PMC Property Tax Lottery Results | 45 पुणेकरांनी पुणे महापालिकेकडून जिंकली ई कार, लॅपटॉप, बाईक | काही माजी नगरसेवकांनी देखील जिंकले बक्षीस

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax Lottery Results | 45 पुणेकरांनी  पुणे महापालिकेकडून जिंकली  ई कार, लॅपटॉप, बाईक | काही माजी नगरसेवकांनी देखील जिंकले बक्षीस

PMC Property Tax Lottery Results | पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) प्रॉपर्टी टॅक्स धारकांसाठी लॉटरी योजना (Property Tax Lottery Scheme)  सुरू केली होती.  मिळकत कराची थकबाकी वेळेवर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने अभिनव पाऊल उचलले होते.  महापालिकेने 15 मे ते 31 जुलै 2023 दरम्यान मिळकतकर भरणाऱ्या निवासी, अनिवासी आणि खुल्या भूखंडावरील करदात्यांना लागू असलेली लॉटरी योजना आणली होती. यामध्ये 45 पुणेकरांनी इ कार पासून ते बाईक, लॅपटॉप, फोन अशी आकर्षक बक्षिसे मिळवली आहेत. यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांचा समावेश आहे. त्यांनी व त्यांच्या पतीने पेट्रोल कार जिंकली आहे.  (PMC Property Tax Lottery Results)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर पोलीस वसाहत येथील हुतात्मा शिरीष कुमार विद्यालय येथे ही लॉटरी काढण्यात आली.  महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार, विकास ढाकणे, कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त अजित देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.  महापालिकेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे लॉटरी काढण्यात आली  आहे.

——

बक्षीस जिंकलेले पुणेकर

वार्षिक  कर २५,००० व त्यापेक्षा कमी

1.      DIPALI VIJAY THAKUR & DARSHAN VIJAY Thakur |  पेट्रोल कार
 2.    PRIYANKA P. POKHARKAR ALIAS PRIYANKA N. MUKHEKAR & NIKHIL B. MUKHEKAR | पेट्रोल कार
—-
   1. PATIL AMIT AJIT, PATIL GOUTAMI AMIT | ई-बाईक
   2.   ASHOK SHAMRAO MESHRAM | ई-बाईक
3.  VIJAYA RAHUL GOSAVI & RANVEER R. GOSAVI & AMULLYA RAHUL GOSAVI | ई-बाईक
4.  SHYAM DNYANOBA MARANE,AASHA SHYAM MARANE | ई-बाईक
5. KAMAL DEVRAM BHURKUNDE .| ई-बाईक
6.  KOTINKAR AMRITA,KOTINKAR PRAVIN
| ई-बाईक
       —-
1.   I U SHAIKH | मोबाईल फोन
2. RAJESH SHYAMRAO SHINDE & MRS. DEEPALI RAJESH SHINDE | मोबाईल फोन
3.  PRAMOD PREMSUKHJI MANTRI | मोबाईल फोन
4. NITIN MAHADEO BHAWAR | मोबाईल फोन
5. UMESH RAMCHANDRA SHEVATE | मोबाईल फोन
6. VANDAN VINOD WADDALWAR | मोबाईल फोन
                 —-
1.   CHHAYA PRAMOD GANECHARI
 | लॅपटॉप
2.   NAMITA MAKARAND WAIKAR & MR. MAKARAND GOPAL WAIKAR | लॅपटॉप
3.    PRASHANT VILAS DESHPANDE & PRERANA PRASHANT DESHPANDE
| लॅपटॉप
4.  NAZMA BASHIR AHAMAD DONGARISA
| लॅपटॉप
—-

|      वार्षिक कर रु. २५,००१ ते ५०,०००

  1. MANIK DYANOBA DHONE | पेट्रोल कार
                 —–
 1. MAHANANDA GULAB PAWAR| ई-बाईक
2. MANKIKAR NAKSHATRA NILESH & MR. MANKIKAR NILESH NEELARATNA | ई-बाईक
 3.  KULKARNI ATUL VASANT & SMT KULKARNI JYOTI ATUL | ई-बाईक
                —-
1.   RAVEESH SANJIV NARANG | मोबाईल फोन
2.  MR. YOGESH NARAYAN BENDALE & DR. MRS. VINEETA YOGESH BENDALE | मोबाईल फोन
3. MUKESH KRUPASHANKAR MISHRA | मोबाईल फोन
——
   1. SEEMA MILIND SHEVTE |    लॅपटॉप
2.   MAKWANA DILIP WALLABHJI & SMT MAKWANA GAURI DILIP |   लॅपटॉप
—-

     वार्षिक  कर रु. ५०,००१ ते १ लक्ष

 1. ADITYA KUMAR, MRS. MANIKA RANI, MR. ASHOK KUMAR, & MRS. VINITA KUMAR AGARWAL | पेट्रोल कार
1.  KETAN SANJAY RUIKAR | ई-बाईक
2.   KASAT RAVINDRA RAMESH ,GAURAV VIJAY KASAT | ई-बाईक
3. TAKALE MADAN UMAKANT | ई-बाईक
—-
1. SHAMBHAVI AVINASH SABNIS, MR. AVINASH RAMKRISHNA SABNIS & MRS. LEENA AVINASH SABNIS | मोबाईल फोन
  2. SHAH KANTILAL POPATLAL . | मोबाईल फोन
3.  SANE RATNAPRABHA & SHRI MADHAV & PRAMOD | मोबाईल फोन
—–
  1.   DAVE JAYANT,MR. DAVE AAKASH
 |  लॅपटॉप
 2. RITESH DHARMARAO NAGDEOTE & MRS. MANJU DHARMARAO NAGDEOTE
|    लॅपटॉप
——

  वार्षिक  कर रु. १ लक्ष वरील

1. GANESH DNYANOBA KALAMKAR.MRS.JYOTI GANESH KALAMKAR | पेट्रोल कार
—–
1.  NATHIBAI DAMODAR THAKERSI WOMENS UNIVERS | ई बाईक
2. ARVIND SETHI & MRS. NATASHA SETHI | ई बाईक
3. M/S KALA NIKETAN COLLECTION THROUGH SHRI CHETAN H. PAREKH | ई बाईक
—–
1.  MOHAN L. PASALKAR & SHRI. ARVIND L. PASALKAR | मोबाईल फोन
2.  ECOF SCHOLASTIC PVT LTD. | मोबाईल फोन
3.  DESHPANDE RADHA R | मोबाईल फोन
—-
   1.  SATISH P. BAKRE. &MR. SANJAY BAKRE |   लॅपटॉप
2.    NARESH NARSINGHRAO PHULKAR |  लॅपटॉप
——–

E Bike | PMC Pune | प्रलंबित इलेक्ट्रॉनिक बाईकचा प्रस्ताव मंजूर |  ही योजना राबविणारी देशातील पहिली महापालिका

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

प्रलंबित इलेक्ट्रॉनिक बाईकचा प्रस्ताव मंजूर

|  ही योजना राबविणारी देशातील पहिली महापालिका

  पुणे : पुण्यातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे महापालिकेने इलेक्ट्रॉनिक बाइकच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ५०० ठिकाणांवर इ बाईक स्टेशन केले जाणार होते. पण पहिल्या टप्प्यात २५० स्टेशन उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून ही योजना आकाराला आली आहे. बालवडकर शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष असताना हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव मंजूर करण्यास खूप वेळ घेतला.

 – पालिकेला 2% महसूल मिळेल

  ही योजना प्रायोगिक तत्त्वावर ६ ते १२ महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे.  यासाठी 3-5 हजार दुचाकी इलेक्ट्रॉनिक बाईक मिळतील.  या सर्व बाईक्स कंपनी पुरवणार असून कंपनीकडून त्यांची देखरेख केली जाणार आहे.  यामध्ये पालिकेची गुंतवणूक शून्य असून महापालिकेला 2% महसूल मिळणार आहे.  यासाठी 500 ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  या बाईकवर किमीसाठी 4 रुपये आकारले जातील.  त्याचवेळी महामंडळाकडून ५० ते ६० सीएनजी मिनी बसेस खरेदी करून त्या पीएमपीएलमध्ये समाविष्ट केल्या जातील.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘शहरात इ बाईक भाड्याने देण्यासाठीचा प्रस्ताव मान्य केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात २५० ठिकाणी या बाईक भाड्याने मिळतील. तेथेच चार्जिंग स्टेशनची सुविधा असणार आहे. कंपनीकडून ५०० जागांची मागणी केली होती, पण ती अद्याप मान्य केलेली नाही. पुढील सहा महिन्यात कंपनीकडून सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील त्यानंतर ही सेवा पुणेकरांना उपलब्ध होईल.
माझ्या संकल्पनेतून हा प्रस्ताव आकाराला आला. मी शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष असताना हा प्रस्ताव मी समितीसमोर ठेवला होता.  यामुळे शहरातील पर्यावरणाचे रक्षण होईल.  तसेच त्याला शासनाची मान्यताही मिळाली आहे. दरम्यान आता स्थायी समितीने देखील या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. लवकरच पुणेकरांच्या सेवेत इ बाईक सादर होतील.

– अमोल बालवडकर, माजी नगरसेवक, भाजप