Sus Mahalunge Water Supply : Amol Balwadkar : सूस म्हाळूंगे वासियांच्या पाणी पुरवठा प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सूस म्हाळूंगे वासियांच्या पाणी पुरवठा प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुणे : सूस आणि म्हाळुगे परिसरात शेकडो गृहनिर्माण संस्था आणि
निवासी संकुले आहेत. त्यापैकी कोणालाही पीएमसी किंवा पीएमआरडीएकडून अद्याप पाणीपुरवठा होत नाही. यासाठी या गृहनिर्माण संस्थांनी पीएमसी, पीएमआरडीएकडे संपर्क साधूनही, दोन्ही शासकीय संस्थांनी पाणी पुरवठ्यासारख्या गंभीर व निकडीच्या समस्येवर कोणताही तोडगा अद्याप काढलेला नाही. त्यामुळे अमोल बालवडकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी ही दोन गावे पीएमआरडीएच्या अखत्यारीत होती. जुलै २०२१ पासून सूस आणि म्हाळुगे (अन्य २१ गावांसह) आता पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झालेली आहेत. या निवासी इमारतींमधील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतेही नियोजन किंवा तरतूद केलेली नसतानाही पीएमआरडीए यांचेकडून या गावांमध्ये नवीन बांधकामांना सर्रासपणे परवानगी देण्यात येत आहे. या गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या परिसरातील पाणी पुरवठ्याच्या गंभीर व निकडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी  भाजपचे माजी नगरसेवक अमोल रतन बालवडकर यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यानुसार अमोल  बालवडकर यांनी पीएमसी आणि पीएमआरडीए या दोन्ही प्राधिकरणातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. परंतु दोन्ही सरकारी संस्थांनी संदिग्ध प्रतिसाद दिला असून सदरची समस्या सोडवण्यासाठी कोणीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे या गावांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने ते खासगी टँकरवर अवलंबून आहेत.
या विषयावर बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की,
१. सूस आणि म्हाळुगे गावांना पाणीपुरवठा होत नसल्याच्या समस्येचे गांभीर्य ओळखण्यात पीएमआरडीए आणि पीएमसी दोन्ही अपयशी ठरले आहेत.
२. पीएमआरडीए आणि पीएमसीने या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी कोणताही कृती आराखडा राबविण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
३. सूस आणि म्हाळुगे येथील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कोणाची आहे ? याचा स्पष्टपणे खुलासा करण्यासाठी पीएमआरडीए आणि पीएमसी दोघेही पुढे येत नाहीत.
४. पीएमआरडीएने या प्रदेशाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणताही आराखडा तयार न करता किंवा कोणत्याही पायाभूत सुविधांचा विकास न करता निवासी इमारतींच्या नविन बांधकामाना परवानगी दिली जात आहे. जर पीएमआरडीए पाणीपुरवठ्यासाठी तरतूद करू शकत नसेल तर पीएमआरडीएने या गावांतील नवीन बांधकामांना परवानग्या देणे बंद करावे.
५. या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी पीएमआरडीए आणि पीएमसी यांच्यात कोणताही संयुक्त विभाग कार्यरत नाही. यावेळी, श्री अमोल रतन बालवडकर असेही म्हणाले की – सूस आणि म्हाळुगे येथील रहिवाशांच्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व ती समस्या सोडवण्याची जबाबदारी कोणत्या प्राधिकरणाची आहे हे निश्चित करण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी जनहित याचिका दाखल केलेली आहे.
अॅड. सत्या मुळे यांनी अशी माहिती दिली की, नव्याने बांधलेल्या इमारतींना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांची असेल, असे पीएमआरडीए आणि पीएमसी यांचेकडून सांगण्यात येते व त्याआधारे बिल्डरांकडून शपथपत्र किंवा हमीपत्र घेण्याची पद्धत पीएमआरडीए आणि
पीएमसीने लागू केलेली आहे. अशा प्रकारचे हमीपत्र (पाण्याचे हमीपत्र) दाखल केल्याशिवाय पीएमआरडीए नवीन बांधकामांना प्रारंभ प्रमाणपत्र देत नाही. हे एक बेकायदेशीर कृत्य आहे, कारण भारतीय राज्यघटनेनुसार पाणी पुरवठा करणे हे पीएमआरडीए आणि पीएमसी चे मूलभूत कर्तव्य आहे आणि अये मूलभूत कर्तवय ते बिल्डरला देऊ शकत नाहीत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्डर निघून जातो आणि रहिवाशांना स्वत:चा त्रास सहन करावा लागतो आणि ते टँकर माफियांच्या ताब्यात येतात. पाण्याचे हमीपत्र घेण्याच्या या पद्धतीला देखील प्रस्तुत जनहित याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. सूस आणि म्हाळुगे गावांतील रहिवाशांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पीएमसी किंवा पीएमआरडीएने तातडीने पुढे यावे. पाणी हे जीवनावश्यक मूलभूत गरजांपैकी एक आहे आणि भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २१ अंतर्गत संरक्षित प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ अंतर्गत पाणी पुरवठा करणे हे पीएमसी किंवा पीएमआरडीए यांचे मूलभूत कर्तव्य आहे. या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी बालवडकर यांनी याचिका दाखल केली आहे. 

Sus Mahalunge : Ajit Pawar : सुस आणि म्हाळुंगे गावांच्या विकास कामांकरिता निधी कमी पडून देणार नाही 

Categories
PMC Political social पुणे

सुस आणि म्हाळुंगे गावांच्या विकास कामांकरिता निधी कमी पडून देणार नाही

:उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी दिले आश्वासन

पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस गावातील प्रलंबित असलेल्या स्मशानभुमी जवळील नाला चॅनेलींग व मुख्य रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आज सकाळी ७ वाजता सुस येथे भेट दिली. यावेळी अजित दादा पवार यांनी सदर कामाचे कौतुक केले. त्याचबरोबर येथील विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून आणणारे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नांमुळे येथे विकास कामे करणे शक्य झाले, दिवसरात्र याठिकाणी उभे राहून स्वतः काम करून घेणे असा लोकप्रतिनिधी तुमच्या आमच्या सारख्याना मिळाला त्यामुळे चांदेरे यांचे कौतुक करू तेवढे कमीच आहे. त्याचबरोबर सुस आणि म्हाळुंगे या दोन्ही गावांच्या विकास कामांकरिता निधी कमी पडून देणार नाही, असे मत यावेळी पवार यांनी व्यक्त केले.

: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावू

सदर काम दर्जेदार व्हावे व पावसाळ्याच्या आधी काम पुर्ण करण्याची सुचना पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना यावेळी केली. या कामासाठी ज्यांनी सहकार्य केले व जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सुस येथील चांदेरे व ससार परिवाराचे अजित पवार यांनी आभार मानले.
पुणे महानगरपालिकेमध्ये सुस व म्हाळुंगे गावाचा समावेश झाल्यापासुन महानगरपालिके तर्फे गृहप्रकल्पांना टॅंकरने पाणी पुरवठा चालु करण्यात आला होता. परंतु प्रशासनाने काही कालावधी नंतर हा पाणी पुरवठा बंद केला. आज सर्व गृहप्रकल्पातील नागरिकांनी अजित दादा पवार यांना या संदर्भात निवेदन दिले की टॅंकरने पाणी पुरवठा पुन्हा चालु करावा त्यावर पवार यांनी सांगितले कि लवकरात लवकर टॅंकरने पाणी पुरवठा चालु होईल तसेच कायम स्वरुपात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावुन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात येईल.


याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे , ज्ञानेश्वर मोळक, पी. डब्लू. डी चे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे,नामदेव चांदेरे, राजाभाऊ हगवणे, महादेव कोंढरे ,मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे ,गोवर्धन बांदल ,चंद्रकांत काळभोर, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे ,सुषमा निम्हण ,डॉ. सागर बालवडकर , समीर चांदेरे , नितीन कळमकर ,संजय ताम्हाणे, मनोज बालवडकर , सौ पुनम विशाल विधाते , सौ. सुषमा ताम्हाणे , सौ. राखी श्रीराव तसेच सुस ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच ,उपसरपंच, सदस्य त्याचबरोबर सुस मधील ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनी,गृहप्रकल्पातील नागरिक व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुस गावामध्ये अजित दादा पवार यांनी भेट दिली त्याबद्दल संपुर्ण सुस ग्रामस्थांनी अजितदादा पवार यांचे मनःपुर्वक आभार मानले.

Sus Mahalunge : Baburao Chandere : सुस-म्हाळुंगे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ देणार नाही : नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दिला विश्वास 

Categories
PMC Political social पुणे

सुस-म्हाळुंगे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ देणार नाही

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दिला विश्वास

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी सुस आणि म्हाळुंगे या दोन्ही गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सतत पाठपुरावा केला, त्यामुळे महापालिका प्रशासनाने या दोन्ही गावांना समाविष्ट गावांच्या विकास निधीतून म्हाळुंगे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्यासाठी ४० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला . पुढील कार्यकाळात सुस आणि म्हाळुंगे या गावांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ देणार नाही असे मत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिकेच्या समाविष्ट गावांच्या विकास निधीतुन म्हाळुंगे गावामध्ये ४० लक्ष रुपये निधीच्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीचा भुमीपुजन सोहळा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी चांदेरे बोलत होते.

याप्रसंगी नामदेव गोलांडे, शांताराम पाडाळे, मदन पाडाळे, भगवान खैरे, हिरामण पाडाळे, निवृती गोलांडे, लक्ष्मन पाडाळे, युवराज कोळेकर, अजिंक्य निकाळजे, विवेक खैरे, रूपेश पाडाळे,समिर कोळेकर, वरणजित पाडाळे, सागर चिव्हे, सतिश पाडाळे, संजय ताम्हाणे, प्रणव कळमकर, धनराज निकाळजे , सुरज कोळेकर, स्वप्निल पाडाळे, आयुष काटकर, तुषार हगवणे, स्वराज पाडाळे, राहुल निकाळजे,सौ.बेबीताई खैरे,सौ.सुजाताताई कोळेकर,सौ. काशीबाई तरस,सौ. सुषमा ताम्हाणे ,सौ.पुनम विशाल विधाते डॉ. सागर बालवडकर इत्यादी मान्यवर तसेच महिला भगिनी व युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Amol Balwadkar : Sus-Mahalunge : सुस-म्हाळुंगेचा अतिशय नियोजित असा विकास करणार : अमोल बालवडकर  : म्हाळुंगे मुख्य रस्त्याचे भुमिपुजन संपन्न

Categories
PMC Political पुणे

सुस-म्हाळुंगेचा अतिशय नियोजित असा विकास करणार : अमोल बालवडकर

: म्हाळुंगे मुख्य रस्त्याचे भुमिपुजन संपन्न

पुणे : आज म्हाळुंगे येथील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व साईड पट्टीचे काम करणे या कामाचा भुमिपुजन समारंभ भारतीय जनता पार्टी व म्हाळुंगे ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कामासाठी पुणे मनपाच्या मुख्य खात्यातुन व महापौर निधीतून मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष सहकार्यातुन रक्कम रु.४० लक्ष रुपयांची तरतुद उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.

: नागरीकांच्या मुलभुत गरजा ओळखुन विविध विकास कामांसाठी निधी देणार

“पुणे मनपा हद्दित नव्याने समाविष्ठ झालेल्या सुस-म्हाळुंगे गावांमध्ये स्थानिक नागरीकांच्या मुलभुत गरजा ओळखुन विविध विकास कामांसाठी निधी करण्यात येईल व तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन अतिशय नियोजित असा विकास केला जाईल.” असे मत यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले.
पुणे महापालिकेत समाविष्ठ झाल्यानंतर या गावांतील पाणी समस्या संपुष्टात आली असुन रस्ते, ड्रेनेज व इतर सुविधांची कामे भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन झपाट्याने व अगदी नियोजनबद्ध पद्धतीने होत असल्याचे सांगत म्हाळुंगे गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, लहुशेठ बालवडकर, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, मंदार राराविकर, काळुराम गायकवाड, मा सरपंच महाळुंगे संजय पाडाळे, राजेंद्र पाडाळे, मा उपसरपंच सुनिल पाडाळे, उपाध्यक्ष भाजपा मुळशी तालुका भानुदास कोळेकर, रविंद्र मोहोळ, सह्याद्री प्रतिष्ठाण संपर्क प्रमुख पुणे जिल्हा .सदाशिव मोरे बाबासाहेब तारे, अंकुश पाडाळे, तुषार हगवणे, गणेश पाडाळे, गुलाब गायकवाड, मा चेअरमन सुरेश कोळेकर, समीर कोळेकर, लक्ष्मण पाटील, राजेंद्र पाडाळे, माउली सुतार,हाॅटेल रुपा सचिन पाडाळे, नामदेव गोलांडे, मा सरपंच भानुदास पाडाळे, मा ग्रामपंचायत सदस्य सोपानआण्णा पाडाळे, हाॅटेल राधा अंशाआका पाडाळे, दातीर मायी, शिवाजी खैरे, भगवान खैरे, मनोज पाडाळे, बाबासाहेब कोळेकर, गीताताई गुजर, मा सरपंच नामदेव पाडाळे, गुलाब पाडाळे, मयुर कोळेकर, संतोष बबन पाडाळे बाबुराव मोहोळ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Water tanker : Baburao Chandere: सुस व म्हाळुंगे गावांना टँकर द्वारे पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करा

Categories
Breaking News PMC Political पुणे

सुस व म्हाळुंगे गावांना टँकर द्वारे पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करा

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची आयुक्ताकडे मागणी

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी सुस व म्हाळुंगे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची खुप मोठी समस्या निर्माण झालेली होती. त्या अनुषंगाने या परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण दुर व्हावी या करिता पुणे महानगरपालिकेने तरतूद उपलब्ध करून सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यास सुरुवात केली. परंतु सध्या हे टँकर प्रशासनाने बंद केले आहेत .
     या संदर्भात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन सदर गावांतील पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

Baburao Chandere : बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे सुस-महाळुंगे चा  नियोजनबद्ध विकास करणार  : नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे आश्वासन 

Categories
PMC Political पुणे

बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे सुस-महाळुंगे चा  नियोजनबद्ध विकास करणार

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे आश्वासन

पुणे : पीएमआरडीए’वर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ रहिवाशी संघ आणि सूस ग्रामस्थ यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल बाबुराव चांदेरे यांनी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. या आपुलकीच्या सत्कारामुळे अधिकाधिक काम करण्यासाठी मला नेहमीच प्रेरणा मिळत राहील. अशी ग्वाही देखील माजी  स्थायी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दिली. यावेळी चांदेरे म्हणाले, सूस-म्हाळुंगे या गावांचा समावेश जरी महापालिकेत झाला असला तरी बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे या भागाचाही नियोजनबद्धपणे विकास करण्यात येईल.

चांदेरे पुढे  म्हणाले, वास्तविक गेल्या १५-२० वर्षांपासून या भागातील नागरिकांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याच जिव्हाळ्यातून आणि या मंडळींच्या विश्वासातून त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळतेय हे एक प्रकारे माझे भाग्यच आहे. आजवर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे. आपलं हक्काचं घर असावं म्हणून या भागात अनेकजणांनी आपापल्या कुवतीप्रमाणे थोड्या-थोड्या जागा घेऊन घर बांधले आहे. ते भलेही आज अनधिकृत असले तरी यामध्ये या नागरीकांची काहीही चूक नाही. त्यामुळे तुमच्या बांधकामाची एकही वीट हलनार नाही, यासाठी माझा सदैव प्रयत्न राहील. काही नागरिकांच्या राहत्या घरावर रस्त्याचे आरक्षण पडले आहे. घर जाऊन तेथील रहिवाशी रस्त्यावर येणार असतील तर मी तेही होऊ देणार नाही. या घरांवर पडलेले आरक्षण पर्यायी जागेवर हलविण्याचा माझा प्रयत्न आहे. सूस-म्हाळुंगे या गावांचा समावेश जरी महापालिकेत झाला असला तरी बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे या भागाचाही नियोजनबद्धपणे विकास करण्यात येईल. त्यासाठी या भागातील नागरिक हे माझ्यासोबत आहेत याचा मला नेहमीच अभिमान वाटतो असे मत चांदेरे यांनी व्यक्त केले.

चांदेरे  म्हणाले,  पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना महापालिकाने जो निधी मंजूर केला आहे त्या मधूनच सूस-म्हाळुंगे गावांना पिण्याच्या पाण्याच्या करिता निधी उपलब्ध करून या गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. या भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी सिंटेक्स टाक्या बांधण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर करुन आणले आणि या कामाचा शुभारंभ केला. तसेच टँकरने तातडीचा पाणीपुरवठा करण्यासाठीही ४० लाख रुपये निधी मंजूर करुन आणला असून हे काम सुरु झाले आहे. येथील नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे काम करता आले. भविष्यातही या भागात अधिकाधिक नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत राहण्याचा शब्द बाबुराव चांदेरे यांनी यावेळी दिला. यावेळी स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी सूस मधील ‘हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या विकास सोसायटी’मधील बिनविरोध निवडून आलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा तसेच बिनविरोध निवडीसाठी मदत करणाऱ्या सर्व सभासद बांधवांचा सत्कार बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आला.