Chitra Wagh | महिला मोर्चा ने सामान्य नागरिकांसाठी झटले पाहिजे | चित्रा वाघ

Categories
Breaking News Political पुणे

Chitra Wagh | महिला मोर्चा ने सामान्य नागरिकांसाठी झटले पाहिजे | चित्रा वाघ

Chitra Wagh | BJP Mahila Morcha | पुणे | आपण अडीच वर्षे विरोधात होतो आता आपण सत्तेत आहोत त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे . महिला मोर्चाने सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी झटून त्यांना न्याय दिला पाहिजे’ असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले.

पुणे शहराच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र वाटप व महिला मेळावा आज संपन्न झाला यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर , वर्षा तापकीर, महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे,माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, मंजुषा नागपुरे,रुपाली धाडवे, रंजना टिळेकर यांच्या सह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, महिला ही शंभर घरे जोडू शकते रोजचे दैनंदिन प्रश्नामध्ये पुढाकार घेऊन सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम महिला आघाडीच्या पदाधिकाराऱ्यानी केले पाहिजे कामातून माणूस मोठा होतो पदाने माणूस मोठा होत नाही त्यामुळे काम हे एकजुटीने केले पाहिजे असे मत वाघ यांनी व्यक्त केले
शहराध्यक्ष धीरज घाटे बोलताना म्हणाले की, आजची महिला ही सक्षम आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडते महिला अघडी हा पक्षातील सर्वात महत्वाचा घटक असून पुढच्या काळात महिला सक्षमीकरण , सबलीकरण या विषयात शहर भा ज पा काम करणार आहे’

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस गायत्री खडके यांनी केले

BJP Maharashtra Mahila Morcha | भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची पहिली बैठक आज शिवाजी नगर, सेंट्रल पार्क हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी महिला मोर्चाच्या महिला भगिनींच्या अनेक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळाली. तसेच यावेळी माझा अर्चना तुषार पाटील पासून ते सगळ्यांची हक्काची अर्चना ताई बनण्यापर्यंतचा ३ वर्षांच्या कार्यकाळावर आधारित प्रवास अहवाल प्रकाशनातून सादर करण्यात आला. अशी माहिती पुणे महिला मोर्च्याच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली.

यावेळी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ, भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमाताई खापरे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधरआण्णा मोहोळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माझे मार्गदर्शक खासदार संजय नाना काकडे, तसेच पुण्याचे विद्यमान, सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी तसेच इतर महिला मैत्रिणी, आणि मान्यवर उपस्थित होते.

येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये संघटनेला बळकटी आणण्यासाठी महिला मोर्चा कशाप्रकारे काम करणार आहे हा आजच्या पहिल्या महिला मोर्चा कार्यकारिणी बैठकीचा मुख्य हेतू होता.
यावेळी महिलांना प्रोत्साहन देताना चित्राताई म्हणाल्या, येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश हा देशातील सर्वोत्तम आणि उत्कृष्ट असा महिला मोर्चा असेल.
या बैठकीतून अनेक महिलांनी त्यांची मते मांडली. प्रश्न समोर ठेवले आणि त्यातून त्यांना अनेक धुरंधर राजकीय नेत्यांकडून योग्य दिशादर्शक मार्गदर्शन, सल्ले आणि सहकार्य लाभले. असे पाटील यांनी सांगितले.

Chitra Wagh Vs NCP : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं ‘जोडे मारो’ आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं ‘जोडे मारो’ आंदोलन

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने लैंगिक अत्याचार आणि गर्भपात केल्याचा आरोप केला होता.यामुळे मागील दोन महिन्यापासून चांगलेच राजकारण तापले होते. त्यामध्ये भाजपच्या नेत्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उडी घेतली होती. त्या या प्रकरणावर सतत भूमिका मांडत होत्या. मला गोव्यात चित्रा वाघ यांनीच डांबून ठेवले होते, अशी भूमिका पीडित तरुणीने काल मांडली होती. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

त्या पार्श्वभूमीवर पीडित तरुणीचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात चित्रा वाघ यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सुषमा सातपुते म्हणाल्या की, चित्रा वाघ यांना पक्षात कोणत्याही प्रकारच स्थान नसल्याने,अशा प्रकारे एका युवतीच्या भावनेचा वापर केला गेला आहे. ही निषेधार्ह बाब असून स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी एखाद्या युवतीचा फायदा घेऊ नये.

तसेच चित्रा वाघ या मानसिकरित्या आजारी असल्याने त्यांना मनोरुग्णालयात पाठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चित्रा वाघ यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.तर कारवाई न झाल्यास वेळ प्रसंगी त्यांच्या तोंडाला काळे फासून, रस्त्यावरून धिंड काढू,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Chitra Wagh : महिला अत्याचारा वरून चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकार वर निशाणा!

Categories
Political social पुणे महाराष्ट्र

महिला अत्याचारा वरून चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकार वर निशाणा

पुणे : महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अत्यंत अहंकारी, खुनशी व मुख्यतः महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणारे व वेळ प्रसंगी त्यांचे समर्थन करणारे हे विकृत सरकार आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाने आयोजित केलेल्या विराट महिला महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी कॅंटोनमेंट मतदारसंघाचे आमदार सुनीलभाऊ कांबळे, माजी. मंत्री. दिलीप कांबळे, मा.आमदार  .जगदिश मुळीक, पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना पाटील, प्रीती सुनिल कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, शहर चिटणीस कोमलताई शेंडकर,.माधुरीताई गिरमकर, सुर्वर्णा भरेकर,  उज्वला गौड, महिला मोर्चाच्या अध्यक्षा. दिप्तिताई पाटोळे, महेशजी पुंडें अध्यक्ष कॅ.म.संघ, मा.नगरसेवक धनराजभाऊ घोगरे मा.नगरसेवक उमेशभाऊ गायकवाड
मा.नगरसेवक  दिलिप भाऊ गिरमकर  सचिनभाऊ मथुरावाला,उपाध्यक्ष पुणे कॅ.बोर्ड., कालिंदातासौ.लक्ष्मीकाकु घोडके, सुधिर जानजोत नगरसेवक सर्व आघाडीचे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यात महिला अत्याचाराची विविध उदाहरणे प्रस्तुत करत ठाकरे सरकार हे महिलांना असुरक्षित करते आहे असे प्रतिपादन चित्रा वाघ यांनी केले. शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप होऊनही संपूर्ण पोलिस खाते त्याच्या समर्थनार्थ काम करत आहे. तसेच वडगाव शेरी येथील शाळेत मुली वरती झालेल्या चाकू हल्ल्यात शाळेची कोणतीच जबाबदारी नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याच वेळेस सरकारची आरती ओवाळणाऱ्या पोलीस खात्यात अनेक प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांच्यामागे समाजाने व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने सक्षमपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कॅन्टोन्मेंट मतदारसंघात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वर्गीय सुषमा स्वराज्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना आमदार सुनील भाऊ कांबळे यांनी भारतीय जनता पार्टी ही सामान्य माणसाची आणि कार्यकर्त्यांची पार्टी आहे. तिची ओळख कोणी एका नेत्याच्या नावामुळे नाही तर कार्यकर्त्यांमुळे होते. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी महिला सक्षमीकरणाला आपल्या घरातून सुरुवात करावी असे आव्हान केले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन महिलांनी करून तळागाळातल्या महिलांपासून उच्चशिक्षित महिलांना या मेळाव्यात त्यांनी प्रयत्नपूर्वक उपस्थित केले आहे त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन आमदार सुनील भाऊंनी केले.

यावेळी दलित इंडस्ट्रियल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज महिला आघाडीच्या प्रमुख महिला उद्योजक निर्माण होण्यासाठी कार्यरत असलेल्या सीमा कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. भारतीय जनता पार्टी रा.स्व. संघाच्या विचारधारेनेच चालत असून महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे परंपरा या पक्षात आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. महिला आरक्षण नसताना भारतीय जनता पार्टीमध्ये विजयाराजे सिंधिया, सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन, उमा भारती इत्यादी महिलांनी आपले कर्तृत्व दाखवले आहे, याचे स्मरण त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात कर्तृत्ववान भारतीय महिलांना वैशिष्ट्यपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रतिमा घेऊन एकेक कार्यकर्ते व्यासपीठावरती येत होती आणि त्यांना सर्वांनी एकत्रित अभिवादन केले.

अत्यंत उत्साहाने संपन्न झालेल्या या मेळाव्यास हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी निश्चित केलेल्या योजनांची माहिती व त्याचा लाभ कसा घ्यायचा याबाबतही प्रदर्शनी लावण्यात आली होती. या कार्यक्रमांमध्ये छोट्या आनंदी बोराडेने सादर केलेला जिजाऊंच्या कथेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेश वंदनेने आरंभ झालेल्या या कार्यक्रमात सर्वत्र महिलांचा अत्यंत उत्साहाने वावरत होता. या महिला मेळाव्याच्या निमित्ताने विविध मान्यवर, डॉ.उषा तपासे मॅडम,(सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय), मिनल विक्रम रुपारेल (समाजसेविका),तेजा कांबळे(महिला बचतगट संघटक)वंदना विलास दवे(लघु उद्योजिका), अंबिका मांगिलाल शर्मा (जेष्ठ समाजसेविका), वंदना पराडकर(प्राणी मित्र), डॉ इरेन जुडा (आर्मी डॉक्टर) डॉ दिप्ती भास्कर बच्छाव, मनिषा शिंदे, कोमल एकनाथ शिंदे (राष्ट्रीय खेळाडू)अन्य महिलांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल त्यांना सुषमा स्वराज पुरस्काराने गौरवण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक नगरसेविका व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Chitra Wagh : चित्रा वाघ म्हणाल्या, छत्रपतींचा दाखला वेळोवेळी देणा-या उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील सदस्यच रोजच महिलांचा अवमान करताना दिसतात

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात आघाडी सरकार अपयशी

: भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या तसेच प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची घणाघाती टीका

पुणे : बीड, साकीनाका, परभणी , डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही . महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्व सुरक्षेसाठी स्वत:च कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकार प्रमाणे त्यांनीही घरातच बसून रहायचे ? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला सत्तेत रहाण्याचा अधिकारच नाही , असा घणाघात ही त्यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीच्या दोन वर्षांच्या पूर्ततेवर भाजपची भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ बोलत होत्या. पश्चिम महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख संजय मयेकर, शहर सह प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, प्रशांत कोतवाल यावेळी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी महिला सुरक्षाप्रश्नी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचून दाखवला. त्या म्हणाल्या की, ह्या सरकारने दोन वर्षे महिला सुरक्षेसंदर्भात केवळ महिलांची घोर निराशा आणि फसवणूक केली.ज्या शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देऊन सन्मानाने घरी पाठवले ,त्या छत्रपतींचा दाखला वेळोवेळी देणा-या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यच रोजच महिलांचा अवमान करताना दिसत आहेत . महिलांच्या सुरक्षेसाठी तत्कालिन गृहमंत्र्यांनी २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा आणण्याच्या घोषणा केल्या तो कायदा अजूनही लागू झालेला नाही . महिला अत्याचार प्रश्नी चहुबाजूंनी रान उठल्यानंतर जवळपास दीड वर्षांनंतर अखेर सरकारला महिला आयोग अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा ऑक्टो २०२१ हा मुहूर्त सापडला .वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन असो अथवा भाजपाच्या १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र असो प्रत्येक वेळी भाजपाने ‘ धक्का’ दिला की या सरकारची गाडी हलणार अशी स्थिती राज्यात आहे.

मोदी सरकारकडून महिला सबलीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत तसेच महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला अत्याचार रोखण्यासाठी 2020 साली नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली . त्यानुसार महिलांवरील अत्याचाराचा एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई , बलात्काराचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात एफआयआर नोंदवण्यात हलगर्जी , पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात टाळाटाळ होत आहे.

त्या म्हणाल्या की, महिला अत्याचारांच्या असंख्य घटना घडत असताना सरकारमधील मंत्र्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही . एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने राजीनामा द्यावा लागला तर दुसरे मंत्री सेलिब्रिटींच्या मुलाच्या अटकेविरोधात, जावयांवरील कारवाई विरोधात पत्रकार परिषदा घेण्यात आणि वायफळ चर्चा करण्यात मग्न आहेत. लोकप्रतिनिधी , राष्ट्रवादी युवा प्रदेशाध्यक्ष यांच्यावर सत्तेचा गैरवापर करत महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत . लखीमपूर प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद ची हाक देणा-या सरकारमधील मंत्र्यांना राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना दिसत नाहीत . महाराष्ट्र बंद साठी जितकी यंत्रणा कामाला लावली गेली तितकी मेहनत जर महिला सुरक्षेसाठी केली असती तर लेकीसुनांना सुरक्षित वाटले असते असे त्या म्हणाल्या.