Property Tax : 11 दिवसांमध्ये 108 कोटी  मिळकत कर जमा

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

11 दिवसांमध्ये 108 कोटी  मिळकत कर जमा

पुणे : २०२२-२३ हे आर्थिक वर्ष सुरु झालेले असून, या आर्थिक वर्षातील मिळकत कर बिले तयार करून व संबंधित मिळकतधारकांना मिळकत कराचा भरणा पुणे महानगरपालिकेकडे जमा करता यावा, यासाठी योग्य ती कार्यवाही दिनांक ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात आलेली होती. तसेच सुमारे ९,४१,००० इतक्या मिळकत कराची बिले मार्च २०२२ मध्येच छपाई करून, पोस्ट विभागामार्फत वितरणासाठी दिलेली आहेत. त्यामुळे पहिल्या 11 दिवसांत २ दिवस शासकीय सुट्टी असून सुद्धा १,०१,४१६ इतक्या मिळकतधारकांनी १०८.०४ कोटी इतकी रक्कम मिळकत करापोटी जमा केलेली आहे. अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

: 31 मे पर्यंतच्या सवलतीचा लाभ घ्या

कानडे यांच्या माहितीनुसार  सुमारे८२ % इतकी रक्कम ऑनलाईन प्रणालीद्वारे जमा झालेली आहे. सन २०२२-२३ चा मिळकत कर जमा करता यावा, यासाठी खात्याकडे उपलब्ध असलेल्या भ्रमणध्वनीच्या आधारे ८,८८,२०७ इतक्या मिळकतधारकांना एसएमएसद्वारे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच ६,६९,५१२ इतक्या मिळकतधारकांना कर भरणे बाबत इमेलद्वारे कळविणेत आले आहे. ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु.२५,०००/- पेक्षा कमी आहे, अशा मिळकतधारकांना मिळकत कराच्या सर्व साधारण करामध्ये १०% इतकी सूट, तर ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु. २५,००१/- पेक्षा जास्त आहे, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतकराच्या सर्व साधारण करामध्ये ५% इतकी सवलत देण्यात येत आहे. सदरची सवलत ही दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी मिळकतधारकांनी त्यांचा मिळकत कर जमा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Pay mode Wise PMC Property Tax Collection

Since 1-04-2022

CASH ➡️ 12,043 ( 12%)
Rs 8.64 Cr (8%)

CHEQUE ➡️ 6,172 (6%)
Rs 11.17 Cr (10%)

ONLINE ➡️ 83,201 (82%)
Rs 88.23 Cr (82%)

Total Tax Payers : 1,01,416
Total amount : Rs 108.04

Leave a Reply