Honeytrap DRDO Scientist | पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याने DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक

Categories
Breaking News social देश/विदेश पुणे
Spread the love

Honeytrap DRDO Scientist | पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याने DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक

Honeytrap  DRDO Scientist | देशाची संवेदनशील शासकीय माहिती पाकीस्तानला (Pakistan) पुरविल्याप्रकरणी पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (Anti terrorist Squad) डीफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑरगानायझेशन (defence research and devlopment organization) (DRDO) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाला अटक केली आहे. वरिष्ठ शास्त्रज्ञाला न्यायालयाने नऊ तरखेपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Honeytrap DRDO scientist)
डीआरडीओतील संशयित शास्त्रज्ञ पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेच्या हस्तकांशी संपर्कात होते. त्यासाठी ते समाजमाध्यमातील संपर्क सुविधाचा वापर करत असल्याची माहिती एटीएसच्या पुणे पथकाला मिळाली होती. त्यानंतर एटीएसच्या पथकाने तांत्रिक तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली.एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, तीन मे रोजी पुणे येथील डीआरडीओच्या शास्त्रज्ञ कार्यालयामध्ये कार्यरत असताना त्यांनी पाकीस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह हस्तकाशी सामाजिक माहिती व्हॉटसअ‍ॅप व्हाईस मेसेज, व्हिडीओ कॉलने संपर्कात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय गुपीत माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा ठपका ठेवत संशयास्पद हालचालीवरून ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी एटीएसकडून मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शासकीय गुपीते अधिनियम १९२३ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 माहिती पुरविली याची चौकशी

शास्त्रज्ञाची सध्या सखोल चौकशी करण्यात येत आहे. ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात कसे आले. त्यांनी नेमकी काय माहिती पुरविली, यादृष्टीने तपास सुरु आहे. नोव्हेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते. देशात या पूर्वी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने तरुणींशी मैत्रीच्या मोहजालात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी अडकवल्याचा घटना घडल्या होत्या. त्यानंतर लष्कराने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह जवानांना सूचना देण्यात आल्या आहेत.