Honeytrap DRDO Scientist | पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याने DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक

Categories
Breaking News social देश/विदेश पुणे

Honeytrap DRDO Scientist | पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याने DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक

Honeytrap  DRDO Scientist | देशाची संवेदनशील शासकीय माहिती पाकीस्तानला (Pakistan) पुरविल्याप्रकरणी पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (Anti terrorist Squad) डीफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑरगानायझेशन (defence research and devlopment organization) (DRDO) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाला अटक केली आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञाला न्यायालयाने नऊ तरखेपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Honeytrap DRDO scientist)
डीआरडीओतील संशयित शास्त्रज्ञ पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेच्या हस्तकांशी संपर्कात होते. त्यासाठी ते समाजमाध्यमातील संपर्क सुविधाचा वापर करत असल्याची माहिती एटीएसच्या पुणे पथकाला मिळाली होती. त्यानंतर एटीएसच्या पथकाने तांत्रिक तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली.एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, तीन मे रोजी पुणे येथील डीआरडीओच्या शास्त्रज्ञ कार्यालयामध्ये कार्यरत असताना त्यांनी पाकीस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह हस्तकाशी सामाजिक माहिती व्हॉटसअ‍ॅप व्हाईस मेसेज, व्हिडीओ कॉलने संपर्कात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय गुपीत माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा ठपका ठेवत संशयास्पद हालचालीवरून ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी एटीएसकडून मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शासकीय गुपीते अधिनियम १९२३ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 माहिती पुरविली याची चौकशी

शास्त्रज्ञाची सध्या सखोल चौकशी करण्यात येत आहे. ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात कसे आले. त्यांनी नेमकी काय माहिती पुरविली, यादृष्टीने तपास सुरु आहे. नोव्हेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. देशात या पूर्वी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने तरुणींशी मैत्रीच्या मोहजालात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी अडकवल्याचा घटना घडल्या होत्या. त्यानंतर लष्कराने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह जवानांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Bilawal Bhutto Vs BJP | बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

बिलावल भुट्टो यांच्या निषेधार्थ भाजपाचे राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात भारत (India) सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान (Pakistan) भारतात दहशतवादी कारवाया (Terror) करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मा. मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP President Chandrashekhar Bawankule) यांनी शनिवारी पुणे येथे केली.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करताना ते बोलत होते.

मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मा. मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे संपूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी राज्यात भाजपा कार्यकर्ते १२०० ठिकाणी आंदोलन करत आहेत. सर्व शहरे, जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. (Bhartiya Janata Party)

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देत आहेत. भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची ताकद भारताकडे मा. मोदीजींच्या नेतृत्वात आहे. तो देश भारताच्या विरोधात बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया अशी कृती करू शकत नाही. दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान हतबल झाला आहे. पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये केली जात आहेत.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची बुलेट ट्रेन सुरू झाली असून हे असेच काम चालू राहिले तर आपले राजकीय अस्तित्व संकटात येईल, अशी भीती महाविकास आघाडीला वाटते व तेच त्यांच्या मोर्चामागचे खरे कारण आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. आता राज्य गतीने पुढे जात आहे, यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारत होते. महाविकास आघाडीच्या एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेषभूषा करून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर नतमस्तक झाला होता. ही महाविकास आघाडीची संस्कृती आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, पाकिस्तानला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला, तरी त्यांचा मूळ स्वभाव बदलत नाही. मोदींमुळे जगात शांतता प्रस्थापित होत आहे. पाकिस्तानातील जनतेचे लक्ष तेथील परिस्थितीवरून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता बदलेला भारत आहे. महाविकास आघाडीचे नेते आज बोलत नाहीत. पंतप्रधान एका पक्षाचे नाहीत, ते देशाचे नेते आहेत. महाविकास आघाडीच्या स्वाभिमानाचे काय झाले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,महीला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ,आमदार माधुरीताई मिसाळ प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे यांच्यासह मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेविक आदी उपस्थित होते

 

Imran Khan : Pakistan : मध्यरात्री पाकिस्तानमधील सरकार पडलं  : इम्रान खान यांना पदावरून हटवले 

Categories
Breaking News Political देश/विदेश

मध्यरात्री पाकिस्तानमधील सरकार पडलं 

: इम्रान खान यांना पदावरून हटवले 

इस्लामाबाद: सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग, सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानातील `इम्रानशाही` अखेर खालसा झाली. अविश्वास ठरावाच्या बाजूने १७४ मते मिळाली, तर विरोधात शून्य मते मिळाली. अशा प्रकारे पदावरून हटविले जाणारे इम्रान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

इम्रान यांना सत्ताच्युत करण्यासाठी ३४२ सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना १७२ सदस्यांचे बळ आवश्यक होते. विरोधकांना इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ या पक्षाचे मित्र असणाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. (Imran Khan)शेवटच्या चेंडूपर्यंत सत्तेचा गेम खेळण्याचा निर्धार करत मैदानात उतरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज विरोधकांना अक्षरशः दिवसभर झुलविले. परंतु, ते दिवसभरात नॅशनल असेंब्लीत फिरकलेच नाहीत. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानाला बगल देत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. इम्रान यांनी राजीनामा द्यावा म्हणून ‘आयएसआय’ आणि लष्करानेही दबाव आणला होता पण शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत इम्रान यांनी हा दबाव झुगारून लावत पंतप्रधानपदाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला. (Imran Khan)

‘नॅशनल असेंब्ली’च्या सभापती असद कैसर यांनी देखील इम्रान यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. इम्रान खान यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावावर मतदान न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली व सभापतीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी इम्रान यांच्याबरोबरील ३० वर्षांच्या मैत्रीचा हवालाही दिला. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शनिवारी अविश्वास ठरावावर मतदान घेणे बंधनकारक होते. न्यायालयाचा निकाल न मानल्यास सभापतींवरही टांगती तलवार होती. त्यापासून कैसर यांनी बचावात्मक पवित्रा घेत राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ उपसभापतींनीही राजीनामा दिला. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी नॅशनल असेंब्लीतून सभात्याग करण्याचा निर्णय घेतला.

हे सर्व नाट्य पाकिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार पावणेबारापर्यंत सुरू होते. नंतर पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)चे अयाज सादिक यांच्याकडे सभागृहाच्या सभापतीपदाची सूत्रे सोपविण्यात आली. त्यांनी शनिवार संपण्यापूर्वी अविश्वासदर्शक ठरावावरील मतदानाची प्रक्रिया सुरू केली. स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १२ वाजता सभागृहाचे कामकाज दोन मिनिटांसाठी तहकूब केले व पुन्हा १२ वाजून दोन मिनिटांनी कामकाज सुरू करत ठरावावरील मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. स्थानिक प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री एक वाजता निकाल जाहीर करण्यात आला. अविश्वास ठरावावेळी सत्ताधारी पक्षाचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हता.
सभागृहात दिवसभर गोंधळया सगळ्या घडामोडींमुळे राजधानी इस्लामाबादमधील सुरक्षाही वाढविण्यात आली होती. ‘नॅशनल असेंब्ली’च्या कामकाजाला स्थानिक प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास सभापती असद कैसर यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरवात केली होती पण दिवसभरामध्ये वेळोवेळी गोंधळ झाल्याने अविश्वास ठरावावर मतदान होऊ शकले नाही. खुद्द पंतप्रधान इम्रान खान हे देखील सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी झाले नव्हते. वारंवार गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज वेळोवेळी तहकूब करण्यात आले. हा गोंधळ आणि आरोप- प्रत्यारोपाच्या फैरींमध्येच सगळा दिवस वाया गेला.
इम्रान यांना सत्ताच्युत करण्यासाठी ३४२ सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना १७२ सदस्यांचे बळ हवे होते. विरोधकांना इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ या पक्षाचे मित्र असणाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आहे.दिवसभरातील वादविवादानंतर नॅशनल असेंब्लीत रात्री साडेआठवाजता अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा इम्रान खान यांनी ठोठावला. त्यामुळे सभागृहातील मतदान पुन्हा पुढे ढकलले गेले. अखेरीस मध्यरात्रीनंतर इम्रानशाही खालसा झाली.

दिवसभरात

– नॅशनल असेंब्लीचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांची बैठक
– इम्रान यांची माजी पत्नी रेहम संसदेमध्ये उपस्थित
– सकाळी अकरा वाजता नॅशनल असेंब्लीच्या कामकाजाला सुरूवात
– शाहबाज शरीफ यांचा इम्रान सरकारवर हल्लाबोल- विरोधकांच्या टीकेवर नॅशनल असेंब्लीचे सभापती भडकले
– इमरान यांच्यावतीने शाह मेहमूद कुरेशींनी केला युक्तिवाद
– गरमागरम चर्चेनंतर असेंब्लीचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब
– इमरान खान यांची कायदेतज्ज्ञांशी खलबते
– संसद कामकाजाला पुन्हा सुरूवात, रात्री मतदान घेण्याचे ठरले
 – पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीबाहेर निमलष्करी दले तैनात
 – शनिवारी मध्यरात्री इम्रान खान सरकारवरील अविश्वास ठराव मंजूर

शाहबाज  शरीफ नवे पंतप्रधान शक्य

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सरकार स्थापनेचा दावा करण्याची मुदत असेल. त्यानंतर सोमवारी नव्या नेत्याचा पंतप्रधानपदी शपथविधी होऊ शकतो. सर्व विरोधी पक्षांनी शाहबाज शरीफ यांची नेते म्हणून निवड केली आहे. त्यामुळेच ते नवे पंतप्रधानपदाची सूत्रे घेऊ शकतील.

Ludhiana Blast Case : लुधियाना न्यायालय स्फोट : पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

Categories
Breaking News देश/विदेश

लुधियाना न्यायालय स्फोट : पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या आयएसआयचा पाठींबा असलेला खलिस्तान समर्थित गट लुधियाना न्यायालयात स्फोट या हल्ल्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीमागे असू शकतो.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लाल किल्ल्यातील घटनेनंतर गुप्तचर यंत्रणा पंजाबमध्ये खलिस्तानी सैन्याच्या हालचालींना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत असलेल्यांवर बारीक नजर ठेवत होती. पाकिस्तानातील हँडलर त्यांच्या जमिनीवर काम करणाऱ्यांना पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या सूचना देत होते.  राज्य पोलिसांसोबतच्या संयुक्त कारवाईत असे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात आले, असेही ते म्हणाले.

“आम्हाला पाकिस्तानच्या ISI द्वारे समर्थित असलेल्या खलिस्तान चळवळीला पुनरुज्जीवित करण्यासाठी स्थानिक टोळ्यांना भाड्याने आणि कट्टरपंथी बनवण्याबाबत विशिष्ट माहिती मिळाली. आम्ही हे इनपुट स्थानिक पोलिसांसोबत सामायिक केले आणि जामिनावर सुटलेल्या किंवा फरार झालेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यासाठी राज्यभर चालवलेले ऑपरेशन.  गेल्या काही महिन्यांत केलेली वसुली ही हिमनगाच्या अगदी टोकाची होती,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
नोव्हेंबरमध्ये पठाणकोटमधील लष्करी छावणीच्या गेटजवळ ग्रेनेड स्फोटाची घटना देखील स्थानिक गुन्हेगारांनी राबवलेली एक दहशतवादी कृती होती, असेही त्यांनी नमूद केले.

“या वर्षी पंजाबजवळ मानवरहित हवाई वाहनांच्या सुमारे 42 ड्रोन दृश्यांची नोंद झाली आहे आणि अनेकांची नोंद झाली नाही. पाकिस्तानच्या बाजूने ड्रोनचा वापर करून स्फोटके आणि लहान शस्त्रे टाकण्यात आली आहेत, याचा उपयोग राज्यातील शांतता अस्थिर करण्यासाठी केला जाईल,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या पाच महिन्यांत पंजाब पोलिसांनी सीमावर्ती शहरांमधून सात टिफिन बॉम्ब आणि 10 हून अधिक हातबॉम्ब जप्त केले आहेत.
या वर्षी ऑगस्टमध्ये पंजाब पोलिसांनी जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांच्या पुतण्याचा मुलगा गुरुमुख सिंग याला अटक केली होती आणि त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली होती.  तपासात, असे आढळून आले की त्याला पाकिस्तानच्या ISI आणि इतर पाकिस्तान-आधारित खलिस्तान समर्थक दहशतवादी गटांकडून पंजाबमध्ये अनेक दहशतवादी हल्ले करण्यासाठी लॉजिस्टिक सपोर्ट मिळत होता, ज्यामध्ये राज्य निवडणुकांपूर्वी दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात होते.