Property Tax Department : मिळकतकर विभागावर कोण मारणार बाजी?  : उपायुक्तांमध्ये रस्सीखेच 

Categories
Breaking News PMC पुणे

मिळकतकर विभागावर कोण मारणार बाजी?

: उपायुक्तांमध्ये रस्सीखेच

पुणे : महापालिकेचे कर संकलन आणि आकारणी विभाग प्रमुख विलास कानडे यांची अतिरिक्त आयुक्त पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे आता मिळकतकर विभाग प्रमुख पद रिक्त राहणार आहे. दरम्यान या विभागात काम करण्यासाठी बरेच उपायुक्त उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांच्यात रस्सीखेच चालली आहे. त्यामुळे यावर कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका अधिकाऱ्यांसाठी अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्यात आले आहे. नुकतेच अतिरिक्त आयुक्त पदावरून ज्ञानेश्वर मोळक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या पदावर नियमानुसार विलास कानडे यांची वर्णी लागणे अपेक्षित होते. त्यानुसार राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाले आहेत. दरम्यान कानडे हे मिळकतकर विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. हे पद आता रिक्त होणार आहे. त्यामुळे या खात्यात काम करण्यासाठी महापालिकेचे बरेच अधिकारी इच्छुक आहेत.
मिळकतकर विभाग हा महापालिकेचा विशेष महत्वाचा विभाग आहे. कारण हा विभाग महापालिकेला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देतो. त्यामुळे या विभागाकडे सर्वांचे लक्ष असते. शिवाय नागरिकांशी जुडला गेलेला हा विभाग आहे. त्यामुळे या विभागात काम करण्यासाठी बरेच उपायुक्त इच्छुक आहेत. यामध्ये  माधव जगताप, संदीप कदम, अजित देशमुख, यशवंत माने यांची नावे आघाडीवर आहेत. यापैकी कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

7th pay commission : HOD : Pay Matrix S27 : खाते प्रमुखांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव सरकारला सादर  : पे मॅट्रिक्स एस 27 ची केली मागणी 

Categories
Breaking News PMC पुणे

खाते प्रमुखांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव सरकारला सादर

: पे मॅट्रिक्स एस 27 ची केली मागणी

: मुख्य अभियंता पदापेक्षा खाते प्रमुखाची जबाबदारी मोठी

पुणे : महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र महापालिकेने प्रस्तावित केलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाले आहे. खास करून महापालिकेचे खाते प्रमुख आणि शिपाई पदाचा यात समावेश आहे. त्यामुळे यांचा एक सुधारित प्रस्ताव तयार करून आणि त्याला महापालिका आयुक्तांची मंजुरी घेऊन तो राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे कि मुख्य अभियंता पदापेक्षा खाते प्रमुखाची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे खाते प्रमुखांना पे मॅट्रिक्स एस 27 लागू करण्यात यावा. अशी मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.

: काय आहे प्रस्ताव

पुणे महानगरपालिका अधिकारी/सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करणेकामी सादर  केलेल्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने  महापालिका अधिकारी/सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करणेस मंजुरी दिली आहे. या मंजुरीमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी व मुख्य लेखापरीक्षक या पदाशी समकक्ष वैद्यकीय आरोग्य अधिकारी, विभागप्रमुख, महापालिका सहाय्यक आयुक्त व शिपाई या हुद्यांचे वेतन निश्चितीकरण कमी पे मॅट्रिक्समध्ये दर्शविण्यात आलेले आहेत. याशिवाय पुणे महानगरपालिकेमधील अभियांत्रिकी संवर्गात कार्यरत असलेल्या मुख्य अभियंता एस-२७, अधिक्षक अभियंता एस-२५, कार्यकारी अभियंता एस-२३ याप्रमाणे पे मॅट्रिक्स मंजुर केले आहेत.

पुणे महानगरपालिकामध्ये कार्यरत अभियांत्रिकी संवर्गातील मुख्य अभियंता पदास २७ पे मॅट्रिक्स शासनाने मंजूर केला आहे. तथापि या सर्व मुख्य अभियंता यांचेकडे महानगरपालिकेतील फक्त एका विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु सर्वच खातेप्रमुख दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे महानगरपालिकेच्या सर्व विभागांशी संपर्क साधून कामकाज करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात
आलेली आहे. असे असतानाही खातेप्रमुख दर्जाच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेने मंजूर केलेला पे मॅट्रिक्स एस -२५ मंजूर न करता शासनाने एस- २३ पे मॅट्रिक्स मंजूर केला आहे. वास्तविक मुख्य अभियंता पदावरील अधिकाऱ्यांचे कामकाज हे खातेप्रमुख संवर्गातील अधिकाऱ्यांच्या तुलनेने एका विभागाशी सिमीत आहे.

 कार्यकारी अभियंता व खातेप्रमुख यांना एकच पे मॅट्रिक्स एस-२३ मंजुर केले असल्याने प्रशासकीय संरचनेमध्ये विसंगती निर्माण होणार आहे. कारण कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र एका विशिष्ट विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मर्यादित क्षेत्रापुरते सिमीत आहे.
(उदा. पथ विभागाकडील कार्यकारी अभियंता यांचेकडे एका विशिष्ट विभागाचे कार्यक्षेत्र सोपविण्यात आले आहे) तुलनेने खातेप्रमुख संवर्गातील अधिकाऱ्यांचे कामकाज अतिव्याप्त व सर्व विभागांशी संबंधित आहे. खातेप्रमुख संवर्गातील अधिकाऱ्यांचे पे मॅट्रिक्स एस-२३ मंजुर केल्याने मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, इत्यादी विभागांच्या पदोन्नतीच्या साखळीमध्ये बाधा निर्माण झाली आहे. तसेच, महानगरपालिकेने निम्न संवर्गात सुचविलेल्या पदाचा पे मॅट्रिक्स खातेप्रमुख यांच्या समकक्ष झाल्याने प्रशासकीय संरचनेमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.
 शासन पत्रातील अ.क्र. २ मध्ये सुधारित वेतनश्रेणी लागू करताना प्रशासकीय स्वरुपाच्या कोणत्याही त्रुटी आढळल्यास याबाबत स्वतंत्र प्रस्ताव शासनास सादर करावे असे नमूद करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेमधील खातेप्रमुख, अधिक्षक अभियंता व उपायुक्त या खातेप्रमुख संवर्गातील पदांना ४ था, ५ वा व ६ वा वेतन आयोगामध्ये समकक्ष वेतनश्रेण्या व ग्रेड वेतन मंजूर करण्यात आले होते. तथापि सन २०१४ मध्ये त्यामध्ये बदल केला गेला. तसेच सातव्या वेतन आयोगामध्ये अधिक्षक अभियंता या पदापेक्षा खातेप्रमुख पदावरील अधिकाऱ्यांना कमी पे मॅट्रिक्स मंजूर करण्यात आले असून सदर बाब
नैसर्गिक न्यायतत्वाविरूध्द आहे. सबब वरील समर्थानासह नव्याने पे मॅट्रिक्स प्रस्तावित केला आहे. सबब उपरोक्त तपशिलामध्ये नमूद केलेल्या पदांना प्रस्तावित केल्यानुसार सुधारित पे मॅट्रिक्स मंजूर होणेस विनंती आहे.

: अशी आहे नवीन मागणी

हुद्दा                  प्रस्तावित       मंजूर       नवीन मागणी
मुख्य लेखा
परीक्षक             S 25.          S 23.       S 27
मुख्य लेखा
वित्त अधिकारी.   S 25.           S 23.        S 27
नगर सचिव         S 25.           S 23.        S 27
वैद्यकीय आरोग्य
अधिकारी            S 29           S 23.         S 27
मुख्य कामगार
अधिकारी            S 25.           S 23.         S 27
मुख्य विधी
अधिकारी            S 25.           S 23.          S 27
मुख्य समाज
विकास अधिकारी  S 25.           S 23.        S 27
मुख्य उद्यान
अधीक्षक, सांख्यिकी
संगणक प्रमुख,
उप आयुक्त           s 25.           S 23.         S 27
सहायक
आयुक्त               S 23.            S 20.          S 23
शिपाई                 S 2.             S 1.                S 2