Property Tax : PMC : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 279 कोटींचा मिळकतकर जमा : मागील वर्षी पेक्षा 88 कोटी जास्त मिळवले

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 279 कोटींचा मिळकतकर जमा

: मागील वर्षी पेक्षा 88 कोटी जास्त मिळवले

पुणे : महापालिकेचा मिळकतकर विभाग दरवर्षी वसुलीचे इतिहास रचत चालला आहे. विभागाने यावर्षी तर पहिल्याच महिन्यात सुमारे २७९ कोटींचा मिळकतकर जमा केला आहे. मागील वर्षी एवढ्या दिवसात १९१ कोटी मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ८८ कोटी जास्त मिळाले आहेत. विभागाच्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य होत आहे. अशी माहिती विभाग प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

कानडे यांच्या माहितीनुसार  सुमारे ७३% इतकी रक्कम ऑनलाईन प्रणालीद्वारे जमा झालेली आहे. म्हणजे १९६  कोटी ऑनलाईन च्या माध्यमातून जमा झाले आहेत. १ लाख ७२ हजार ७५ इतक्या लोकांनी ऑनलाइन माध्यमातून मिळकतकर जमा केला आहे. कॅश आणि चेक च्या माध्यमातून प्रत्येकी १७% आणि ९% इतकी रक्कम जमा केली आहे. कानडे यांनी सांगितले कि विभागाने यावर्षी पहिल्याच महिन्यात सुमारे २७९ कोटींचा मिळकतकर जमा केला आहे. २,३४,६०० इतक्या मिळकत धारकांनी २७९ कोटी जमा केले आहेत. मागील वर्षी एवढ्या दिवसात १९१ कोटी मिळाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ८८ कोटी जास्त मिळाले आहेत.

Property Tax Collection Since 1-04-2022

CASH ➡️ 40,286 (17%)
Rs 29.16 Cr (11%)

CHEQUE ➡️ 22,242(9%)
Rs 49.91 Cr (18%)

ONLINE ➡️ 1,72,075 (73%)
Rs 196.08 Cr (71%)

Total Tax payers 2,34,603
Total amount ➡️ Rs 279.18 C

Leave a Reply