PMC Schools : Rupali Dhadve : महापालिकेचे 10 वी चे विद्यार्थी करणार “आयडियल स्टडी”!  : ऍप खरेदी करण्याचा प्रस्ताव 

Categories
Breaking News Education PMC पुणे
Spread the love

महापालिकेचे 10 वी चे विद्यार्थी करणार “आयडियल स्टडी”!

: ऍप खरेदी करण्याचा प्रस्ताव

पुणे :  कोरोना महामारीच्या काळात सर्व शाळा बंद होत्या. सद्यस्थितीत इयत्ता ७ वी पासून पुढील इयत्तेचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे खंड जरी पडला नसला तरी शिक्षणाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. इयत्ता १० वी हे माध्यमिक शिक्षणातील महत्वपूर्ण वर्ग असून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे महत्वपूर्ण वर्ष आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी अॅप हे वरदान ठरणारे आहे. या अॅपमुळे पुणे महानगरपालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची गुणवत्ता वाढविण्यास मोलाची मदत होईल. त्यामुळे हे ऍप खरेदी करण्याचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षां रुपाली धाडवे यांनी समिती समोर ठेवला आहे. यावर पुढील बैठकीत चर्चा होईल.

: महिला बाल कल्याण समितीसमोर प्रस्ताव

प्रस्तावानुसार सध्याचे जग हे ऑनलाईन पद्धतीचे असल्याने पुणे महानगरपालिकेतील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यअभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून शिकवला तर त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अधिक आवड निर्माण होईल. व ते ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून घरीसुद्धा स्व-अध्ययनाच्या मार्गातून ज्ञानार्जन करू शकतील. त्यामुळे कोणत्याही महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. आयडिल स्टडी या अॅपमध्ये पाठ्यपुस्तकातील सर्वच गोष्टी सदर अॅप मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी, उजळणीसाठी नोट्स, प्रत्येक पाठाचे मुद्दे, प्रश्नोत्तरे, सुत्रे, एम.सी.क्यू., भाषा विषयांसाठी खास मूळ व्याकरण, सरावासाठी प्रत्येक पाठाच्या प्रश्नपत्रिका,आदर्श उत्तरपत्रिका, विद्यार्थ्यांना सोपे जाईल असे प्रत्येक पाठाचे अॅनिमेटेड व्हिडिओ इ. या अॅपमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे हे अॅप पुणे महानगरपालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यास पुणे महानगरपालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी अॅप हे वरदान ठरणारे आहे. या अॅपमुळे पुणे महानगरपालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची गुणवत्ता वाढविण्यास मोलाची मदत होईल. तरी पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिकणा-या इयत्ता दहावी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयडिल स्टडी हे अॅप खरेदी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत तरतूद उपलब्ध करून खरेदी करण्यास मान्यता देण्यात यावी व सदर अॅप विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. असे प्रस्तावात म्हटले आहे.

Leave a Reply