PMC Pune Employees | 23 समाविष्ट गावापैकी 8 गावांतील 76 कर्मचार्‍यांना महापालिका वेतनश्रेणी लागू

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Employees | 23 समाविष्ट गावापैकी  8 गावांतील 76 कर्मचार्‍यांना महापालिका वेतनश्रेणी लागू

 

 PMC Pune Employees | समाविष्ट  23 गावांमधील ४०८ कर्मचाऱ्याना याअगोदरच महापालिकेच्या सेवेत समाषिष्ट करुन घेण्यात आले आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात आठ गावांच्या 76 कर्मचाऱ्यांना महापालिका वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune | PMC pune Employees)

महापालिकेच्या हद्दीमध्ये (Pune Municipal Corporation Limits) गावांचा समावेश झाल्यानंतर येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी महापालिकेच्या सेवत घेण्यात आले. जिल्हाप्रशासनाकडून तपासणी करुन हे कर्मचारी महापालिकेच्या सेवत २०२१ ला घेण्यात आले होते. मात्र त्यांना ग्रामपंचायतीमध्ये मिळणारे मानधनच देण्यात येत होते. लेखापरिक्षण विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर सध्या ८ गावांमधील कर्मचाऱ्यांना  महापालिकेची वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना  वेतनामधील फरक सुध्दा मिळणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune PMC Employees)

महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले मनपा सेवत या कर्मचाऱ्याना घेण्यात आले होते. मात्र त्यांना वेतन महापालिकेच्या नियमानुसार मिळत नव्हते. त्यामुळे आता सुधारीत वेतन श्रेणी आठ गावातील कर्मचाऱ्यांना  लागू करण्यात आलीअसून एका महिन्यामध्ये  सुधारीत वेतन श्रेणी लागू करण्यात येईल. (PMC Pune News)

गाव                      सेवक संख्या

किरकटवाडी             21

सुस.                       15

औताडे हांडेवाडी          6

महाळुंगे                      17

नांदोशी सनसनगर          3

जांभूळवाडी कोळेवाडी     5

कोपरे                          5

वडाचीवाडी                    4

——-

News Title | PMC Pune Employees | Municipal pay scale applicable to 76 employees of 8 villages out of 23 covered villages

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे!

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडे मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्या थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या समोर मांडण्यात आल्या आहेत. यावरून कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. (PMC Pune Employees | Sharad Pawar)
पुणे महापालिका कर्मचारी (Pune Municipal Corporation Employees) प्रशासनाच्या कारभाराबद्दल असंतोष व्यक्त करत आहेत. याला कारण म्हणजे प्रशासनाचा उदासीनपणा. कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या पदोन्नत्या, कालबद्ध पदोन्नती, सहायक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत बदल करणे, लेखनिकी संवर्गावर अन्याय करणे, अशा अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. याबाबत कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दिल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर  शरद पवार यांची मोदीबाग या ठिकाणी बजरंग पोखरकर – अद्यक्ष पीएमसी एम्प्लॉईज पुणे महानगरपालिका (PMC Employees Union) व राजु ढाकणे जॉईंट सेक्रेटरी यांनी भेट घेऊन पुणे महानगरपालिका कर्मचारी यांच्या समस्या सोडविणे बाबत सविस्तर चर्चा केली. तसेच जुनी पेंशन योजना लागु करा, अशी मागणी देखील केली. शरद पवार कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. (Pune Municipal Corporation News)
—–/
News Title | PMC Pune Employees | Sharad Pawar Complaints of Pune Municipal employees’ problems directly to Sharad Pawar!

PMC Property Tax Department | पुणेकरांना प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा दिलासा | सवलतीत कर भरण्याची मुदत वाढवली

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax Department | पुणेकरांना प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा दिलासा | सवलतीत कर भरण्याची मुदत वाढवली

PMC Property Tax Department | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील मिळकतधारकांना (Property Holder) ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरल्यास करावर ५ किंवा १०% सवलत देण्यात आली होती. परंतु  ३१ जुलै रोजी काही तांत्रिक कारणास्तव मिळकतकर भरणा काही कालावधीसाठी बंद झाला होता. मिळकतधारकांची व लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करता मिळकतकर सवलतीमध्ये (Property tax Discount) भरण्याची मुदत  ०२ ऑगस्ट २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेकडून (PMC Pune) जाहीर करण्यात
आलेल्या लॉटरी योजनेचा कालावधी देखील दि. ०२ ऑगस्ट २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) यासाठी मान्यता दिली आहे. अशी माहिती उपायुक्त तथा कर आकारणी व कर संकलन प्रमुख अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC Property Tax Department)

—-

News Title | PMC Property Tax Department | Property tax department relief for Pune residents Exemption tax payment deadline extended

Pune Water Cut | दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊ नये

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut | दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊ नये

| खासदार सुप्रिया सुळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune Water Cut |  बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Constituency) आणि पुणे महापालिका हद्दीत (Pune Municipal Corporation Limits) समाविष्ट झालेल्या काही गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या गावांत पुन्हा गुरुवारी पाणी बंद (Water Cut on Thursday) ठेवले अजून विस्कळीतपणा येतो. त्यामुळे अशा गावांत गुरुवारी पाणी बंद ठेऊ नये. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे. (Pune Water Cut)

खासदार सुळे यांच्या पत्रानुसार बारामती लोकसभा मतदार संघातील पुणे महानगर पालिकेत समाविष्ट गावांना दिवसाआड आणि अनियमित पाणी पुरवठा होतो. तसेच नव्याने समाविष्ट धायरी, न-हे, नांदोशी सणसनगर या गावात विभागानुसार फक्त अर्धातास ते एक तास ऐवढाच पाणी पुरवठा केला जातो. त्यातच काही ठिकाणी महावितरणकडून त्या परिसरातील लाईट गेली तर त्या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. सद्य स्थितीत अनेक सोसायटयांमध्ये व गावांमध्ये असलेल्या पाण्याच्या कुपनलिका उन्हाळ्यामुळे बंदा पडलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच नागरीक पाणी समस्यांमुळे हैराण आहेत. (PMC Pune News)

सुळे यांनी म्हटले आहे कि, जर पुणे महानगर पालिकेने दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला तर त्या परिसरामध्ये पाण्यासाठी नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या गावात दिवसाआड पाणी पुरवठा आहे त्या ठिकाणचे पाणी आहे त्या प्रमाणे चालू ठेवावे. त्या मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये. अशी मागणी सुळे यांनी केली आहे. (Pune Water Cut Update)
——
News Title |Pune Water Cut | Water supply should not be shut off on Thursday in a village that provides water during the day | MP Supriya Sule’s request to Municipal Commissioner

CSR | Pune Municipal Corporation | CSR  माध्यमातून कोविड काळात  पुणे महापालिकेला दिलेली ७ कोटीची देणगी विना वापर पडून!

Categories
Breaking News PMC social पुणे

CSR | Pune Municipal Corporation | CSR  माध्यमातून कोविड काळात  पुणे महापालिकेला दिलेली ७ कोटीची देणगी विना वापर पडून!

CSR | Pune Municipal Corporation | कोविड जागतिक महामारीच्या (Corona) पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) मार्च २०२० मध्ये कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांना व कंपन्यांना महापालिकेला देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत अनेक नागरिक व कंपन्यांनी पुणे महापालिकेला २०२०-२१ मध्ये ४.८९ कोटी तर २०२१-२२ मध्ये ३.१० कोटी एवढ्या रकमेच्या देणग्या दिल्या. मात्र महापालिकेने २०२०-२१ मध्ये यातील एकही पैसा खर्च केला नाही तर २०२१-२२ मध्ये १.३० कोटी रुपये करोना बेड व ऑक्सिजन वर खर्च केले. आजवर यातील शिल्लक रकमेवर ५४ लाख रुपये व्याज महापालिकेला मिळाले आहे व आज रोजी या कोविड सीएसआर खात्यात ७.२२ कोटी रुपये पडून आहेत. अशी माहिती सजग नागरिक मंचाने (Sajag Nagrik Manch) उजेडात आणली आहे. (CSR | Pune Municipal Corporation)


याबाबत मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी सांगितले कि कोविड काळात नागरीकांचे झालेले प्रचंड हाल बघता देणगी म्हणून आलेले कोट्यावधी रुपये खर्च न करू शकण्याचा करंटेपणा करणाऱ्या पुणे महापालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. यापुढे एखादी आपत्ती आली तर नागरिक महापालिकेला मदत करायला पुढे येतील का असा विचारही आपल्या व आपल्या अधिकार्यांच्या मनात आला नाही याचे वैषम्य वाटते. प्रशासन प्रमुख म्हणून यामध्ये आपली जबाबदारी मोठी आहे. यावर कळस म्हणजे या पैशांचा वापर महापालिका इस्पितळ व दवाखाने यातील उपकरणे खरेदीवर करण्याऐवजी आपल्या आरोग्य विभागाने एका खाजगी इस्पितळासाठी ( बोपोडी आय हाॅस्पिटल) दोन कोटी रुपयांची उपकरणे घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. (PMC Pune News)

—-
आजच्या सोमवारच्या माहिती अधिकार दिनात ही सगळी माहिती मिळाली म्हणून निदान या गोष्टी चव्हाट्यावर तरी आल्या. या ७ कोटी रुपयांच्या निधीतून पुणे महापालिका इस्पितळे आणि दवाखाने यामध्ये आवश्यक ती यंत्रसामुग्री घेऊन गरजू पुणेकर रुग्णांची सोय करावी. अशी आमची मागणी आहे.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच पुणे


News Title |CSR | Pune Municipal Corporation | Donation of 7 crores given to Pune Municipal Corporation during Kovid period through CSR went unused!

Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानात पुणे महापालिका तिसऱ्या स्थानावर 

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानात पुणे महापालिका तिसऱ्या स्थानावर

| पहिला क्रमांक पिंपरी चिंचवडचा तर दुसरा नवी मुंबईचा

Majhi Vasundhara Abhiyan | राज्य सरकारच्या (State government) वतीने माझी वसुंधरा अभियान (Majhi Vasundhara Abhiyan) राबवण्यात आले. पर्यावरणीय जनजागृती साठी हे अभियान राबवण्यात आले. यात पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) 10 लाख लोकसंख्येपेक्षा अधिक गटात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. पहिला पिंपरी चिंचवड महापालिकेला (PCMC) तर दुसरा नवी मुंबई महापालिकेला (NAVI Mumbai Corporation) मिळाला आहे. मागील वर्षी देखील पुणे महापालिकेला (PMC Pune) तिसरा क्रमांक मिळाला होता. मात्र तो पुणे आणि सांगली मनपाला (Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation) विभागून देण्यात आला होता. (Majhi Vasundhara Abhiyan)

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये  २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ३.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२२ ते दिनांक ३१ मार्च, २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था व १६,४१३ ग्राम पंचायती अशा एकूण १६,८२४ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. (world environment Day)

“माझी वसुंधरा अभियान ३.०” अंतर्गत निर्गमित करण्यात आलेल्या टूलकिटनुसार डेस्कटॉप असेसमेंट करिता नागरी स्थानिक संस्था (अमृत गट) ७,६०० गुण, नागरी स्थानिक संस्था (अमृत गट वगळून) ७,५०० गुण आणि ग्रामपंचायतींसाठी ७,५०० गुण ठेवण्यात आले होते. (Majhi Vasundhara Abhiyan  News)

माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमापन त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोनही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान ३.० मधील लोकासंख्यानिहाय ११ गटातील विजेते तसेच, महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड
करण्यात आली आहे. याबाबतचा निकाल दिनांक ५ जून, २०२३ रोजी जाहिर करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation News)

गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे:-

अमृत गट (राज्यस्तर) :
१० लक्ष पेक्षा अधिक लोकसंख्या गट :

1. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
2. नवी मुंबई महानगरपालिका
3. पुणे महानगरपालिका

—-
News Title | Majhi Vasundhara Abhiyan | Pune Municipal Corporation third place in Majhi Vasundhara campaign| The first number is Pimpri Chinchwad and the second is Navi Mumbai

Publication of work report : BJP : महापालिकेत जा आणि लोकांची कामे करा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिकेत जा आणि लोकांची कामे करा 

: माजी नगरसेवकांना चंद्रकांत पाटलांची सूचना 

 

पुणे : पुणे महापालिका बरखास्तीनंतर अनेक नगरसेवक महापालिकेत गेले नाहीत. हे योग्य नाही, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी दिवस वाटून घेऊन रोज महापालिकेत जा. नगरसेवक असताना जशी कामे केली तशीच कामे आताही करा, जनसंपर्क ठेवा. महापालिका पुन्हा जिंकण्यासाठी आपण माजी नाही तर आजी नगरसेवक आहोत हेच डोक्यात ठेवा. निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरीही पूर्वीप्रमाणे कामे करा, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

पुणे महापालिकेत गेल्या पाच वर्षात कार्य अहवालाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, दिलीप कांबळे, योगेश मुळीक, धीरज घाटे, सरस्वती शेंडगे, दीपक नागपुरे, गणेश घोष आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पाच वर्षात भाजपने केलेल्या कामांची यादी पाहून अभिमानाने फुलते. पूर्वी पाणी, गटार, कचरा अशा समस्या सोडविणारा नगरसेवक होता, पण आता ही कामे करतानाच वाहतूक कोंडीचा विचार करणारा, भूसंपादनासाठी प्रयत्न करणारा, मेट्रो, समान पाणी पुरवठा योजना करणारा अशी व्यापक व्याख्या नगरसेवकांची पुण्यात झाली आहे.त्यामुळेच सर्व सर्वेक्षणात भाजपला ८०च्या खाली जागा दाखवली जात नाही. भाजपला सत्ता दिल्याने त्याचे चीज झाले जाणीव लोकांमध्ये आहे. पुण्यात महापालिकेशिवाय भाजप माहिती नाही. देशात, राज्यात काय चालले आहे याची प्रतिक्रिया नसते. किरीट सोमय्यावर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आक्रमकपणे रस्त्यावर उतरलो तर भविष्यात पुढे कोणत्या नेत्यांवर हल्ला होण्याची वेळ येणार नाही. केवळ नगरसेवक म्हणून काम करायला जन्माला आला नाहीत. तर संघटनेची लढाई लढावीच लागेल. संघटना आहे तर आपण जिवंत आहोत, अशा शब्दात पाटील यांनी संघटनेसाठीही काम करा असा सल्ला दिला.
२०२४ ला कोल्हापूर गेले‘‘कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत भाजपला ७७ हजार मिळाल्याने अनेकांची झोप उडाली आहे. बंटी पाटलांसह अनेकजण याचा अभ्यास करत आहेत. कोल्हापूरच्या निकालानंतर वृत्तपत्र, सोशल मीडिया, वृत्त वाहिन्यांवरून मी कधी हिमालयात जाणार अशी टीका केली. पण तेव्हा भाषण करणारे अनेक जण २०२४ ला आपल्या हातातून कोल्हापूर गेले, असे मानत आहेत. आपण हे केळन संघटनेच्या जोरावर करू शकलो, अशा शब्दात पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली.