BJP Maharashtra Mahila Morcha | भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक आज शिवाजी नगर, सेंट्रल पार्क हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी महिला मोर्चाच्या महिला भगिनींच्या अनेक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळाली. तसेच यावेळी माझा अर्चना तुषार पाटील पासून ते सगळ्यांची हक्काची अर्चना ताई बनण्यापर्यंतचा ३ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित प्रवास अहवाल प्रकाशनातून सादर करण्यात आला. अशी माहिती पुणे महिला मोर्च्याच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली.

यावेळी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधरआण्णा मोहोळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माझे मार्गदर्शक खासदार संजय नाना काकडे, तसेच पुण्याचे विद्यमान, सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी तसेच इतर महिला मैत्रिणी, आणि मान्यवर उपस्थित होते.

येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये संघटनेला बळकटी आणण्यासाठी महिला मोर्चा कशाप्रकारे काम करणार आहे हा आजच्या पहिल्या महिला मोर्चा कार्यकारिणी बैठकीचा मुख्य हेतू होता.
यावेळी महिलांना प्रोत्साहन देताना चित्राताई म्हणाल्या, येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश हा देशातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट असा महिला मोर्चा असेल.
या बैठकीतून अनेक महिलांनी त्यांची मते मांडली. प्रश्न समोर ठेवले आणि त्यातून त्यांना अनेक धुरंधर राजकीय नेत्यांकडून योग्य दिशादर्शक मार्गदर्शन, सल्ले आणि सहकार्य लाभले. असे पाटील यांनी सांगितले.

Bilawal Bhutto Vs BJP | बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात भारत (India) सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान (Pakistan) भारतात दहशतवादी कारवाया (Terror) करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मा. मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP President Chandrashekhar Bawankule) यांनी शनिवारी पुणे येथे केली.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करताना ते बोलत होते.

मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मा. मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे संपूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी राज्यात भाजपा कार्यकर्ते १२०० ठिकाणी आंदोलन करत आहेत. सर्व शहरे, जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. (Bhartiya Janata Party)

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देत आहेत. भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची ताकद भारताकडे मा. मोदीजींच्या नेतृत्वात आहे. तो देश भारताच्या विरोधात बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया अशी कृती करू शकत नाही. दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान हतबल झाला आहे. पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये केली जात आहेत.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची बुलेट ट्रेन सुरू झाली असून हे असेच काम चालू राहिले तर आपले राजकीय अस्तित्व संकटात येईल, अशी भीती महाविकास आघाडीला वाटते व तेच त्यांच्या मोर्चामागचे खरे कारण आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. आता राज्य गतीने पुढे जात आहे, यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारत होते. महाविकास आघाडीच्या एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेषभूषा करून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर नतमस्तक झाला होता. ही महाविकास आघाडीची संस्कृती आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, पाकिस्तानला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला, तरी त्यांचा मूळ स्वभाव बदलत नाही. मोदींमुळे जगात शांतता प्रस्थापित होत आहे. पाकिस्तानातील जनतेचे लक्ष तेथील परिस्थितीवरून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता बदलेला भारत आहे. महाविकास आघाडीचे नेते आज बोलत नाहीत. पंतप्रधान एका पक्षाचे नाहीत, ते देशाचे नेते आहेत. महाविकास आघाडीच्या स्वाभिमानाचे काय झाले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,महीला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ,आमदार माधुरीताई मिसाळ प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे यांच्यासह मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेविक आदी उपस्थित होते

 

Chandrasekhar Bawankule Vs NCP | राष्ट्रवादी काँग्रेसकडे नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा |भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसकडे नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा

|भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आ. जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुणे येथे केली. जितेंद्र आव्हाड यांच्या गुन्ह्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे पुणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आ. माधुरी मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा आणि त्यांनी विधानसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याचा दिलेला इशारा याविषयी प्रतिक्रिया विचारली असता मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी हाताने धरून एका महिलेला बाजूला केल्याचे स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता उरली असेल तर त्यांनी आजच आव्हाड यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी नुकताच एका नेत्याने अपशब्द उच्चारला. भारतीय जनता पार्टी त्याचे कधीही समर्थन करणार नाही. पण त्यावेळी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य व्हिडिओत दिसत असूनही समर्थन करतात. हा त्या पक्षाचा दुटप्पीपणा आहे.

त्यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य जितके चूक आहे तितकेच त्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करणेही चूक आहे. शहरात असे होत राहते, असे ज्यांनी म्हटले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. मा. देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील आहेत. ते गृहमंत्री असताना राज्यात दादागिरी चालू देणार नाही. भाजपा हे सहन करणार नाही.