Dilip Vede Patil | मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या मागणीला हिरवा कंदील

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

Dilip Vede Patil | मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या मागणीला हिरवा कंदील

Dilip Vede Patil | चांदणी चौक उड्डाणपूल (Chandni Chowk Flyover) प्रकल्पा अंतर्गत नवीन पादचारी मार्ग विकसित करणे या  मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Ex Corporator Dilip Vede Patil) यांच्या मागणीला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
पुणे शहराची शान वाढविणाऱ्या बहुचर्चित चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पाचे १२ ऑगस्ट २०२३ रोजी मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. चांदणी चौक उड्डाणपूल झाल्यानंतर या परिसरात असणाऱ्या अन्य रस्ते आणि रहिवासी सोसायट्यांचे अनेक प्रश्न व समस्या प्रलंबित राहिले आहेत. यामध्ये बावधन मुख्य रस्त्याचा प्रश्न, दिशादर्शक फलकांचा प्रश्न, सर्व्हिस रोडचा प्रश्न, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासंबंधी समस्या, रस्ते आणि सोसायटी एंट्रन्स लेव्हल मध्ये तफावत असणे अश्या अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. प्रशांत वाघमारे यांसी सर्व विभागीय अधिकाऱ्यां समवेत प्रत्यक्ष पाहणीचे निवेदन दिले होते.
१. एनडीए चौक(चांदणी चौक) ते बावधन पादचारी पूल – चांदणी चौक उड्डाणपूल तसेच विस्तारित महामार्ग ओलांडण्यासाठी सध्या कोणतीही सुविधा नसल्याने पादचारी मार्ग करणे.
२. चांदणी चौक प्रकल्पामध्ये येणारे  सर्व एकूण ६ बस स्टॉप सर्व सोयी-सुविधांसह विकसित करणे.
३. बावधन सर्कल व एनडीए सर्कल च्या बाजूने अरुंद झालेला रस्ता रुंद करणे
४. चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पालगत असणाऱ्या पुणे मनपा मालकीच्या आरक्षित जागांवर वाहनतळ विकसित करणे.
५. नियोजित शिवस्मारका शेजारील जागेवर नागरिकांकरिता पर्यटन स्थळ निर्माण करण्यात यावे.
६. चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पाअंतर्गत महिला व ज्येष्ठ नागरिक यांकरिता सुलभ शौचालय बांधणे.
अश्या विविध मागण्या नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या निवेदनातून करण्यात आल्या होत्या. तात्काळ प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी मा. शहर अभियंता श्री. प्रशांत वाघमारे यांच्या वतीने सर्वात मुख्य असलेली पादचारी मार्गाची मागणी व अन्य मागण्यादेखील मान्य करण्यात आल्या असून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी श्री. प्रशांत वाघमारे – शहर अभियंता, श्री. संजय कदम – उपमहाव्यवस्थापक NHAI,  श्री. युवराज देशमुख – अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, श्रीम. हर्षदा शिंदे – अधीक्षक अभियंता, भवन रचना विभाग, श्री. भारत तोडकरी – महामार्ग अभियंता NHAI, श्री. निवृत्ती उथळे, उप अभियंता, बांधकाम विभाग, श्री. वीरेंद्र केळकर, कार्यकारी अभियंता, भवन रचना विभाग, श्री. अभिजित डोंबे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, श्रीम. प्रियांका बांते – कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, श्री. महेश शेळके – कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, श्री. निखील मिझार – वाहतूक नियोजय, पथ विभाग, श्री.सतीश कांबळे – स्थापत्य अभियंता, पुणे महानगरपालिका, पुणे, श्री.किशोर बरेकर – कंत्राटदार NCC, या पदाधिकाऱ्यांसह बावधन सिटीझन फोरम चे श्री.दुष्यंत भाटीया, श्री.मनीष देव, श्री.अजित साने, श्रीम.दीपा प्रभू, श्रीम. प्रग्या गुप्ता, बापू मोहोळ व स्वतः     मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटील आणि परिसरातील नागरिक पाहणीच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित होते.