Mahalunge | Heavy Rain | मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली  | औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत 

Categories
Breaking News PMC पुणे

मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली

| औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत

पुणे | महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित झाली होती.  त्यामुळे औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून त्वरित ३ जेसिबी व दोन पंपाच्या साह्याने पाण्याचा निचरा करून सदर घरे सुरक्षित केली गेली.

या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, .उपायुक्त नितीन उदास यांनी केली.  सदर काम  महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, उपअभियंता संजय आदीवंत  यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुरेंद्र जावळे, प्रकाश सोवळे, आकाश शिंदे, भाऊ जाधव व सर्व महापालिका औंध येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कमीतकमी वेळात काम पूर्ण केले.

PMC | Additional Commissioner | अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांच्याकडे 16 विभागांची जबाबदारी

Categories
Breaking News PMC पुणे

अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांच्याकडे 16 विभागांची जबाबदारी 

: अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) पदाचा दर्जा

पुणे : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी विलास कानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका अधिकाऱ्यांमधून अतिरिक्त आयुक्त होणारे कानडे हे तिसरे अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) पदाचा दर्जा देण्यात आला आहे. दरम्यान त्यांच्याकडे 16 विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांचे नियंत्रणाखाली सोपवावयाचे विभागांबाबत खालीलप्रमाणे व्यवस्था करण्यात येत आहे.

नगर सचिव विभाग

मागासवर्ग कक्ष

बी. एस.यु. पी. सेल

बी. ओ. टी. सेल विभाग

प्राथमिक शिक्षण

शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग

उद्यान विभाग

स्थानिक संस्था कर विभाग

सायकल विभाग

परिमंडळ विभाग क्र. २ व ४

मध्यवर्ती भांडार विभाग

जिल्हा नियोजन व विकास समिती विभाग (डी.पी.डी.सी.)

समाज विकास विभाग

समाज कल्याण विभाग

मुद्रणालय विभाग

क्रिडा व सांस्कृतिक केंद्र विभाग

Property Tax Department : मिळकतकर विभागावर कोण मारणार बाजी?  : उपायुक्तांमध्ये रस्सीखेच 

Categories
Breaking News PMC पुणे

मिळकतकर विभागावर कोण मारणार बाजी?

: उपायुक्तांमध्ये रस्सीखेच

पुणे : महापालिकेचे कर संकलन आणि आकारणी विभाग प्रमुख विलास कानडे यांची अतिरिक्त आयुक्त पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आता मिळकतकर विभाग प्रमुख पद रिक्त राहणार आहे. दरम्यान या विभागात काम करण्यासाठी बरेच उपायुक्त उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांच्यात रस्सीखेच चालली आहे. त्यामुळे यावर कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका अधिकाऱ्यांसाठी अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्यात आले आहे. नुकतेच अतिरिक्त आयुक्त पदावरून ज्ञानेश्वर मोळक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या पदावर नियमानुसार विलास कानडे यांची वर्णी लागणे अपेक्षित होते. त्यानुसार राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाले आहेत. दरम्यान कानडे हे मिळकतकर विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. हे पद आता रिक्त होणार आहे. त्यामुळे या खात्यात काम करण्यासाठी महापालिकेचे बरेच अधिकारी इच्छुक आहेत.
मिळकतकर विभाग हा महापालिकेचा विशेष महत्वाचा विभाग आहे. कारण हा विभाग महापालिकेला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देतो. त्यामुळे या विभागाकडे सर्वांचे लक्ष असते. शिवाय नागरिकांशी जुडला गेलेला हा विभाग आहे. त्यामुळे या विभागात काम करण्यासाठी बरेच उपायुक्त इच्छुक आहेत. यामध्ये  माधव जगताप, संदीप कदम, अजित देशमुख, यशवंत माने यांची नावे आघाडीवर आहेत. यापैकी कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Vilas kanade : Additional Commissioner : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी विलास कानडे! 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी विलास कानडे!

   पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी हे पद तयार करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्तपदी बढती मिळालेले सुरेश जगताप हे राज्यातील पहिले महापालिका अधिकारी होते.  राज्य सरकारने नियम तयार केल्यानंतर त्यांना त्या पदावर राहण्याची संधी मिळाली.  त्यानंतर हे पद ज्ञानेश्वर मोळक यांच्याकडे सोपवले गेले होते. मोळक निवृत्त झाले आहेत. नियमानुसार या पदावर विलास कानडे यांना संधी मिळणार होती. त्यानुसार कानडे आता अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. राज्य सरकारने नुकतेच या सूचना जारी केल्या आहेत.

  – महापालिका अधिकाऱ्यांसाठी पद निर्माण केले

   महापालिका सेवा नियमावली नुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली होती. त्यातील एक पद महापालिका अधिकाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आले होते. पदोन्नतीने या पदावर महापालिका अधिकाऱ्याला जाता येईल. त्यानुसार सुरेश जगताप हे पहिले महापालिका अधिकारी होते जे अतिरिक्त आयुक्त बनले होते. जगताप सेवानिवृत्त झाल्यानंतर ही संधी ज्ञानेश्वर मोळक यांना मिळाली. मोळक देखील 30 एप्रिलला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे ही संधी आता विलास कानडे यांना मिळाली आहे. त्यानुसार कानडे आता अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. सरकारने नुकतेच या सूचना जारी केल्या आहेत.
विलास कानडे यांच्याकडे मिळकतकर विभाग आल्यानंतर त्यात त्यांनी आमूलाग्र सुधारणा केल्या. त्यामुळे टॅक्स विभाग मिळकत वसुलीचे इतिहास रचत चालला आहे. यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढतानाच दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेला विकासकामे करण्यात मदत मिळते आहे. टॅक्स विभागा अगोदर कानडे यांनी lbt विभागाची देखील जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळली होती. महापालिका अधिकाऱ्याच्या हातात हे पद राहिल्याने कर्मचारी वर्गातून आनंद दर्शवण्यात येत होता.

Property Tax : PMC : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 279 कोटींचा मिळकतकर जमा : मागील वर्षी पेक्षा 88 कोटी जास्त मिळवले

Categories
Breaking News PMC पुणे

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 279 कोटींचा मिळकतकर जमा

: मागील वर्षी पेक्षा 88 कोटी जास्त मिळवले

पुणे : महापालिकेचा मिळकतकर विभाग दरवर्षी वसुलीचे इतिहास रचत चालला आहे. विभागाने यावर्षी तर पहिल्याच महिन्यात सुमारे २७९ कोटींचा मिळकतकर जमा केला आहे. मागील वर्षी एवढ्या दिवसात १९१ कोटी मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ८८ कोटी जास्त मिळाले आहेत. विभागाच्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य होत आहे. अशी माहिती विभाग प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

कानडे यांच्या माहितीनुसार  सुमारे ७३% इतकी रक्कम ऑनलाईन प्रणालीद्वारे जमा झालेली आहे. म्हणजे १९६  कोटी ऑनलाईन च्या माध्यमातून जमा झाले आहेत. १ लाख ७२ हजार ७५ इतक्या लोकांनी ऑनलाइन माध्यमातून मिळकतकर जमा केला आहे. कॅश आणि चेक च्या माध्यमातून प्रत्येकी १७% आणि ९% इतकी रक्कम जमा केली आहे. कानडे यांनी सांगितले कि विभागाने यावर्षी पहिल्याच महिन्यात सुमारे २७९ कोटींचा मिळकतकर जमा केला आहे. २,३४,६०० इतक्या मिळकत धारकांनी २७९ कोटी जमा केले आहेत. मागील वर्षी एवढ्या दिवसात १९१ कोटी मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ८८ कोटी जास्त मिळाले आहेत.

Property Tax Collection Since 1-04-2022

CASH ➡️ 40,286 (17%)
Rs 29.16 Cr (11%)

CHEQUE ➡️ 22,242(9%)
Rs 49.91 Cr (18%)

ONLINE ➡️ 1,72,075 (73%)
Rs 196.08 Cr (71%)

Total Tax payers 2,34,603
Total amount ➡️ Rs 279.18 C

Property Tax : Vilas Kanade : महापालिकेचा मिळकतकर विभाग रचत चालला इतिहास : पहिल्या १८ दिवसात मागील वर्षी पेक्षा ५१ कोटी जास्त मिळवले

Categories
Breaking News PMC पुणे

१८ दिवसात १७१ कोटींचा मिळकतकर जमा

: मागील वर्षी पेक्षा ५१ कोटी जास्त मिळवले

पुणे : महापालिकेचा मिळकतकर विभाग दरवर्षी वसुलीचे इतिहास रचत चालला आहे. विभागाने यावर्षी तर पहिल्याच १८ दिवसात सुमारे १७१ कोटींचा मिळकतकर जमा केला आहे. मागील वर्षी एवढ्या दिवसात १२० कोटी मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५१ कोटी जास्त मिळाले आहेत. विभागाच्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य होत आहे. अशी माहिती विभाग प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

 

कानडे यांच्या माहितीनुसार  सुमारे८०% इतकी रक्कम ऑनलाईन प्रणालीद्वारे जमा झालेली आहे. म्हणजे १३३  कोटी ऑनलाईन च्या माध्यमातून जमा झाले आहेत. १ लाख २२ हजार ६४६ इतक्या लोकांनी ऑनलाइन माध्यमातून मिळकतकर जमा केला आहे. कॅश आणि चेक च्या माध्यमातून प्रत्येकी १३% इतकी रक्कम जमा केली आहे. कानडे यांनी सांगितले कि विभागाने यावर्षी तर पहिल्याच १८ दिवसात सुमारे १७१ कोटींचा मिळकतकर जमा केला आहे. मागील वर्षी एवढ्या दिवसात १२० कोटी मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५१ कोटी जास्त मिळाले आहेत.

२०२२-२३ चा मिळकत कर जमा करता यावा, यासाठी खात्याकडे उपलब्ध असलेल्या भ्रमणध्वनीच्या आधारे ८,८८,२०७ इतक्या मिळकतधारकांना एसएमएसद्वारे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच ६,६९,५१२ इतक्या मिळकतधारकांना कर भरणे बाबत इमेलद्वारे कळविणेत आले आहे. ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु.२५,०००/- पेक्षा कमी आहे, अशा मिळकतधारकांना मिळकत कराच्या सर्व साधारण करामध्ये १०% इतकी सूट, तर ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु. २५,००१/- पेक्षा जास्त आहे, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतकराच्या सर्व साधारण करामध्ये ५% इतकी सवलत देण्यात येत आहे. सदरची सवलत ही दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी मिळकतधारकांनी त्यांचा मिळकत कर जमा करावा, असे आवाहन कानडे यांनी केले आहे.

Property Tax Collection

From 1-04-2022

CASH ➡️ 20,494 (13%)
14.59 Cr (9%)

CHEQUE ➡️ 10,797(7%) Rs 22.51 Cr (13%)
ONLINE ➡️ 1,22,646(80%)
Rs 133.9 Cr (78%)

Total Tax Payers 1,53,937
Total amount Rs 171 Cr

Property Tax : 11 दिवसांमध्ये 108 कोटी  मिळकत कर जमा

Categories
Breaking News PMC पुणे

11 दिवसांमध्ये 108 कोटी  मिळकत कर जमा

पुणे : २०२२-२३ हे आर्थिक वर्ष सुरु झालेले असून, या आर्थिक वर्षातील मिळकत कर बिले तयार करून व संबंधित मिळकतधारकांना मिळकत कराचा भरणा पुणे महानगरपालिकेकडे जमा करता यावा, यासाठी योग्य ती कार्यवाही दिनांक ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात आलेली होती. तसेच सुमारे ९,४१,००० इतक्या मिळकत कराची बिले मार्च २०२२ मध्येच छपाई करून, पोस्ट विभागामार्फत वितरणासाठी दिलेली आहेत. त्यामुळे पहिल्या 11 दिवसांत २ दिवस शासकीय सुट्टी असून सुद्धा १,०१,४१६ इतक्या मिळकतधारकांनी १०८.०४ कोटी इतकी रक्कम मिळकत करापोटी जमा केलेली आहे. अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

: 31 मे पर्यंतच्या सवलतीचा लाभ घ्या

कानडे यांच्या माहितीनुसार  सुमारे८२ % इतकी रक्कम ऑनलाईन प्रणालीद्वारे जमा झालेली आहे. सन २०२२-२३ चा मिळकत कर जमा करता यावा, यासाठी खात्याकडे उपलब्ध असलेल्या भ्रमणध्वनीच्या आधारे ८,८८,२०७ इतक्या मिळकतधारकांना एसएमएसद्वारे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच ६,६९,५१२ इतक्या मिळकतधारकांना कर भरणे बाबत इमेलद्वारे कळविणेत आले आहे. ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु.२५,०००/- पेक्षा कमी आहे, अशा मिळकतधारकांना मिळकत कराच्या सर्व साधारण करामध्ये १०% इतकी सूट, तर ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु. २५,००१/- पेक्षा जास्त आहे, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतकराच्या सर्व साधारण करामध्ये ५% इतकी सवलत देण्यात येत आहे. सदरची सवलत ही दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी मिळकतधारकांनी त्यांचा मिळकत कर जमा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Pay mode Wise PMC Property Tax Collection

Since 1-04-2022

CASH ➡️ 12,043 ( 12%)
Rs 8.64 Cr (8%)

CHEQUE ➡️ 6,172 (6%)
Rs 11.17 Cr (10%)

ONLINE ➡️ 83,201 (82%)
Rs 88.23 Cr (82%)

Total Tax Payers : 1,01,416
Total amount : Rs 108.04

Property Tax : Vilas kanade : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार दिवसांमध्ये ४५.८८ कोटी  मिळकत कर जमा 

Categories
Breaking News PMC पुणे

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार दिवसांमध्ये ४५.८८ कोटी  मिळकत कर जमा

पुणे : २०२२-२३ हे आर्थिक वर्ष सुरु झालेले असून, या आर्थिक वर्षातील मिळकत कर बिले तयार करून व संबंधित मिळकतधारकांना मिळकत कराचा भरणा पुणे महानगरपालिकेकडे जमा करता यावा, यासाठी योग्य ती कार्यवाही दिनांक ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात आलेली होती. तसेच सुमारे ९,४१,००० इतक्या मिळकत कराची बिले माहेमार्च २०२२ मध्येच छपाई करून, पोस्ट विभागामार्फत वितरणासाठी दिलेली आहेत. त्यामुळे पहिल्या ४ दिवसांत २ दिवस शासकीय सुट्टी असून सुद्धा ४५.६८५ इतक्या मिळकतधारकांनी ४५.८८कोटी इतकी रक्कम मिळकत करापोटी जमा केलेली आहे. अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

: 31 मे पर्यंतच्या सवलतीचा लाभ घ्या

कानडे यांच्या माहितीनुसार  सुमारे ९५.२५% इतकी रक्कम ऑनलाईन प्रणालीद्वारे जमा झालेली आहे. सन २०२२-२३ चा मिळकत कर जमा करता यावा, यासाठी खात्याकडे उपलब्ध असलेल्या भ्रमणध्वनीच्या आधारे ८,८८,२०७ इतक्या मिळकतधारकांना एसएमएसद्वारे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच ६,६९,५१२ इतक्या मिळकतधारकांना कर भरणे बाबत इमेलद्वारे कळविणेत आले आहे. ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु.२५,०००/- पेक्षा कमी आहे, अशा मिळकतधारकांना मिळकत कराच्या सर्व साधारण करामध्ये १०% इतकी सूट, तर ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु. २५,००१/- पेक्षा जास्त आहे, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतकराच्या सर्व साधारण करामध्ये ५% इतकी सवलत देण्यात येत आहे. सदरची सवलत ही दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी मिळकतधारकांनी त्यांचा मिळकत कर जमा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

: सुट्टीच्या दिवशी देखील कर भरणा केंद्रे सुरु राहणार

तसेच मिळकत कर बिल प्राप्त करून घेणेसाठी अथवा मिळकत कर भरणेसाठी मिळकतधारकांनी त्यांचा पूर्वीचा मिळकत कर क्र.सांगून माहिती देण्यासाठी मनपा मुख्य कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापित करण्यात आला
असून, त्या ठिकाणी मिळकत कराविषयी माहिती देणेसाठी कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. त्यासाठी ०२०-२५५०११५९ या क्रमांकावर संपर्क साधल्यास माहिती उपलब्ध होऊ शकते. तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे मिळकत कर विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून देखील याबाबतची माहिती प्राप्त करून देण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.
नागरिकांनी जास्तीत जास्त online प्रणालीद्वारे “propertytax.punecorporation.org‘ या संकेतस्थळावस्न मालमत्ता कर भरणे बाबत आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन मिळकत कर जमा करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI – Google Pay. UPI – PhonePe, Post_Debit_Card, UPI, Pos_Credit_Card, EBPP, Mobile Wallet, paytm, Amazon
Pay, NEFT-RTGS, etc.
त्याचप्रमाणे दिनांक ३१/०५/२०२२ पर्यंत सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील मिळकत कर भरणा केंद्रे सुरु राहणार