Tag: PMC Pune latest news
PMC Sanitary Napkins Purchase | पुणे महापालिका आता 5 2 (2) नुसार खरेदी करणार 24 लाख सॅनिटरी नॅपकिन्स!
| 93 लाख 53 हजाराचा खर्चाला स्थायी समितीची मान्यता
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) शाळांतील विद्यार्थिनींना महापालिके कडून सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यात येते. दरवर्षी लाखो नॅपकिन दिले जातात. यासाठी टेंडर प्रकिया राबवली जाते. कोविड काळापासून ही टेंडर प्रक्रिया बंद करण्यात आली होती. दरम्यान मागील वर्षी महापालिका प्रशासनाकडून नॅपकिन खरेदी ची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र याविषयी तक्रारी करण्यात आल्याने महापालिकेने ही निविदा प्रक्रिया रद्द केली. मात्र यामुळे मुलींना नॅपकिन मिळण्यास उशीर होत होता. त्यामुळे महापालिकेने सीएसआर फंडातून नॅपकिन्स घेतल्या होत्या. तसेच काही सामाजिक संस्थांनी पालिकेला नॅपकिन्स दिले होते. (Pune PMC News)
PMC Property Tax Lottery Results | 45 पुणेकरांनी पुणे महापालिकेकडून जिंकली ई कार, लॅपटॉप, बाईक | काही माजी नगरसेवकांनी देखील जिंकले बक्षीस
PMC Property Tax Lottery Results | पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) प्रॉपर्टी टॅक्स धारकांसाठी लॉटरी योजना (Property Tax Lottery Scheme) सुरू केली होती. मिळकत कराची थकबाकी वेळेवर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने अभिनव पाऊल उचलले होते. महापालिकेने 15 मे ते 31 जुलै 2023 दरम्यान मिळकतकर भरणाऱ्या निवासी, अनिवासी आणि खुल्या भूखंडावरील करदात्यांना लागू असलेली लॉटरी योजना आणली होती. यामध्ये 45 पुणेकरांनी इ कार पासून ते बाईक, लॅपटॉप, फोन अशी आकर्षक बक्षिसे मिळवली आहेत. यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांचा समावेश आहे. त्यांनी व त्यांच्या पतीने पेट्रोल कार जिंकली आहे. (PMC Property Tax Lottery Results)
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलीस वसाहत येथील हुतात्मा शिरीष कुमार विद्यालय येथे ही लॉटरी काढण्यात आली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार, विकास ढाकणे, कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त अजित देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. महापालिकेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे लॉटरी काढण्यात आली आहे.
——