Dhananjay Munde : बाबुराव चांदेरे यांच्यामुळे गोर- गरिबांची दिवाळी गोड : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून चांदेरे यांचे कौतुक 

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

बाबुराव चांदेरे यांच्यामुळे गोर- गरिबांची दिवाळी गोड

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून चांदेरे यांचे कौतुक

पुणे : सन २००६ साला पासून प्रत्येक वर्षी दिवाळीला गोर-गरिबांसाठी बाबुराव चांदेरे हे दिवाळी सरंजाम वितरण करीत असतात, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबुराव चांदेरे यांच्या या उपक्रमाची पुनरावृत्ती केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी गोर-गरीब नागरिकांना दिवाळी सरंजाम वितरण केले जाते. याचे सर्व श्रेय हे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांना जाते. अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे कौतुक केले.

निवडणूक आल्यामुळे अनेक नेते मंडळी दिवाळी सरंजाम वाटप करत आहेत परंतु निवडणूक असो किंवा नसो प्रत्येक वर्षी न चुकता दिवाळी सरंजाम वितरणाचा कार्यक्रम बाबुराव चांदेरे हे सातत्याने १६ वर्षे करीत आहेत, याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो. चांदेरे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अनेक गोर-गरीब नागरिकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत कारण चांदेरे यांच्या दिवाळी सरंजाम वितरणा मुळे असंख्य गोर – गरिबांची दिवाळी गोड होत आहे असे मत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

: दिवाळी सरंजाम वितरण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्र.९, बाणेर, बालेवाडी ,सुस , म्हाळुंगे यांच्या वतीने आयोजित दिवाळी सरंजाम वितरण समारंभावेळी धनंजय मुंडे बोलत होते .
समाजातील गोर- गरीब नागरिकांशी माझी कायमची बांधिलकी असून त्यांच्या सु:ख – दुःखात मी कायमच सोबत असेल , दरवर्षी प्रमाणे हा दिवाळी सरंजाम वितरण कार्यक्रम यापुढे ही प्रत्येक वर्षी सुरू राहील आणि माझ्या माय- बाप गोर – गरिबांची दिवाळी आनंदाची ,गोड करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन असे मत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले .
यावेळी भूम, परांडा, वाशी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राहुल भैया मोटे यांनी बाबुराव चांदेरे यांच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले .
या प्रसंगी ग्राहक पेठचे सचिव – सूर्यकांत पाठक ,सुनील चांदेरे ,अंकुश बालवडकर ,जीवन कळमकर ,नामदेव चांदेरे,समीर चांदेरे ,राजाराम बालवडकर, बाळासाहेब विनोदे,अजिंक्य निकाळजे, युवराज कोळेकर, अमोघ ढमाले,प्रदीप पाडाळे,मा. नगरसेविका रोहिणी चिमटे,सौ. सरला चांदेरे , पुनम विधाते, रुपाली बालवडकर .शिला भालेराव,सौ. सुषमा ताम्हाणे, सौ. राखी श्रीराव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सूत्र संचालन – नितीन कळमकर ,प्रस्ताविक- विशाल विधाते यांनी केले तर आभार प्रदर्शन – डॉ. सागर बालवडकर यांनी मानले .