Palkhi Sohala 2023 | मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे चार टँकर

Categories
Breaking News cultural social पुणे

Palkhi Sohala 2023 | मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे चार टँकर

Palkhi Sohala 2023 | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या (Marathwada Charitable Trust) वतीने पाण्याचे चार वॉटर टॅंकर (Water Tanker) देण्यात येत आहेत. या टँकरच्या माध्यमातून संपूर्ण पालखीवर पंढरपूरपर्यंत (Pandharpur) चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. (Palkhi Sohala 2023)

मराठवाडा जनविकास संघाच्या (Marathwada Janvikas Sangh) वतीने वॉटर  टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.११ ह.भ.प.सोपान काका कराडकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.२२१ ह.भ.प.ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.१९७ ह.भ.प. बाबुराव महाराज तांदळे व मुख्य पालखी सोहळ्यासोबत असे चार पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात येत आहेत. (Pandharpur Wari)

या टँकरचे पूजन पिंपळे गुरव येथे करण्यात आले. यावेळी संतासेवक, ह ,भ ,प ,मारुती ज्ञानोबा कोकाटे अध्यक्ष: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज ह.भ. प. तांदळे महाराज, शिव कीर्तनकार डॉ. गजानन महाराज वाव्हळ, शशिकांत महाराज कुलकर्णी, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक नाना काटे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप अण्णा जोगदंड प्रा.गणेश ढाकणे, रवींद्र जाधव अमोल नागरगोजे, अमोल लोंढे, विकास आघाव, सुरेश कंक त्रिमुख यलुरे, गोरक्ष सानप, हनुमंत घुगे, प्रभाकर साळुंके, उमाकांत तलवाडे, धनराज धायडे, राजू रेड्डी, किशोर अट्टरगेकर, म्हाळप्पा म्हेत्रे, अनिल पाटील, रंजीत कनकट्टे, शोभा माने, मीनाक्षी खैरनार, विजया नागटिळक, विश्वनाथ वाघमोडे आदी उपस्थित होते. (Aashadhi wari 2023)

अरुण पवार म्हणाले, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टँकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ह.भ.प. तुकाराम सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.
——————————–

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अरुण पवार यांचा ५००० वर्ष लागवड करण्याचा संकल्प : 

राज्य शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांनी यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५००० वर्ष लागवड करण्याचा संकल्प मराठवाडा ग्रामीण विकास संघाच्या वतीने अरुण पवार यांनी केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यातील ५ ते ६ फूट उंचीच्या ५०० झाडांचे  वाटप चार टँकर पूजन कार्यक्रमात करण्यात आले. उर्वरित वृक्षारोपण पाऊस झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.


News Title | Palkhi Sohala 2023 | Four tankers of drinking water along with Palkhi ceremony by Marathwada Charitable Trust

Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचे मोफत चार वॉटर टॅंकर

Categories
Breaking News cultural social पुणे

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचे मोफत चार वॉटर टॅंकर

पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा

संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पाण्याचे चार वॉटर टॅंकर देण्यात येत आहेत. या टँकरच्या माध्यमातून संपूर्ण पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वॉटर टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.११ ह.भ.प.सोपान काका कराडकर, आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.५९ मुक्ताबाई महाराज बेळगांवकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.२२१ ह.भ.प.ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.१९७ ह.भ.प.तांदळे महाराज आळंदीकर या चार दिंड्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात आले. कोरोनाचे ढग गडद होत असल्याने दोन्ही पालखी सोहळ्यात प्रत्येकी ५ हजार मास्क असे एकूण १० हजार मास्क भावीकांना वाटप करण्यात आले.

या आषाढी पायी पालखी सोहळ्यानिमित्त ह.भ.प., संत महंत आणि सन्माननीय मान्यवर यांना ५ फुट उंचीची ५०० रोपे वाटप करण्यात आली. तसेच राजमाता फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुरेखाताई सांळुखे यांना ४ फुट उंचीची वड, पिंपळ, कडूलिंब, तुळस, हिरडा, बेहडा, करंज, निरगुडी अशी ३०० रोपे वृक्षारोपणासाठी देण्यात आली. तसेच काही ज्येष्ठ वारकाऱ्यांना निवारा मिळावा यासाठी एका टँकरवर छोटासा निवाराही करून देण्यात आला आहे.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद ह.भ.प मारुती कोकाटे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य ह.भ.प.जगन्नाथ पाटील, ह.भ.प वाघ महाराज, ह.भ.प.बाबुराव तांदळे महाराज आळंदीकर, ह.भ.प विजूअण्णा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष सचिन भोसले, माजी नगरसेवक विनोद नढे, विक्रांत लांडे पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, सा.कार्यकर्ते हुसेन मुलानी, अभिमन्यू गाडेकर, अनिस पठाण, मारुती बानेवार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर, उद्योजक शंकर तांबे, गणेश ढाकणे, सुभाष दराडे, कैलास सानप, हनुमंत घुगे, सतीश काळे, सचिन रसाळ, नितीन सोनवणे, नाना तांबारे, सुनील भोसले, प्रदीप गायकवाड, शैलेश दिवेकर संतोष मोरे, नागेश जाधव, कामगार नेते बाळासाहेब साळुंके, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ आदींचे सदस्य आदी उपस्थित होते.

अरुण पवार म्हणाले, वारकऱ्यांना वारीत पिण्यासाठी अडचण निर्माण होते. यंदा तर दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टॅंकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.
ह.भ.प. वाघ महाराज म्हणाले, वारीसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत उपलब्ध करून देणे, ही वारीच आहे. अरुण पवार करीत असलेले कार्य अतुलनीय आहे. अशीच देशाची सेवा आपल्या हातून घडो, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू शेळके यांनी, तर आभार वामन भरगंडे यांनी मानले.

Pune NCP : Tanker : समाविष्ट गावामधून राष्ट्रवादीला मिळणारा पाठींबा पाहून भाजपने गावातले टँकर बंद केले  : राष्ट्रवादी कॉंग्रेस

Categories
Breaking News PMC Political पुणे

समाविष्ट गावामधून राष्ट्रवादीला मिळणारा पाठींबा पाहून भाजपने गावातले टँकर बंद केले

: राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा आरोप

पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना प्राथमिक सुविधा पुरविण्यातही सत्ताधारी भाजप अपयशी ठरलं आहे. त्यातही मानवाच्या आयुष्यातील जीवनावश्यक घटक असलेले पाणी पुरवण्याबाबत सत्ताधारी भाजपने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. तात्पुरती सोय म्हणून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता परंतू सत्ताधाऱ्यांनी आता हे टँकरही बंद केले आहेत. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस ने केला आहे. या गावांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने याचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच या गावांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले.

: अतिरिक्त आयुक्तांना टँकर भेट

यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांना पाण्याचा प्रतीकात्मक टँकर भेट दिला. याबाबत प्रशांत जगताप म्हणाले, वास्तविक पाहता ही गावे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर तातडीने त्यांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागायला हवा होता. मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून भारतीय जनता पक्षाने केवळ जाहिरातबाजीवर लक्ष केंद्रित केले आहे. समाविष्ट २३गावातील नागरिकांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवत तब्बल ३४ कोटीचा टॅक्स गोळा करणारी सत्ताधारी भाजपा प्रत्यक्षात नागरिकांच्या प्राथमिक सुविधाही पुरवू शकत नाही हे सिद्ध झाले आहे. अनेक निवडणूक सर्वे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असून या समाविष्ट गावांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता त्यामुळेच अशा प्रकारचं घाणेरडे राजकारण भारतीय जनता पार्टी करू पाहत आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुणेकर नागरिक याची नक्की दखल घेतील अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. या आंदोलनास पुणे महानगरपालिकेच्या विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्ताधारी भाजपचा धिक्कार असो, पुणेकरांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी पुणे महानगरपालिकेचा परिसर दणाणून गेला होता. नव्याने समाविष्ट गावांतील अनेक नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन सत्ताधारी भाजपच्या निष्क्रिय राजवटीचा निषेध केला.

Water tanker : Baburao Chandere: सुस व म्हाळुंगे गावांना टँकर द्वारे पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करा

Categories
Breaking News PMC Political पुणे

सुस व म्हाळुंगे गावांना टँकर द्वारे पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करा

: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची आयुक्ताकडे मागणी

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी सुस व म्हाळुंगे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची खुप मोठी समस्या निर्माण झालेली होती. त्या अनुषंगाने या परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण दुर व्हावी या करिता पुणे महानगरपालिकेने तरतूद उपलब्ध करून सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यास सुरुवात केली. परंतु सध्या हे टँकर प्रशासनाने बंद केले आहेत .
     या संदर्भात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन सदर गावांतील पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.