब्लू.डी.चे अधिक्षक अभियंता  अतुल चव्हाण यांनी निश्चित केले आणि त्यांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांना तात्काळ काम करण्याची सुचना करण्यात आली .
वरील काम मार्गी लावल्याबद्दल सुस गावांतील नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून आले आहे आणि या कामाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रत्येक्ष काम करण्यास प्राधान्य देणारे, आपला हक्काचा माणूस नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ व गृह प्रकल्पामधील नागरिकांच्या वतीने मनापासून अभिनंदन  मानले आहेत.