Drinking water | पुणे शहराचे पाणी कमी करू नका | पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता द्या | महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे शहराचे पाणी कमी करू नका | पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता द्या 

| महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी 

 
पुणे | उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाची बैठक महापालिकेत झाली. उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे पुणेकरांचे पाणी कमी करू नका. त्यासाठी पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देऊन पाण्याचे नियोजन करा. कारण शहरासाठी 15 ऑगस्ट पर्यंत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. अशी मागणी महापालिका प्रशासनाच्या वतीने जलसंपदा विभागाकडे करण्यात आली. त्यावर याबाबत कालवा समितीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे जलसंपदा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

या वर्षी मार्च महिन्यापासूनच तीर्व उन्हाळा चालू झाला असून, नागरिकांच्या पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. तसेच, या वर्षी पावसाळा समाधानकारक होईल अगर कसे, याबाबत आत्ताच खात्री देता येणार नाही. या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासंदर्भात महापालिका आयुक्त यांनी गुरुवारी बैठक आयोजित केली होती. त्यासाठी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता उपस्थित होते. तर महापालिकेकडून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 16.80 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मागील वर्षी पेक्षा ही स्थिती चांगली आहे. मात्र पावसाची अनिश्चितता लक्षात घेत महापालिकेने यंदा 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढ्या पाण्याची मागणी केली आहे. म्हणजेच आगामी 150 दिवसासाठी 7.50 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच शेतीसाठी जलसंपदा विभागाकडे 9 टीएमसी पाणी शिल्लक राहते. मात्र एक. आवर्तन हे 5 टीएमसीचे असते. दुसऱ्या आवर्तनासाठी फक्त 4 टीएमसी शिल्लक राहतात. त्यामुळे 1 टीएमसी पाण्याची भरपाई पिण्याच्या पाण्यातून होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने मागणी केली आहे कि पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता द्या. जेणेकरून पुणेकरांवर कपातीची वेळ येणार आहे. यावर पाटबंधारे विभागाने हा निर्णय कालवा समितीवर सोपवला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ कालवा समिती घेण्यात येणार आहे. त्यात हा निर्णय घेतला जाईल, असे जलसंपदाने स्पष्ट केले.
| जलसंपदाकडून 125 कोटी बिलाची मागणी
दरम्यान पाणी नियोजनाच्या बैठकीत देखील जलसंपदा विभागाने महापालिकेकडे थकीत बिलाचा तगादा लावला. जलसंपदा च्या म्हणण्यानुसार महापालिकेने 235 कोटी बिल देणे अपेक्षित आहे. मात्र महापालिका म्हणते घरगुती वापर आणि वाणिज्यिक पाणी वापराचे एवढे बिल होत नाही. शिवाय आम्ही औद्योगिक दराने बिल देणार नाही. दरम्यान महापालिकेने आतापर्यंत 44 कोटींचे बिल अदा केले आहे. तसेच महापालिका एसटीपी प्लांट बाबत दंड द्यायला तयार आहे. मात्र हे सगळे बिल 70-80 कोटीच्या घरातच आहे. 

Sus Mahalunge Water Supply : Amol Balwadkar : सूस म्हाळूंगे वासियांच्या पाणी पुरवठा प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सूस म्हाळूंगे वासियांच्या पाणी पुरवठा प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुणे : सूस आणि म्हाळुगे परिसरात शेकडो गृहनिर्माण संस्था आणि
निवासी संकुले आहेत. त्यापैकी कोणालाही पीएमसी किंवा पीएमआरडीएकडून अद्याप पाणीपुरवठा होत नाही. यासाठी या गृहनिर्माण संस्थांनी पीएमसी, पीएमआरडीएकडे संपर्क साधूनही, दोन्ही शासकीय संस्थांनी पाणी पुरवठ्यासारख्या गंभीर व निकडीच्या समस्येवर कोणताही तोडगा अद्याप काढलेला नाही. त्यामुळे अमोल बालवडकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी ही दोन गावे पीएमआरडीएच्या अखत्यारीत होती. जुलै २०२१ पासून सूस आणि म्हाळुगे (अन्य २१ गावांसह) आता पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झालेली आहेत. या निवासी इमारतींमधील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतेही नियोजन किंवा तरतूद केलेली नसतानाही पीएमआरडीए यांचेकडून या गावांमध्ये नवीन बांधकामांना सर्रासपणे परवानगी देण्यात येत आहे. या गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या परिसरातील पाणी पुरवठ्याच्या गंभीर व निकडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी  भाजपचे माजी नगरसेवक अमोल रतन बालवडकर यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यानुसार अमोल  बालवडकर यांनी पीएमसी आणि पीएमआरडीए या दोन्ही प्राधिकरणातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. परंतु दोन्ही सरकारी संस्थांनी संदिग्ध प्रतिसाद दिला असून सदरची समस्या सोडवण्यासाठी कोणीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे या गावांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने ते खासगी टँकरवर अवलंबून आहेत.
या विषयावर बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की,
१. सूस आणि म्हाळुगे गावांना पाणीपुरवठा होत नसल्याच्या समस्येचे गांभीर्य ओळखण्यात पीएमआरडीए आणि पीएमसी दोन्ही अपयशी ठरले आहेत.
२. पीएमआरडीए आणि पीएमसीने या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी कोणताही कृती आराखडा राबविण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
३. सूस आणि म्हाळुगे येथील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कोणाची आहे ? याचा स्पष्टपणे खुलासा करण्यासाठी पीएमआरडीए आणि पीएमसी दोघेही पुढे येत नाहीत.
४. पीएमआरडीएने या प्रदेशाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोणताही आराखडा तयार न करता किंवा कोणत्याही पायाभूत सुविधांचा विकास न करता निवासी इमारतींच्या नविन बांधकामाना परवानगी दिली जात आहे. जर पीएमआरडीए पाणीपुरवठ्यासाठी तरतूद करू शकत नसेल तर पीएमआरडीएने या गावांतील नवीन बांधकामांना परवानग्या देणे बंद करावे.
५. या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी पीएमआरडीए आणि पीएमसी यांच्यात कोणताही संयुक्त विभाग कार्यरत नाही. यावेळी, श्री अमोल रतन बालवडकर असेही म्हणाले की – सूस आणि म्हाळुगे येथील रहिवाशांच्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व ती समस्या सोडवण्याची जबाबदारी कोणत्या प्राधिकरणाची आहे हे निश्चित करण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी जनहित याचिका दाखल केलेली आहे.
अॅड. सत्या मुळे यांनी अशी माहिती दिली की, नव्याने बांधलेल्या इमारतींना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांची असेल, असे पीएमआरडीए आणि पीएमसी यांचेकडून सांगण्यात येते व त्याआधारे बिल्डरांकडून शपथपत्र किंवा हमीपत्र घेण्याची पद्धत पीएमआरडीए आणि
पीएमसीने लागू केलेली आहे. अशा प्रकारचे हमीपत्र (पाण्याचे हमीपत्र) दाखल केल्याशिवाय पीएमआरडीए नवीन बांधकामांना प्रारंभ प्रमाणपत्र देत नाही. हे एक बेकायदेशीर कृत्य आहे, कारण भारतीय राज्यघटनेनुसार पाणी पुरवठा करणे हे पीएमआरडीए आणि पीएमसी चे मूलभूत कर्तव्य आहे आणि अये मूलभूत कर्तवय ते बिल्डरला देऊ शकत नाहीत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्डर निघून जातो आणि रहिवाशांना स्वत:चा त्रास सहन करावा लागतो आणि ते टँकर माफियांच्या ताब्यात येतात. पाण्याचे हमीपत्र घेण्याच्या या पद्धतीला देखील प्रस्तुत जनहित याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. सूस आणि म्हाळुगे गावांतील रहिवाशांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पीएमसी किंवा पीएमआरडीएने तातडीने पुढे यावे. पाणी हे जीवनावश्यक मूलभूत गरजांपैकी एक आहे आणि भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २१ अंतर्गत संरक्षित प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ अंतर्गत पाणी पुरवठा करणे हे पीएमसी किंवा पीएमआरडीए यांचे मूलभूत कर्तव्य आहे. या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी बालवडकर यांनी याचिका दाखल केली आहे. 

Prithviraj Sutar : Water Supply Charges: शिवसेनेचा पाणीपट्टी वाढीला विरोध!

Categories
PMC Political पुणे

शिवसेनेचा पाणीपट्टी वाढीस विरोध

: गटनेते पृथ्वीराज सुतार यांची भूमिका

पुणे :  महापालिका प्रशासन पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर दाखल करणार आहे. या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध राहील. अशी भूमिका शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी घेतली आहे. हा प्रस्ताव आणल्यास आंदोलन केले जाईल. असा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे. तसे एक पत्र सुतार यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहे.

: आंदोलन करण्याचा इशारा

सुतार यांच्या पत्रानुसार महापालिका प्रशासन पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर दाखल करणार आहे, असे समजले. महापालिकेकडून पुणेकरांना अद्यापपर्यंत नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही. तसेच २४/७ चीयोजना अजूनही पूर्ण झालेली नाही.पाणी पुरवठ्याबाबत पुणेकरांच्या वारंवार तक्रारी येत आहेत आणि आपण पाणीपुरवठा लोकांना नियमित देत नसतानासुद्धा पुणेकरांवर पाणीपट्टीची वाढ आपण लादत आहात. याला शिवसेनेचा पूर्ण विरोध आहे. आपण स्वत:हून हा प्रस्ताव मागे घ्यावा अन्यथा शिवसेना पुणेकरांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा सुतार यांनी दिला आहे.

Water Supply cut off : नागरिकांसाठी महत्वाची बातमी : गुरुवारी ‘या’ भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद

Categories
Breaking News PMC पुणे

गुरुवारी काही भागाचा पाणीपुरवठा बंद

पुणे : गुरूवार १६ रोजी बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्राअंतर्गत मुख्य जलवाहिन्यांवरील देखभाल दुरुस्तीचे कामे करण्यात येणार असल्याने ठाकरसी टाकी व भामा आसखेड येथील पंपींगचे अखत्यारीतील तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे पुणे शहराच्या वरील भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवणेत येणार आहे.
तसेच शुक्रवारी  सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

बंडगार्डन जलकेंद्र भाग :- येरवडा पूर्ण, लक्ष्मीनगर, यशंवत नगर, भाटनगर, जयजवाननगर, आंबेडकर सोसायटी, संगमवाडी, सुरक्षानगर, माणिकनगर, म्हाडा वसाहत, अशोकनगर, जयप्रकाश नगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, कल्याणीनगर संपुर्ण परिसर, आदर्शनगर, हरीनगर, रामवाडी, आळंदी रोड, भारतनगर, शांतीनगर, मोहनवाडी, जाधवनगर, मेंटल हॉस्पिटल परिसर, साप्रस, फुले नगर, भारतनगर, आदर्श इंदिरा नगर, विश्रांतवाडी, प्रतिकनगर, कस्तुरबा सोसायटी, पंचशीलनगर, श्रमीक वसाहत, नागपुर चाळ, हौसिंगबोर्ड, शांतीरक्षक सोसायटी, राम सोसायटी, अहिल्यापर्णकुटी सोसायटी, कलवड, खेसेपार्क, धानोरी, मुंजाबावस्ती, भैरवनगर, श्रमीकनगर, विमाननगर, सोपाननगर, गुरुद्वारा, दादाचीवस्ती, लोहगांव, टेम्पोचौक, साईनाथ नगर, वडगांवशेरी संपुर्ण परिसर.

Amol Balwadkar : अवघ्या १२ तासांत २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या : नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सुस गावातील लोकांना दिलासा 

Categories
PMC पुणे

अवघ्या १२ तासांत २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या

: नगरसेवक अमोल बालवडकर यांचा सुस गावातील लोकांना दिलासा

पुणे : सुस गावात पिण्याचे पाणी घेण्यासाठी अनेक नागरिक बाणेर पर्यंतचा २-३ किमीचा प्रवास करतात, यातील काही पायपीट करत तर काही लोक मोटारसायकलवर २० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी घेऊन पिण्याचे पाणी भरण्यासाठी येतात. दररोजची ही त्यांची पायपीट आणि मोटारसायकलवर पाणी वाहण्याची शृंखला सुरू असल्याचे समजले. हे अतिशय धोकादायक आणि जीवावर बेतणारे काम पाहून खूप वाईट वाटले. त्यामुळे त्याच क्षणी माझ्या मनात एक विश्वास निर्माण झाला व मी त्यांना शब्द दिला की येणाऱ्या २४ तासाच्या आत तुमच्या घरापासून अगदी नजीकच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देतो. लगेचच यंत्रणा कामाला लावून आणि अवघ्या १०-१२ तासात तेथे प्रत्येकी २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या. त्यात पाणी आणून जलपूजन केले व तात्काळ आजच्या आज ते लोकांना वापरासाठी उपलब्ध करून दिले. असे अमोल बालवडकर यांनी सांगितले.

: हे काम चमकोगिरी साठी नाही

आज बालवडकर म्हणाले, आज सकाळी मी माझे सहकारी नारायणराव चांदेरे, श्री.अनिल बापू ससार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुस मध्ये गेलो असता अनेक महिला भगिनींनी पिण्याच्या पाण्याची मागणी केली. पिण्याचे पाणी घेण्यासाठी अनेक नागरिक बाणेर पर्यंतचा २-३ किमीचा प्रवास करतात, यातील काही पायपीट करत तर काही लोक मोटारसायकलवर २० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी घेऊन पिण्याचे पाणी भरण्यासाठी येतात.

दररोजची ही त्यांची पायपीट आणि मोटारसायकलवर पाणी वाहण्याची शृंखला सुरू असल्याचे समजले. हे अतिशय धोकादायक आणि जीवावर बेतणारे काम पाहून खूप वाईट वाटले. तेथील माता-भगिनींना पाण्यासाठी रोज तरसावे लागत होते.

त्याच क्षणी माझ्या मनात एक विश्वास निर्माण झाला व मी त्यांना शब्द दिला की येणाऱ्या २४ तासाच्या आत तुमच्या घरापासून अगदी नजीकच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देतो. लगेचच यंत्रणा कामाला लावून आणि अवघ्या १०-१२ तासात तेथे प्रत्येकी २००० लिटर क्षमतेच्या १० पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या. त्यात पाणी आणून जलपूजन केले व तात्काळ आजच्या आज ते लोकांना वापरासाठी उपलब्ध करून दिले. यावेळी सुस च्या उपसरपंच  दिशाताई ससार,  नारायणराव चांदेरे, अनिल बापू ससार, .शशिकांत बालवडकर, स्थानिक नागरिक, महिला भगिनी व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते.

यामध्ये माझा कोणताही चमकोगिरी करण्याचा उद्देश नाही. जनतेचं लवकरात लवकर व तात्काळ काम होणं हे माझं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यप्रती सदरील काम तात्काळ पूर्ण केले आणि नागरिकांची या समस्येतून सुटका केली. आज संध्याकाळी जेव्हा या भागात पाणी आलं त्यावेळेस इथल्या नागरिकांच्या व महिला भगिनींच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद बघून मला अतिशय समाधानी वाटले.

विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून मी सुस-म्हाळुंगे परिसराला रोज २० टँकर मोफत पाणी पुरवठा करीत आहे. इथून पुढील काळात ते ५० टँकरपर्यंत कसे जाईल हा माझा मानस आहे. आज या भागात मी १० टाक्या लावल्या, गरज पडल्यास केवळ १० टाक्याच नाही तर अजून २०, ३०, ५० जरी टाक्यांची आवश्यकता भासली तरी चालेल, मी माझ्या स्वखर्चाने येथे त्या उपलब्ध करून देईल. पण माझ्या माता भगिनींना कुठेही पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही, त्यांना त्यांच्या घराजवळच पाणी मिळेल याची योग्य ती काळजी मी घेईल.

येणाऱ्या काळात जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला तर त्यांच्या घरात पाणी देण्याचा माझा जो मानस आहे तो निश्चित पूर्ण करेल. असे ही बालवडकर म्हणाले.