Mahavikas Aghadi Pune agitation | वीज दरवाढ विरोधात महाविकास आघाडीचे तीव्र निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

Mahavikas Aghadi Pune agitation | वीज दरवाढ विरोधात महाविकास आघाडीचे तीव्र निषेध आंदोलन

| दरवाढ मागे न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा खा.सुप्रिया सुळेंचा इशारा

 

Mahavikas Aghadi Pune agitation – (The Karbhari News Service) – सरकारने केलेल्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टी, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी यांच्या वतीने पॉवर हाऊस चौक, रास्ता पेठ येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले कि, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्रातील फडणवीस – पवार – शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीज दर यात वाढ करून फडणवीस – पवार – शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी १५% वाढ केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे, आमदार रविंद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री.शेखर धावडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष श्री. धनंजय बेनकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अभय छाजेड, मुकुंद किर्दत, अशोक हरणावळ, विशाल धनावड़े, कणव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार व्यक्त केला. “तिघाडी सरकारची मजा जनतेला दरवाढीची सजा, तिघाडी सरकारचा धिक्कार असो, महागाई जोमात जनता कोमात, जनतेच्या खिशाला कात्री हीच मोदींची गॅरंटी” अशा घोषणांनी संपूर्ण रास्ता पेठ परिसर दुमदुमला होता.

——

 देशातील जनता अभूतपूर्व अशा महागाईचा सामना करत आहे. देशातील गरीब, मध्यमवर्गीय वर्गाचं जीवन कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत आपल्या राज्यातील जनतेला महागाईतून दिलासा देणं राज्य सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. परंतू जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, परंतू वीज उत्पादन करणाऱ्या अडाणी, अंबानी यांचे खिसे भरले पाहिजेत हेच फडणवीस – शिंदे – पवार सरकारचं धोरण आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल.

प्रशांत सुदामराव जगताप