Tag: Vikas Dhakane PMC
VIkas Dhakane PMC | पुण्याच्या विकासासाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासारखे अधिकारी पुणे महापालिकेत राहणे गरजेचे!
पुण्यातील वाहतुकीची समस्या मार्गी लागतेय!
– कोण आहेत विकास ढाकणे?
– पुणे आणि आपल्या कारकिर्दी बाबत ढाकणे यांच्या या आहेत भावना
Pune Municipal Corporation (PMC) will start ‘Aapla Dawakhana’ scheme at 58 locations
| The service will be provided at 45 locations in the first phase
As per the guidelines of the state government we have fixed 45 places in the first phase. We have put a proposal in this regard before the PMC property management department.
Aapla Dawakhana scheme will be well implemented in the city. A meeting will be held between the Health Department and the Property Management Department to resolve the technical issues. This plan will be implemented soon.
Aapla Dawakhana Yojana PMC Pune | पुणे महापालिका 58 ठिकाणी सुरु करणार ‘आपला दवाखाना’ योजना
| पहिल्या टप्प्यात 45 ठिकाणी दिली जाणार सेवा
Aapla Dawakhana Yojana PMC Pune | एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) मुंबईसह राज्यभरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 700 दवाखाने सुरू केले जाणार आहेत. त्याच धर्तीवर पुणे शहरात 58 ठिकाणी दवाखाने सुरु केली जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 45 ठिकाणे आरोग्य विभागाकडून (PMC Health Department) निश्चित करण्यात आली आहेत. अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव (Dr Vaishali Jadhav PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation (PMC)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारीला मुंबईत अशा 20 दवाखान्यांचं लोकार्पण करण्यात आलं. यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबईत एकूण 52 ठिकाणी ‘आपला दवाखाना’ अंतर्गत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. (Pune PMC News)
काय आहे ‘आपला दवाखाना’ योजना?
‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची नवीन आरोग्य योजना आहे. सध्यातरी ठाणे आणि मुंबई शहरात आपला दवाखाना अंतर्गत आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत.
आगामी काळात राज्यभरात असे 700 दवाखाने सुरू करण्यात येतील असं आश्वासन शिंदे सरकारने दिलं आहे.
मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप,सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते.
यावर उपाय म्हणून दर 25 ते 30 हजार वस्तीनजीक ‘आपला दवाखाना’ असावा असं लक्ष्य आहे.
– पुणे महापालिकेकडून 45 जागा निश्चित
पुणे शहर जुनी आणि नवी हद्द मिळून 58 दवाखाने उभारले जाणार आहेत. सरकारने यासाठी जागा भाडे तत्वावर घेण्यास सांगितले आहे. यात खाजगी जागांचा देखील समावेश आहे. या दवाखान्यात सरकारकडून एक क्लिनिकल सर्जन दिला जाणार आहे. इतर कर्मचारी हे महापालिकेला नेमावे लागतील. त्यानुसार आरोग्य विभागाने 45 जागा शोधून त्याबाबतचा प्रस्ताव मालमत्ता विभागाकडे ठेवला आहे. मालमत्ता विभाग त्याचे भाडे ठरवून देणार आहे. मात्र खाजगी जागा भाड्याने घेण्यावरून काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही.
—
राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पहिल्या टप्प्यात जागा 45 निश्चित केल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव आम्ही मालमत्ता व्यवस्थापन विभागासमोर ठेवला आहे.
– डॉ वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी
—
आपला दवाखाना योजना शहरात चांगल्या पद्धतीने राबवली जाईल. यातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी आरोग्य विभाग आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली जाणार आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित होईल.
– विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त
Katraj-Kondhwa Road Pune | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांसाठी अजित पवार २०० कोटी मिळवून देणार का? | अजित पवारांनी पाहणीच्या वेळी दिले आश्वासन
Katraj-Kondhwa Road Pune | पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानकपणे कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj – Kondhwa Road) कामांची पाहणी केली. त्यांनी रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या कामासाठी राज्य शासनातर्फे २०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) विषय मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान गेले वर्षभर २०० कोटी देण्याबाबत राज्य सरकार महापालिकेला नुसते आश्वासन देत आहे. किमान अजित पवार तरी याबाबत मनावर घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Katraj-Kondhwa Road Pune | PMC)
पुणे शहराच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण (Katraj- Kondhwa Road Widening) होणे महत्वाचे आहे. मात्र भूसंपादन (Land Acquisition) अभावी हे काम रखडले होते. भूसंपादन करण्यासाठी 200 कोटींचा निधी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) आश्वस्त केले होते. मात्र प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी नगर विकास विभागाला एका महिन्यात दोनदा पत्रव्यवहार करत 200 कोटी देण्याची मागणी केली होती. पहिले पत्र 6 जुलै ला पाठवण्यात आले होते. तर 19 जुलै ला अजून एक पत्र पाठवण्यात आले होते. तरीहि निधी अजून मिळालेला नाही. (Katraj-Kondhwa Road)
दरम्यान या पाहणीच्या वेळी अजित पवार म्हणाले, कात्रज चौक उड्डाणपूल ६५०-७०० मीटर पुढे वाढवावा. खडी मशीन चौकापासून पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. खडी मशीन चौकापासून कान्हा हॅाटेलकडे येणारा एकतर्फी मार्ग तात्काळ चालू करायचे निर्देश त्यांनी दिले. रस्त्यासाठी जमीन ताबा देणाऱ्यांना त्यांनी व्यक्तीश: धन्यवाद दिले.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी रस्त्याच्या कामाविषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला या कामाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार चेतन तुपे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महेश पाटील आदी उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांच्यावतीने उपमुख्यमंत्री श्री.पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार रस्त्याच्या एक बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
Khadki Aundh Road | PMC Road Department | एका रात्रीत बनवला खडकी – औंध रस्ता | अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेच्या पथ विभागाने करून दाखवले
Khadki Aundh Road | PMC Road Department | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने एखादी गोष्ट मनावर घेतली तर अशक्य ते शक्य कसे होऊ शकते, याचे उदाहरण काल रात्री पाहायला मिळाले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC) आणि पथ विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar PMC), साहेबराव दांडगे (Sahebrao Dandge PMC) आणि दिनकर गोजारे (Dinkar Gojare PMC) यांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या रात्रभरात खडकी औंध (Khadki Aundh Road) असा चारपदरी रस्ता तयार केला आहे. त्यासाठी हे अधिकारी रात्रभर जागेवर तळ ठोकून होते. अतिरिक्त आयुक्तांनी या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
औंध परिसरातील (Sai Chowk, Aundh Pune) साई चौक, जयकर पथ येथे काल अतिक्रमण कारवाई करण्यात आली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Khadki Cantonment Board) व पुणे मनपाच्या (Pune Municipal Corporation) वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास ४४ अनधिकृत स्टॉल हटवण्यात आले. दरम्यान रस्ता मोकळा झाल्याने काल रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून हा रस्ता चौपदरी केला जाणार, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले होते.
त्यानुसार रात्रभर पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे आणि दिनकर गोजारे हे अधिकारी खडकी साई चौक ते स्पायसर, औंध रस्ता करायला तळ ठोकून होते. एका रात्रीतून राडारोडा काढणे,फीडर बॅाक्स आणि लाईटपोल काढणे,झाडे ट्रांन्सप्लांट करणे आणि रोड बनवणे खूप अशक्य गोष्ट! मात्र PMC ने करून दाखवले. याबद्दल अतिरिक्त आयुक्तांनी पथ विभागाच्या कामाबाबत अभिमान असल्याची भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान कालच महापालिकेने या भागातील अतिक्रमण काढून टाकले होते. हा भाग खडकी कॅन्टोन्मेंट व पुणे म.न.पा हद्दीवर येत असून, कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. खडकी रेल्वे स्टेशन पिछाडीस हा चौक येतो. औंध, बोपोडी हद्दीतील नागरिक याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या चौकामध्ये सुमारे 44 स्टॉल धारकांनी अनेक वर्षापासून अतिक्रमण केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे म.न.पा ला संयुक्त कारवाई करनेच्या सूचना दिल्या होत्या. खडकी कॅन्टोन्मेंट मुख्याधिकारी यांनी पुणे म.न.पा कडे अतिक्रमण कारवाई व रस्ता दुरूस्ती साठी मदत मागितली. महापालिका आयुक्त यांनी आवश्यक सहकार्य करणेचे मान्य केले. त्यानुसार काल संयुक्त कारवाई करणेत आली. त्यामध्ये सर्व 44 स्टॉल काढून टाकण्यात आले. त्यामुळे साई चौक मोकळा झाला. रात्री त्याचे डांबरीकरण करून, ज्यादा उपलब्ध रस्त्याचे तातडीने रूंदीकरण करणेत आले. सध्या उपलब्ध 12 मी रुंदीचा रस्ता सुमारे 24मी पर्यंत रुंदीचा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटनेस मदत होणार आहे.
—/
Pune Businessman | PPP | आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी पुण्यातील उद्योजकांची पुणे महापालिका आयुक्तांशी चर्चा!
| वासवानी उड्डाणपूल पाडण्याबाबत बैठकीत चर्चा
| शहर विकासासाठी उद्योजकांचा फोरम | योहान पूनावाला
Hadapsar Traffic Congestion | लवकरच होणार हडपसर परिसराचा कायापालट.! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा पुढाकार
Hadapsar Traffic Congestion | हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. येथील नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रवास करत असताना, वाहतूक कोंडी सारख्या समस्येला दररोज सामोरे जावे लागत आहे. मात्र आता हडपसर परिसराचा कायापालट लवकरच होणार आहे. हडपसरला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. (Hadapsar Pune)
हडपसर च्या समस्याबाबत प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही प्रशासन कोणताही ठोस असा निर्णय घेत नसल्यामुळे, काही दिवसांपूर्वी मुंढव्यातील महात्मा फुले चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलन मागे घेण्यासाठी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मध्यस्थी करत हडपसरला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी लवकरच सविस्तर बैठक घेऊ असा शब्द दिला होता.
याच पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी भागात वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडी बाबत निवेदन दिले. तसेच, निवेदनाच्या माध्यमातून घोरपडी व कोरेगाव पार्क मार्गे मुंढव्यापर्यंत भुयारी मार्ग करण्यात यावा. केशवनगर, मांजरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता अरुंद करावा. रस्त्यात येत असलेल्या झाडांच्या फांद्या व महावितरण चे पोल व डी. पी बॉक्स यांचे व्यवस्थापन करावे. अशा प्रकारची मागणी केली. व इतर विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी बैठकीला पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रसाद काटकर व ढवळे तसेच, इतर विविध विभागातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
| हे होते प्रमुख मुद्दे
१) महात्मा फुले चौक मुंडवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून ती कायमस्वरूपी सोडवण्यासाठी घोरपडी व कोरेगाव पार्क मार्गे मुंडव्यातून केशवनगर ला जाताना भुयारी मार्ग करण्यात यावा.
२) तसेच महात्मा फुले चौकातून केशवनगर ला जाताना मध्ये वस्तीपर्यंत मुख्य डीपी रस्ता झाला आहे. परंतु बधे वस्ती पासून ते केशवनगर वड्याच्या पुलापर्यंत डाव्या बाजूने रस्ता रुंदीकरण झालेले नाही सदर रस्त्यात येत असलेले झाडे स्थलांतर करून माननीय विकास आराखड्यानुसार पूर्ण रस्ता वड्याच्या पुलापर्यंत करण्यात यावा.
३) छत्रपती शिवाजी महाराज चौक केशवनगर मांजरी रोड जात असताना मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ता सुरुवातीला आहे सदरच्या परिसरातील अतिक्रमणे मोबदला देऊन त्वरित स्थलांतर करावेत त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण माननीय विकास आराखड्यानुसार त्वरित करण्यात यावे.
४) केशवनगर मांजरी रोड के आर बी वर्कशॉप आनंद नगर पासून ते लोणकर नगर चौक मार्गे झेड कॉर्नर पर्यंत सध्याच्या परिस्थितीला ४० फुटी रस्ता मोकळा आहे परंतु वीस फुटावरनच डांबरीकरण असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे रोडच्या दोन्ही बाजूने दहा दहा फुटाचे साईट पट्ट्याचे काम त्वरित सुरू करून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वरील काम
त्वरित मार्गी लावावे. केशवनगर मांजरी रोड लोणकर नगर चौकात मोठ्या प्रमाणात सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे लोणकर नगर चौकातून साडे सतरा नळीला उजव्या बाजूला वळताना अतिशय अरुंद रस्ते असल्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे लोणकर नगर चौकात त्वरित रस्ता रुंदीकरण करून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सिग्नल बसवण्यात यावेत व होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मुक्त करावे.
५) केशवनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक मांजरी रोड सदर वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारे व नियोजित विकास आराखड्यानुसार रस्त्याच्या मध्ये अडथळा ठरणारे झाडे महावितरण चे पोल महावितरण चे बॉक्स प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित स्थलांतर करावेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.
६) केशवनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणुका माता मंदिर रोड ह्या रोडचे रुंदीकरण करणे अतिशय आवश्यक आहे विकास आराखड्यानुसार अतिक्रमणात असणारे पाणी करून स्थलांतर करावेत त्यांनाही मोबदला देण्यात यावा.
Pune Bhidewada Smarak | मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार : अजित पवार यांनी केली स्मारकाच्या जागेची पाहणी
Pune Bhidewada Smarak | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी भिडेवाडा (Bhidewada) येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (Pune Bhidewada Smarak)
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, दीपक मानकर आदी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल. पुढच्या पिढीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात रहावे आणि याठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे कळावे या पद्धतीने सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न आहे. बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतल्या बाजूस विद्यार्थीनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा असाव्यात असा प्रयत्न राहील. वाहनतळासाठीदेखील व्यवस्था करण्याबाबत परिसरातील जागेचा उपयोग करता येतो का याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार
महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासंदर्भात श्री.पवार म्हणाले, अडीच एकर क्षेत्रावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले आहे. याठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. महात्मा फुले वाडा १९९३ मध्ये उभारण्यात आला आहे. दोन्ही भाग एकत्र करून विस्तृत स्वरुपाचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा शासनाचा मनोदय आहे. त्यासाठी काही कुटुंबांना स्थलांतरीत करावे लागेल. यापूर्वीदेखील काही कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांचा यासाठी विरोध नाही. मात्र त्यांचे चांगले पुनर्वसन व्हावे, त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. रहिवाशांना आवश्यक सुविधा आणि पर्यायी जागा देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. राज्य शासन आणि महानगरपालिका मिळून पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकूण पाऊणेचार एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचे स्मारक उभारेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तत्पूर्वी श्री.पवार यांनी दोन्ही स्मारकाच्या जागेस भेट देऊन तेथील कामांबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्यांनी स्थानिक रहिवाशांशी चर्चादेखील केली.